Friday, 28 September 2018

“भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातून पाच कार्यकर्त्यांना अटक केल्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला, या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे.” - यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.09.2018....Evening Bulletin

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातून पाच कार्यकर्त्यांना अटक केल्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला, या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पोलिसांनी सादर केलले पुरावे नक्षलींशी संबंधित असून, यासंदर्भात आणखी पुरावे सादर करुन अटक केलेल्या पाच जणांचा ताबा घेऊ, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. देशाविरोधी षडयंत्र रचणारे, तसंच समाजात तेढ निर्माण करणारे नक्कीच गजाआड जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरासाठीची प्रणाली विकसित करण्याचं आवाहन केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी उद्योग जगताला केलं आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे, असं सांगत या समस्येचा निपटारा करण्यासाठी समाजानं प्रयत्न करायला हवेत, त्यासाठी जनआंदोलन उभं राहायला हवं असं ते म्हणाले. प्लास्टिक पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापनावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते.
****
पोषण अभियानाचा योग्य परिणाम मिळण्यासाठी या अभियानास चळवळीचं रुप मिळणं आवश्यक असून, यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला, मुंबईत आज या उपक्रमाचा समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. नवभारताच्या निर्माणासाठी कुपोषणाचं समूळ उच्चाटन होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 
****
राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावानं दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांच्या पर्थिव देहावर आज सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाजन यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं, त्या ५१ वर्षांच्या होत्या. कविता महाजन यांच्या निधनानं मराठी साहित्यात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्रस्थापित करणारी एक महत्त्वाची लेखिका आणि समाज जीवनावरच्या प्रभावी भाष्यकार आपण गमावल्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्यात झालेल्या कराराविरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय व्यापारी संघानं पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठा बंद होत्या, त्यामुळे उलाढाल ठप्प होती. लातूर इथंही व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून, व्यापारी महासंघानं शहरातून मूक मोर्चा काढला.   
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनीही आज स्वतंत्र बंद पुकारला आहे. उस्मानाबाद इथं या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं.
जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड इथं औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.
****
परभणी इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी उच्चस्तरीय समितीनं आज जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. परभणी इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती, त्या पार्श्वभूमीवर शासनानं या समितीची स्थापना केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीनंतर ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
****
लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभा संगम या सतराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडी मध्ये विविध वेषभुषा केलेले विद्यार्थी, घोडेस्वार लक्ष वेधून घेत होते. शहरातल्या विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, प्राध्यापक, साहित्यिक यात सहभागी झाले होते. महापौर सुरेश पवार, मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके, उपमहापौर देवीदास काळे यावेळी उपस्थित होते. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या कवयित्री सीसिलिया काव्हरलो यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. 
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा-भोगाव रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या बसला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात दहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
****

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०१८ दुपारी १.०० वा.

****

केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश करता येईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या पीठानं चार विरुद्ध एक अशा मतानं हा निर्णय दिला. मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणं हे लिंगभेद आणि हिंदू महिलांच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. देवाशी असलेलं नातं हे शारिरीक घटकांवर ठरू शकत नाही, सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे, त्यासाठी लिंगभेद करणं योग्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातून पाच कार्यकर्त्यांना अटक केल्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला असून, यासंदर्भात विशेष तपास पथक स्थापन करण्यासही नकार दिला आहे. आपल्याविरुद्ध दाखल आरोपांचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा निवडण्याचा अधिकार आरोपींना नसतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे. अटकेची ही कारवाई, संबंधितांच्या वेगळ्या मतांबद्दल नव्हे, तर प्रतिबंधित संघटनांशी त्यांचा संबंध दर्शवणारे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्यामुळे करण्यात आल्याचंही न्यायालयानं नमूद केलं आहे. या पाच आरोपींची नजरकैद न्यायालयानं आणखी चार आठवड्यांनी वाढवली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस खासदार तारिक अन्वर यांनी लोकसभा सदस्यत्वासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याच्या मुद्यावरून, अन्वर यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी, लोकांना मोदींच्या हेतूबाबत शंका नाही, असं सांगतानाच, राफेल कराराची तांत्रिक माहिती आणि तपशील जाहीर करण्याची मागणी चुकीची असल्याचं म्हटलं होतं. मात्र विमानाची किंमत जाहीर करण्यात काही धोका नसून, या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याच्या मागणीला पवार यांनी पाठिंबा दर्शवला होता.

****

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारनं आठ सदस्यीय लोकपाल शोध समिती स्थापन केली आहे. प्रसारभारतीचे अध्यक्ष सूर्य प्रकाश, स्टेट बँकेच्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती सुखराम सिंह यादव यांचा या समितीत समावेश आहे. कार्मिक मंत्रालयानं यासंदर्भातला आदेश जारी केला असून, ही समिती लोकपाल अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावाची शिफारस करेल. लोकपाल निवडीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही निवड प्रक्रिया सुरु आहे, असं कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. लोकपाल नियुक्तीच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असून ही समिती आपलं काम लवकरच सुरु करेल असं असं सिंह यांनी सांगितलं. 

****

राफेल करार, दोन देशांमधल्या सरकारांमध्ये झाला असून डासो विमान कंपनीला भारतातला भागीदार निवडण्याचं स्वातंत्र्य होतं, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. देशात अधिक चांगल्या दर्जाची हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमानं खरेदी करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. सध्याच्या सरकारनं केलेल्या करारापेक्षा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं केलेल्या कराराची किमंत कैकपटीनं अधिक होती, असंही त्यानी यावेळी सांगितलं.  

****

उद्योग मंत्रालयाच्या सहाकार्यानं नागरी विकास मंत्रालय शहरी भागातल्या गरीब तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. ‘नारेडको’ अर्थात राष्ट्रीय गृहनिर्माण विकास परिषद या कार्यक्रमाद्वारे शहरातल्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या अकुशल कामगार, बेरोजगार आणि व्यावसायिकांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रातली कुशल कामगारांची गरज लक्षात घेता, येत्या तीन वर्षात अडीच लाख शहरी गरीब युवकांना प्रशिक्षण देण्याची योजना असल्याचही पुरी यांनी सांगितलं.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि बांगलादेश संघादरम्यान होणार आहे. दुबई इथं होणाऱ्या या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सुरुवात होईल. भारतानं आतापर्यंत सहा वेळेस आशिया चषक जिंकला आहे.

//************//


Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.09.2018 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

पराक्रम पर्व आजपासून साजरं होत आहे. भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक अर्थात लक्ष्यभेदी कारवाईला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे पर्व साजरं करण्यात येत आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानात जोधपूर इथं हुतात्मा सैनिकांच्या स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ३० सप्टेंबर पर्यंत पराक्रम पर्व साजरं करण्यात येणार असून, या अंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज १११ वी जयंती. त्यानिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. भगतसिंग यांच्या हौतात्म्यामुळे लाखो देशवासियांना प्रेरणा मिळाल्याचं सांगून पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

****

भारतरत्न लता मंगेशकर आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्तानं संगीत आणि चित्रपट क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून लता मंगेशकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा मधूर आवाज जगभरातल्या रसिकांना मंत्रमुग्ध करतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे, तर पंतप्रधानांनी आपल्या संदेशात देशाच्या विकासाबाबत लता मंगेशकर कायम उत्साही असल्याचं म्हटलं आहे.

****

ऑनलाईन खरेदी व्रिकीच्या निषेधार्थ अखिल भारतीय व्यापारी महासंघानं आज बंद पुकारला आहे.  देशभरातले सात कोटी व्यापारी तसंच २० हजार व्यापारी संघटना या बंद सहभागी होत आहेत. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार आणि ऑनलाईन कंपन्यांमुळे पारंपारिक किरकोळ व्यापार संकटात आला आहे, यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार धोरण आखत नसल्याचं महासंघानं म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातली सुमारे ५० हजार व्यापारी प्रतिष्ठानं या बंदमध्ये सहभागी होत आहेत. ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनी स्वतंत्र बंद पुकारला आहे. त्यामुळे आज औषध दुकानंही बंद राहण्याची शक्यता आहे.

//************//


AIR News Bulletin, Aurangabad. Date : 28.09.2018, Time : 8.40 - 8. 45 AM

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 28 September 2018
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۸ ؍سِتمبر۲۰۱۸؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 سپریم کورٹ نے دستور ِ ہند کے دفعہ497؍ کو غیر آئینی قرار دیاہے  اور اِس فیصلے کے تحت زائد از  ازدواجی تعلقات کو تعزیری دائرہ کار سے باہر کر دیاگیا ہے۔ چیف جسٹِس دیپک مِشرا کی زیر قیا دت 5؍ رُکنی بینچ نے کل یہ فیصلہ دیا۔ عدالت نے کہا کہ بیوی ، خا وِند کی مِلکیت نہیں ہو تی۔ معاشرے میں مر د و زن کو مسا وی اختیا رات حاصل ہیں۔ اور خواتین کا مقام سب سے اونچا ہے۔ عدالتی فیصلے میں کہا گیا ہے کہ زائد از  ازدواجی تعلقات، ازدواجی تعلقات منقطع ہونے کا سبب تو ہو سکتے ہیں لیکن تعزیری جرم نہیں ہو سکتے۔
***** ***** *****
  ایودھیا اراضی تنازعے پر آئندہ29؍ اکتوبر سے سُپریم کورٹ میں از سر نوَسماعت شروع ہو گی۔ سپریم کورٹ نے کل اُس عرضداشت کو مُسترد کر دیا ہے جس میں مساجد اسلام کا لازمی رکن ہے یا نہیں یہ معاملہ آئینی بینچ کے سُپرد کرنے کی در خواست کی گئی تھی۔
***** ***** *****
 ریاستی انتخابی کمشنر جے ایس سہاریہ نے کہا ہے کہ متوسط ومالدار  اور خاص طور پر تعلیم یافتہ طبقے میں رائے دہی سے متعلق لا پر واہی تشویش کی بات ہے۔وہ کل ممبئی میں ایک ورکشاپ میںخطاب کررہے تھے۔اُنھوں نے کہا رائے دہی کے فیصد میں اضا فہ ہو نا چا ہیے۔اور انتخا بات کے دوران پیسے اور سماجی رابطے کے ذرائع کے غلط استعمال کو روکنے کے چیلنج کا سب کو مل کر مقابلہ کر نے ضُرورت ہے۔
***** ***** *****
 وزیر صنعت سُبھاش دیسائی نے کہا ہے کہ مہاراشٹرصنعتی شعبے میںترقی کی سمت گامزن ہے۔وہ کل ممبئی میںایک اجلاس میں خطاب کر رہے تھے۔
وزیر موصوف نے کہا کہ پیدا واری شعبے کی تر قی کے لیے حکو مت سہو لیات فراہم کر رہی ہے۔ اِس لیے مختلف کمپنیاں ریاست میں اپنی سر ما یہ کار ی میں اضا فہ کریں۔
***** ***** *****
 ریاست کے محکمہ ِتعمیرات عامّہ کے زیر اختیار  ریاستی شاہرا ہوں ، راستے اورضلعے کی اہم سڑکوں کی  خستہ حالی اور گڑھوں کی شکا یات درج کر وا نے کی غرض سے محکمہ تعمیرات عامّہ نے  WWW.MAHAPWD.COMِّٓ  ویب سائیٹ پر شکایتی نظام متعارف کر وا یا ہے۔
محکمے کی جانب سے اپیل کی گئی ہے کہ عوام خستہ حال سڑکوںسے متعلق تفصیلات اور تصا ویر اِس ویب سائٹ پر اپلوڈ کر یں۔ تا کہ بروقت سڑ کوں کی مرمت کی جا سکے ۔
***** ***** *****
 سیاحتی شعبے کے فروغ میں اہم کر دار ادا کر نے والے دو ہوٹلوں اور ایک ادارے کو کل مرکزی وزیر سیاحت کے جے الفونس کے ہاتھوں سیاحت کے قو می اعزاز سے سر فرا ز کیا گیا۔ اِن میں اورنگ آباد کی لیمن ٹری  اور ممبئی کی hotel Meluha The Fern  اور Grassroot Journey Private Limited  نامی ادارہ شامل ہیں ۔کل دہلی میں یہ ایوارڈز عطا کیئے گئے۔
 ***** ***** *****
 کانگریس پارٹی کے مہاراشٹر کے ذمہ دارملِک ار جُن کھرگے نے وزیر اعظم نریندر مودی سے مطالبہ کیا ہے کہ رافیل جنگی جہاز وں کی خریداری معاملے میںمُشترکہ پارلیمانی کمیٹی کی ہنگا می میٹِنگ طلب کر کے عوام کے سامنے اِس معاملے کی تفصیلات پیش کریں۔اِس سلسلے میں کل ممبئی میں کانگریس پارٹی کی جانب سے مورچہ نکا لا گیا اِس موقع پر و ہ خطاب کررہے تھے۔ کانگریس پارٹی نے کہا ہے کہ حکو مت اِس معاملے کی مکمل تحقیقات پار لیمنٹ کی مُشتر کہ کمیٹی سے کر وانے سے ڈر  محسوس کررہی ہے۔اِس لیے جب تک وزیر اعظم  او روزیر دِفاع استعفی نہیں دیتے احتجاج جاری رہے گا۔اِس سلسلے میں پارٹی کے ایک وفد نے کل گور نر سی وِدّیا ساگر رائو سے ملا قات کر کے مطلبا تی محضر پیش کیا۔
***** ***** *****
 آن لائن کمپنیوں کی مخالفت میں آج اکھل بھارتیہ ویا پا ری مہا سنگھ کی جانب سے بند کا اعلان کیا گیا ہے۔ملک بھر سے 7؍ کروڑ تاجر اور 20؍ ہزارتجا رتی تنظیمیں اِس بند میں حصہ لے رہی ہیں۔مہا سنگھ کی جانب سے کہا گیا ہے کہ والمارٹ -فلِپ کارٹ معاہدہ اور آن لائن کمپنیوں کی وجہ سے روایتی خرد ہ کا رو بار مشکلات کا شکار ہیں۔ اور اِس پر قابو پا نے کے لیے حکو مت کوئی پالیسی وضع نہیں کر رہی ہے۔اورنگ آباد ضلعے سے تقریبا50؍ہزاردُکانداراِس بند میں حصّہ لے رہے ہیں۔
 دوسری جانب دوائوں کی آن لائن تجا رت کی مذمت میں دوائوں کے تاجروں نے بھی آج علیحدہ بند کا اعلان کیا ہے۔جسکی وجہ سے آج میڈیکل اسٹورس بند رہنے کا امکان ہے۔
***** ***** *****
 ایشیاء کپ کر کٹ ٹور نا منٹ کا فائنل مقابلہ آج بھارت اور بنگلہ دیش کے ما بین کھیلا جائے گا۔یہ میچ شام  پانچ بجے شروع ہو گا۔ بھارت  اب تک 6؍ مرتبہ ایشیاء کپ جیت چکا ہے۔
***** ***** *****
 رکن پار لیمنٹ چندر کانت کھیرے نے تیقن دیا ہے کہ اجنٹہ اور ایلو رہ ورثے کے تحفظ کے لیے مرکزی حکو مت کے تیسرے مر حلے کا  کام
جلد سے جلد شروع کرنے کے لیے و ہ کوشش کریں گے۔کل عالمی یوم سیا حت کے موقع پر اورنگ آ باد میں شعبہ سیاحت کی جانب سے منعقدہ دستکاری اور ثقا فتی نمائش میں وہ خطاب کر رہے تھے۔
***** ***** *****

TEXT- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.09.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.

****

** व्याभिचार हा गुन्हा ठरवणारं कलम ४९७ रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

** औरंगाबादच्या लेमन ट्री हॉटेलसह राज्यातल्या तीन संस्थांना राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

** राफेल विमान खरेदी व्यवहाराची जनतेला माहिती द्यावी - काँग्रेसची मागणी

** प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांचं निधन

आणि

** ऑनलाईन कंपन्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा आज बंद

****

भारतीय दंड विधानातलं व्याभिचार हा गुन्हा ठरवणारं कलम ४९७ रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या पीठानं हा निर्णय दिला. पती हा पत्नीचा मालक नसून, समाजात महिलांचं स्थान सर्वात वर आहे. महिला आणि पुरुषांना समाजात समान अधिकार आहे. व्यभिचार हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं, मात्र,तो फौजदारी गुन्हा नाही, असा निर्वाळा न्यायालयानं दिला आहे.

****

अयोध्या जमीन वादविवाद प्रकरणी येत्या २९ ऑक्टोबरपासून सर्वोच्च न्यायालयात नव्यानं सुनावणी सुरु होणार आहे. काल न्यायालयानं, मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही हा मुद्दा घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका, फेटाळून लावली आहे.

****

उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि उच्चशिक्षित मंडळींचा मतदानासाठी अनुत्साह ही चिंतेची बाब असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी म्हटलं आहे. ते काल नवी मुंबईत एका कार्यशाळेत ते बोलत होते. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, असं सांगतानाच निवडणुकांमध्ये पैसा आणि सामाजिक संपर्क माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपणा सर्वांना पेलायचं आहे,

असं सहारिया म्हणाले.

****

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र, देशात अग्रेसर असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत एका परिषदेत बोलत होते. उत्पादन क्षेत्रासाठी राज्य शासन सुविधा उपलब्ध करून देत असून, विविध कंपन्यांनी राज्यात आपली गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितल्या राज्य महामार्ग, राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरच्या खड्ड्यांच्या तक्रारींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा पी डब्ल्यू डी डॉट कॉम या संकेतस्थळावर तक्रार यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.नागरिकांनी खड्डे असलेल्या रस्त्यांची माहिती, फोटो या संकेतस्थळावर अपलोड करावेत, जेणेकरून त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असं आवाहन विभागानं केलं आहे.

****

पर्यटन क्षेत्राच्या विकासात योगदान देणाऱ्या राज्यातल्या दोन हॉटेल आणि एका संस्थेला काल केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फॉन्स यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये औरंगाबाद शहरातलं लेमन ट्री आणि मुंबईतल्या मेलुहा-द- फर्न ही दोन हॉटेल तसंच ‘ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा समावेश आहे. काल दिल्लीत, हे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

****

राफेल विमान खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची तत्काळ बैठक बोलावून, जनतेला या व्यवहाराची माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. काल मुंबईत काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी खरगे बोलत होते. संयुक्त संसदीय समिती मार्फत या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यास सरकार घाबरत आहे. त्यामुळे जो पर्यंत पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं यावेळी पक्षातर्फे सांगण्यात आलं. दरम्यान, पक्षाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन, आपल्या मागण्याचं निवेदन सादर केलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

स्त्री अस्मितेचा हुंकार मांडणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांचं काल निधन झालं. त्या ५१ वर्षांच्या होत्या. न्युमोनियामुळे आजारी असलेल्या महाजन यांच्यावर पुण्यातल्या खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते. काल उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या ब्र, भिन्न, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम, जोयानाचे रंग, या कादंबऱ्यांसह कुहू हा दृकश्राव्य लेखसंग्रह, ‘तत्पुरुष’, ‘धुळीचा आवाज’ यासह अनेक कवितासंग्रह, प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी वारली लोकगीतांचं संकलन-संपादन केलं, विविध भाषांमधल्या अनेक कथा कविता संग्रहांचे अनुवाद केले तसंच वृत्तपत्रातून विविध विषयांवर स्तंभलेखनही केलं. साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. इस्मत चुगताई यांच्या लघुकथांचा अनुवाद असलेल्या रजई या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीनं भाषांतरासाठीचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं. महाजन यांच्या निधनानं साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

****

ऑनलाईन कंपन्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय व्यापारी महासंघानं आज बंद पुकारला आहे.  देशभरातले सात कोटी व्यापारी तसंच २० हजार व्यापारी संघटना या बंद सहभागी होत आहेत. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार आणि ऑनलाईन कंपन्यांमुळे पारंपारिक किरकोळ व्यापार संकटात आला आहे, यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार धोरण आखत नसल्याचं महासंघानं म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातली सुमारे ५० हजार व्यापारी प्रतिष्ठानं या बंदमध्ये सहभागी होत आहेत. ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनी स्वतंत्र बंद पुकारला आहे. त्यामुळे आज औषध दुकानंही बंद राहण्याची शक्यता आहे.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि बांगलादेश संघादरम्यान होणार आहे. दुबई इथं आयोजित या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सुरुवात होईल. भारतानं आतापर्यंत सहा वेळेस आशिया चषक जिंकला आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या अंबड इथले रमेश आहेर यांनी आपला सायकल दुरुस्तीचा व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवलं. यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.



वीस वर्षांपासून मी हा व्यवसाय करतो. मला हे दुकान वाढवायचे होते.माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.मी अनेक राष्ट्रीयकृत बँकेत गेलो.पण कर्ज मिळाले नाही.केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती मिळाली.कमीत कमी कागदपत्रात मला मुद्रा लोनतर्फे  ७५ हाजार रूपये कर्ज मिळाले. यामुद्रा लोन मुळे माझा व्यवसाय वाढला आहे.आणि मी आता गाडी रिपेअरींगचे दुकान चालू केले आहे.



****

केंद्र सरकारच्या अजिंठा आणि वेरुळ लेणी संवर्धनाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभागाच्या वतीनं आयोजित हस्तकला प्रदर्शन आणि सांस्कृतिक मेळाव्यात ते बोलत होते. १६ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या पर्यटन पर्वाचा काल समारोप झाला. या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत परभणी महापालिकेच्या वतीनं काल संदेश फेरी काढण्यात आली. महापौर मीना वरपूडकर यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी स्वच्छता अभियानाचीही सुरुवात करण्यात आली. 

****

बीड तालुक्याच्या वांगी इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना काल दुपारी माध्यान्ह भोजनानंतर उलट्यांचा त्रास सुरु झाला. ७५ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं.

****

नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम तसंच विभागीय स्तरावरील प्रशिक्षण आणि चर्चासत्राचं काल नांदेड इथं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रकल्पाद्वारे फेरफार ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्यानं शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम कमी होतील असं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं या मागणीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर शेतकऱ्यांनी कालपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या संदर्भात २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांना निवेदनही देण्यात आलं आहे.

****

राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. मुंबईत काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. जालना शहर आणि परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या लिंबाला, पाचेगाव, वडधूती, मानधनी, आडगाव आदि भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

****

रक्तदानाबाबत जनजागृती होण्यासाठी येत्या एक ऑक्टोबर रोजीच्या ‘ऐच्छिक रक्तदान दिना’ निमित्त औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय - घाटीच्या विभागीय रक्तपेढीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्राध्यापक राजन बिंदु यांनी काल औरंगाबाद इथं ही माहिती दिली. संपूर्ण ऑक्टोबर महिना स्वेच्छा रक्तदान महिना म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

//**********//

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...