Thursday, 30 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 नोटबंदीचं उद्दीष्ट मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालं असून, देशाच्या कोणत्याही भागात रकमेचा तुटवडा नाही, असं सरकारनं म्हटलं आहे. आर्थिक व्यवहार सचिव एस पी गर्ग यांनी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. काळा पैसा तसंच दहशतवादी कारवायांना होणारा वित्तपुरवठा, यांना आळा घालणं; डिजिटल व्यवहारांना चालना देणं, आणि चलनात आलेल्या बनावट नोटा  हद्दपार करणं, ही नोटबंदीची उद्दीष्टं होती, आणि ती मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

     

 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असलेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर, गेल्या 20 महिन्यात मोठ्या रकमेच्या बनावट नोटा बाजारात आलेल्या नाहीत, असं गर्ग यांनी सांगितलं.

****



 राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा - एनआयए नं हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या मुलाला श्रीनगर इथून अटक केली, एनआयएच्या प्रवक्त्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

       

 दरम्यान, बांदिपुरा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली, यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना, एक दहशतवादी मारला गेला. शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

****



 हमी भावा पेक्षा कमी भावानं शेतकऱ्यांकडून शेती माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला दंड आणि कारावासाची शिक्षा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात लातूरमधल्या आडत व्यापाऱ्यांनी काल सलग दुसऱ्या दिवशी खरेदी व्यवहार बंद ठेवले. राज्य सरकारनं शेतकरी आणि व्यापारी यांच्या हितासाठी तातडीनं नव्या निर्णयाचा फेरविचार करुन तोडगा काढावा, सरकार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्यांचा बंद सुरु राहील असं बाजार समितीचे सभापती ललित शहा यांनी सांगितलं.

****



 हिंगोली शहर पोलिसांनी काल रॉकेलचा सुमारे दीड हजार लीटर अवैध साठा जप्त केला. शहरालगत गारमाळ परिसरातल्या एका घरावर छापा घालून ही कारवाई करण्यात आली.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 August 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰  ؍  اگست  ۲۰۱۸ ؁
وَقت: صبح ۴۰:۸  -  ۴۵:۸
 سپریم کورٹ نے بھیما کو رے گائوں فسا دات معاملے میں پو نے پولس کے ذریعے گرفتار کیئے گئے پانچوں ملزمین کی گرفتا ری پر روک لگا تے ہوئے اُنھیں منتقل کر نے کا حکم دیا ہے۔چیف جسٹس دیپک مِشرا کی صدارت والی بینچ نے اِس معا ملے میں داخل در خواستوں کی سماعت کے دوران یہ حکم دیا۔ اپنے فیصلے کے دوران چیف جسٹِس نے کہا کہ اختلاف ِرائے ،جمہوریت میں ’’سیفٹی والو‘‘ کی حیثیت رکھتے ہیں اور اِن اختلافات کا اظہار نہ ہونے کی صورت میں اِنکا دھما کہ ہونے کا خدشہ ہو تاہے۔ عدالت نے بھیما کو رے گائوں کے واقعے کو 9؍مہینے گذر جانے کے بعد کی گئی کار وائی پر بھی سوال اُٹھا ئے ہیں۔
 اِس بیچ اِن پانچ کار کنوں کی گرفتاری کے دوران وضع کیئے گئے طور طریقوں پر مبینہ طور پر عمل آ وری نہ کر نے پر اِنسا نی حقوق کے قو می کمیشن نے مہا راشٹر حکو مت اور مہاراشٹر پولس کے ڈائریکٹر جنرل کو نو ٹِس جاری کیا ہے۔ کمیشن نے دو نوں سے چار ہفتوں میں جواب مانگا ہے۔ اِنسانی حقوق کے قو می کمیشن نے ـذرائع ابلاغ کی اُن خبروں کا از خود نو ٹس لیتے ہوئے جواب طلب کیا ہے جسکے تحت ملک کے مختلف شہروں سے پر سوں رات کو اِن کار کنوں کو گرفتار کیا گیا تھا۔
 دوسری جا نب اِن گرفتار یوں پر صفائی دیتے ہوئے مہاراشٹر حکو مت نے کہا ہے کہ یہ کار وائی مائو نوازوں اور بھیما کورے گائوں تشدد کے در میان تعلق کے منظرِ عام پر آ نے کے بعد ہی کی گئی ہے۔ داخلی اُمور کے ریاستی وزیر دیپک کیسر کر نے وضا حت کر تے ہوئے کہا کہ اِن کار کنوں کی گرفتاری کے دوران وضع کیئے گئے طور طریقوں پر عمل کیا گیا ہے۔
***** ***** *****
 اِنڈیا پوسٹ پیمنٹ بینکIPPB کاایک ستمبر سے قو می سطح پر آ غاز ہو گا۔ مواصلات کے مرکزی وزیر منوج سنہا نے یہ اعلان کیا۔
سِنہا ، مرکزی کا بینہ کے اجلاس کے بعد کل نا مہ نگاروں سے گفتگو کر رہے تھے۔ اُنھوں نے کہا کہ ملک بھر کے650؍ مقا مات پر اِنڈیا پوسٹ پیمنٹ بینک کی شاخیں شروع کی جائیں گی اور دسمبر تک یہ بینک ملک کے دیہی علاقوں میں لو گوں کے گھروں تک بینکِنگ خد مات فراہم کرے گی۔
***** ***** *****
 مرکزی حکو مت کے ملازمین کے مہنگائی بھّتے میں 2؍ فیصد کااِضا فہ کر نے کو بھی کل مرکزی کا بینہ کے اجلاس میں منظوری دی گئی۔
اِس فیصلے سے قریب ایک کروڑ مرکزی ملازمین اور سبکدوش ملازمین کو فائدہ پہنچے گا۔ مہنگا ئی بھّتے میں کیا گیا یہ اضا فہ اِ س سال ایک جو لائی سے نافذ العمل ہو گا۔
 بحری خد مات سے متعلق امبریلا منصوبے کو بھی مرکزی کا بینہ کی اقتصا دی امور کی کمیٹی نے کل منظوری دی۔ اِس منصو بے کے تحت 16؍ ضمنی پرو جیکٹوں کے لیے 1623؍ کروڑ روپیوں کی رقم منظور کی گئی ہے۔ اِس منصو بے کے ذریعے قریب5؍ لاکھ ما ہی گیروں کو مچھلی پکڑ نے کی جگہ اور سمندری حا لات کے بارے میں مو بائل فون کے ذریعے اطلاع دی جائے گی تا کہ اُنکے وقت اور ایندھن کی بچت ہو سکے۔
***** ***** *****
 مہاراشٹر کا بینہ نے زراعت کی جدید کا ری کے لیے ریاستی حکو مت کی جانب سے100؍ فیصد امداد فراہم کر نے والے زرعی تیکنا لو جی منصو بے پر عمل آ وری کو کل منظوری دی۔ اِس منصو بے پر رواں مالی سال سے عمل آ وری ہو گی۔ اِسکے تحت کم اور بہت کم زمینوں کے حا مل کسا نوں، درج فہرست ذاتوں اور جماعتوں کے کسا نوں اور خا تون کسا نوں کو ٹریکٹر خرید نے کے لیے 35؍ فیصد اور دیگر ضروریات کے لیے  50؍ فیصد امداد فراہم کی جائے گی۔ دوسری طرز کے فائدے حاصل کر رہے کسا نوں کو ٹریکٹر کے لیے25؍ فیصد اور دیگر ضروریات کے لیے40؍ فیصد امداد فراہم کر نے کی گنجائش اِس منصو بے میں مو جود ہے۔ اِس منصو بے پر عمل آ وری کے لیے جا ری مالی سال سے ہر سال کے لیے 50؍ کروڑ روپئے فراہم کیئے جائیں گے۔
***** ***** *****
 مہاراشٹر حکو مت کی جانب سے دیا جانے والا گیا نو با تُکا رام انعام ڈاکٹر کِسن مہاراج ساکھرے کو دیا جائے گا۔ تقسیم ِانعام کی یہ تقریب پو نے کے انا بھائو ساٹھے ہال میں سنیچر کے روز شام ساڑھے چھ بجے منعقد ہو گی۔ گیا نو با تُکا رام انعام پانچ لاکھ روپئے نقد سپاس نا مے اور توصیفی سند پر مشتمل ہے۔
***** ***** *****
 مقررہ بنیادی قیمت سے کم قیمت پر کسانوں سے زرعی اشیاء خرید نے والے تا جِروں پر جر ما نہ اور جیل کی سزا دینے کے ریاسی حکو مت کے فیصلے کے خلاف کل لاتور میں تاجِروں نے لگا تار دوسرے دن اپنے کا رو بار بند رکھے۔ بازار کمیٹی کے سر براہ للت شاہ نے کہا کہ ریاستی حکو مت کو چا ہیے کہ وہ کسا نوں اور تاجِروں کے مفا دات کا تحفظ کر تے ہوئے اپنے فیصلے پر نظر ثانی کر ے اور مسئلے کا فوری حل نکا لے ۔ شاہ نے مزید کہا کہ جب تک ریاستی حکو مت اِس بارے میں کوئی فیصلہ نہیں کر تی تب تک تا جروں کا بند جا ری رہے گا۔
***** ***** *****
 اِنڈونیشیا میں جاری اٹھار ویں ایشین گیمز میں کل بھارت نے 2؍ سو نے اور چاندی اور کانسے کا ایک-ایک تمغہ حاصل کیا۔
مردوں کے قلا بازی کے مقابلے میں بھارت کے اَرپِندر سنگھ نے جبکہ خواتین کی جانب سے سوَپنا بر من نے طلا ئی تمغے جیتے۔ خواتین کی200؍ میٹر دوڑ میں بھارت کی دُتی چند نے چاندی کا تمغہ اپنے نام کیا۔ ٹیبل ٹینِس کے مِکسڈ ڈبلز مقابلوں میں بھا رت کے شرت کمل اور منیکا باترا نے کانسے کے تمغے جیتے۔ اِسکے علا وہ مُکّے بازی میں وِکا س کرِشنن اور امیت پلگھل نے سیمی فائنل میں داخلہ حاصل کر لیا ہے۔ ایشین گیمز میں بھارت نے اب تک سو نے کے11؍ چاندی کے 21؍ اور کانسے کے 24؍ تمغے حاصل کر لیے ہیں۔
***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.

**** 

Ø  भीमा कोरेगाव प्रकरणी पाचही कार्यकर्त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; येत्या सहा सप्टेंबरपर्यंत स्थानबद्धतेचे आदेश

Ø  शेतीच्या आधुनिकीकरणासाठी १०० टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

Ø  अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये अरपिंदर सिंग याला तर हेप्टॅथ्लॉन मध्ये स्वप्ना बर्मन हिला सुवर्ण पदक

 आणि

Ø  येत्या डिसेंबर महिन्यापासून लातूर इथं ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन

****



 भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही कार्यकर्त्यांच्या अटकेला स्थगिती देत, या सर्वांना येत्या सहा सप्टेंबरपर्यंत स्थानबध्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, यासंदर्भात दाखल याचिकांच्या सुनावणी दरम्यान हे निर्देश दिले. मतभेद हे लोकशाही पद्धतीत सुरक्षा व्हॉल्व प्रमाणे असतात, मतभेद व्यक्त झाले नाही, तर विस्फोट होण्याची शक्यता असते, असं न्यायालयानं नमूद केलं. भीमा कोरेगाव घटनेला नऊ महिने उलटून गेल्यावर केलेल्या या कारवाईवर न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला.



 दरम्यान, पाच जणांना अटक करतांना, मानक प्रक्रियेचं पालन न केल्याच्या कारणावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकार आणि पोलिस महासंचालकांना नोटीस जारी केली आहे. चार आठवड्यात याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. देशातल्या अनेक शहरांतून परवा झालेल्या या कारवाईबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांची स्वत:हून दखल घेत आयोगानं ही नोटीस जारी केली.



 राज्य सरकारनं मात्र, या कारवाईचं समर्थन करत, नक्षलवाद्यांशी संबंधांचे पुरावे असल्याच्या आधारावरच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात या कार्यकर्त्यांना अटक केल्याचं म्हटलं आहे. ही कारवाई राबवताना, निर्दिष्ट प्रक्रियेचं पालन केल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.

****



 शेतीच्या आधुनिकीकरणासाठी १०० टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. चालू आर्थिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातले शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ टक्के तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येईल. इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी २५ टक्के तर इतर बाबींसाठी ४० टक्के अनुदान दिलं जाईल. याशिवाय कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी यावर्षापासून प्रत्येक वर्षांकरता ५० कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.



 जळगाव जिल्ह्यातल्या तीन तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एक अशा एकूण चार पाझर तलावांच्या कामाला काल मंत्रिमंडळानं प्रशासकीय मंजुरी दिली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातल्या लिहे तांडा क्रमांक दोन या पाझर तलावाचा समावेश आहे.

****



 राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार येत्या शनिवारी डॉ. किसन महाराज साखरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातल्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पाच लाख रूपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे.

****



 येत्या एक सप्टेंबरला इंडिया पोस्ट पेमेंट बँक- आय पी पी बी चा राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ होणार आहे, दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. देशभरात साडेसहाशे ठिकाणी या बँकेच्या शाखा सुरू होणार असून, येत्या डिसेंबरपर्यंत ही बँक देशातल्या ग्रामीण भागांमध्ये लोकांच्या घरांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणार असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं.

****



 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या, महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या निर्णयाचा जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे. महागाई भत्त्यातली ही वाढ या वर्षीच्या एक जुलैपासून लागू होईल.



 सागरी सेवांशी संबंधित अंब्रेला या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं काल मंजुरी दिली. याअंतर्गत सोळा उप परियोजनांसाठी या समितीनं एक हजार सहाशे तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या योजनेद्वारे सुमारे पाच लाख मच्छिमारांना मासळीचं नेमकं ठिकाण आणि समुद्राच्या स्थितीबद्दल मोबाईल फोनद्वारे माहिती देण्यात येणार असून, यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

****



 भारतीय अस्मिता अजूनही स्वतंत्र झाली नसल्याचं मत, जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. आशिया खंडाचं नेतृत्व करण्याची संधी भारताकडे असून, जगासोबत संबंध वृद्धिंगत करणारी भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडावी, असं आवाहन चितळे यांनी यावेळी केलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनंही इतर मागासवर्गीयांसाठीची उन्नत प्रवर्ग- क्रिमीलेअरची मर्यादा दहा लाख रूपयांपर्यंत वाढवण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं, भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारनं ओबीसी महामंडळाच्या कर्ज मर्यादेत एक लाख रुपयापर्यंतची वाढ केली असून मुख्यमंत्र्यानी मंडळाला पाचशे कोटी रुपये निधी जाहीर केल्याची माहिती त्यांनी दिली.

****



 इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतानं दोन सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात अरपिंदर सिंग यानं तर महिलांच्या हेप्टॅथ्लॉन क्रीडा प्रकारात स्वप्ना बर्मन हिनं सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या दुती चंदला रौप्य पदक मिळालं. टेबल टेनिस मिश्र दुहेरीत शरत कमल आणि मणिका बात्रा या जोडीला कांस्यपदक मिळालं. याशिवाय मुष्टीयुद्धात विकास कृष्णन आणि अमीत पलघल यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत प्रत्येकी एक पदक निश्चित केलं आहे. भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, २१ रौप्य आणि २४ कांस्य पदकं जिंकली आहेत.

****



 भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. मालिकेत दोन एकनं भारत पिछाडीवर आहे.

****



 नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात लातूर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणार असल्याची माहिती, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात ते काल बोलत होते. लातूरच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, त्यातून जागतिक दर्जाच्या क्रीडा विषयक सुविधा पुरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत योजने’ अंतर्गत देशात वैयक्तिक शौचालयं बांधली जात आहेत. या योजनेमुळेच आपण शौचालय बांधू शकलो, असं जळगावचे लाभार्थी अमोल पाटील यांनी सांगितलं.



स्वच्छ भारत अभियानामुळे माझ्या घरात स्वत:चे शौचालय बांधले गेले. आमची परिस्थिती तशी फार काही चांगली नव्हती. आई मोलमजूरी करते, मी सुध्दा रोजंदारीवर काम करतो. वडील तर लहान असतांना सोडून गेले. घरी शौचालय बांधणे शक्य नव्हते. घरचे सर्व मंडळी सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत होते. किंवा मोकळ्या जागेचा वापर करीत होते. केंद्र शासना कडून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्वच्छ भारत अभियान योजनेमुळे मी शौचालय बांधू शकलो. या योजनेत मला १८ हजार पर्यंत मदत मिळाली. त्यामुळे घरात शौचालय झाले. मी त्यामुळे परिसर देखील स्वच्छ आहे. मी शतश: आभारी आहे शासनाचा.

****



 नीती आयोगानं जाहीर केलेल्या, देशभरातल्या एकशे पंधरा मागास जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भातल्या, उस्मानाबाद जीवन रेखा, या कार्यशाळेचं काल उस्मानाबाद इथं आयोजन करण्यात आलं होतं. उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देणार असल्याचं जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितलं.

*****

***

Wednesday, 29 August 2018

“येत्या एक सप्टेंबरला इंडिया पोस्ट पेमेंट बँक- आयपीपीबीचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ होणार असल्याची माहिती, दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे.” – यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.08.2018 - Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.

****

येत्या एक सप्टेंबरला इंडिया पोस्ट पेमेंट बँक- आयपीपीबीचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ होणार असल्याची माहिती, दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. देशभरात साडेसहाशे ठिकाणी या बँकेच्या शाखा सुरू होणार असून, येत्या डिसेंबरपर्यंत ही बँक देशातल्या ग्रामीण भागांमध्ये लोकांच्या घरांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणार असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं.

****

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या, महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. यामुळे हा भत्ता आता सात टक्क्यावरून नऊ टक्के एवढा झाला आहे. या निर्णयाचा जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे. महागाई भत्त्यातली ही वाढ या वर्षीच्या एक जुलैपासून लागू होईल.

सागरी सेवांशी संबंधित अंब्रेला या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं आज मंजुरी दिली. याअंतर्गत सोळा उप परियोजनांसाठी या समितीनं एक हजार सहाशे तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या योजनेद्वारे सुमारे पाच लाख मच्छिमारांना मासळीचं नेमकं ठिकाण आणि समुद्राच्या स्थितीबद्दल मोबाईल फोनद्वारे माहिती देण्यात येणार असून, यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

****

शेतीच्या आधुनिकीकरणाला उपयुक्त ठरेल अशी, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्याला राज्य मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांसाठी ही योजना सहाय्यभूत ठरणार आहे. या योजनेअंतर्गत, कृषी अवजारं आणि यंत्रं खरेदी करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांसह बँकांनाही अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यातल्या चार पाझर तलावांच्या कामाला या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या एक आणि जळगाव जिल्ह्यातल्या तीन पाझर तलावांचा समावेश आहे.

मुंबईतल्या, ‘बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालया’चं नाव बदलून ते ‘मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय’ करण्यालाही मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली.

****

भीमा कोरेगाव प्रकरणात काल पाच जणांना अटक करतांना मानक प्रक्रियेचं पालन न केल्याच्या कारणावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकार आणि पोलिस महासंचालकांना नोटीस जारी केली आहे. चार आठवड्यात याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. काल देशातल्या अनेक शहरांतून झालेल्या या कारवाईबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांची स्वत:हून दखल घेत आयोगानं ही नोटीस जारी केली आहे.

दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे असल्याच्या आधारावरच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात काल विविध राज्यांतून डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. या कार्यकर्त्यांना अटक करताना योग्य त्या प्रक्रियांचं पालन करण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.

****

नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी येत्या डिसेंबरपासून लातूर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणार असल्याची माहिती, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. लातूरच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, त्यातून जागतिक दर्जाच्या क्रीडा विषयक सुविधा पुरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

नीती आयोगानं जाहीर केलेल्या, देशभरातल्या एकशे पंधरा मागास जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भातल्या, उस्मानाबाद जीवन रेखा, या कार्यशाळेचं आज उस्मानाबाद इथं आयोजन करण्यात आलं होतं. उस्मानाबाद जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देणार असल्याचं जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितलं. जानेवारीत जाहीर झालेल्या या यादीत उस्मानाबादचा क्रमांक तिसरा होता, मात्र प्रशासनानं नीती आयोगाच्या मानकांनुसार केलेल्या सातत्यपूर्ण कामांमुळे आज उस्मानाबादचा क्रमांक या यादीत एक्कावन्नावा असल्याचंही गमे यांनी सांगितलं.

****

इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या दुती चंदला रौप्य पदक मिळालं. टेबल टेनिस मिश्र दुहेरीत शरत कमल आणि मणिका बात्रा या जोडीला कांस्यपदक मिळालं. याशिवाय मुष्टीयुद्धात विकास कृष्णन आणि अमीत पलघल यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत प्रत्येकी एक पदक निश्चित केलं आहे.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29 08 2018 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29 08 2018 13 00

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...