Wednesday, 29 April 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राज्य सरकारचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर; दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी

·      राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी

·      डॉ नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातला आरोपी शरद कळस्करला जामीन मंजूर

आणि

·      राज्यात उष्माघाताच्या रुग्णात वाढ; अकोल्यात ७२ रुग्णांची नोंद

****

राज्य सरकारने आपलं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ आज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. या धोरणांतर्गत राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असून दीड लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यभरात सहा एआय उत्कृष्टता केंद्रांची स्थापन होणार असून पाच एआय इनोव्हेशन शहरांची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. राज्यात तीनशे कोटी वृक्ष लागवडीकरता महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असून हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना केली जाणार आहे.

 

राज्यातल्या दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ, परीक्षा मंडळ, संस्थेला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, ग्रंथालय, नियतकालिकांसाठी, वैद्यकीय तपासणीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.

****

केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये प्रस्तावित सुधारणांची मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, उत्सर्जन आणि इंधनाचे प्रकार तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात आले आहेत. यातल्या प्रमुख सुधारणांमध्ये हायड्रोजन इंधनाच्या वर्गीकरणात सुधारणा, वाहनाच्या वजन मर्यादेत वाढ, बायोडिझेल संदर्भात श्रेणीसुधार तसंच उत्सर्जन चाचणी मापदंड आणि तांत्रिक निर्देशांचं प्रमाणीकरण, आदी बाबींचा समावेश आहे.

****

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. आज नवी दिल्ली इथं आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. देशभरात व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा ७० टक्क्यांपर्यंत पूर्ववत झाला असून, ऑनलाइन एलपीजी बुकिंग आणि डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडवर आधारित, घरगुती एलपीजीचा पुरवठाही आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ५ किलोच्या सिलिंडरचा पुरवठा जवळपास दुप्पट झाला असून, सुमारे ७३ हजार सिलिंडर काल विकले गेल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ७८ पूर्णांक ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातल्या सात जिल्ह्यांमधल्या १४२ मतदारसंघांचा यात समावेश असून, एक हजार ४४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

****

राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज उमेदवाराची घोषणा करण्यात येईल आणि उद्या उमेदवारी अर्ज भरला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राष्ट्रवादीच्या गाभा समितीची बैठक झाली, त्यानंतर तटकरे यांनी ही माहिती दिली. संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे एकच जागा असून योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

भाजपने या निवडणुकीसाठी आपले पाच उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत.

**

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. यासंदर्भात दानवे यांनी आकाशवाणीशी बोलतांना, आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या. ते म्हणाले…

बाईट- शिवसेना नेते अंबादास दानवे

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगच्या सरपंच पदी स्वरुपानंद देशमुख यांचा विजय झाला आहे. देशमुख यांनी, दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला. संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून निघृण हत्या झाल्यानंतर हे सरपंचपद रिक्त होतं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज उत्तर प्रदेशामधल्या हरदोई जिल्ह्यात ३६ कोटी २३० लाख रुपये खर्चाच्या ५९४ किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड गंगा द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन झालं.

हजारो वर्षांपासून गंगा नदी उत्तर प्रदेशाची जीवनरेखा आहे, तसंच गंगा द्रुतगती महामार्गामुळे राज्याच्या विकासाची नवी जीवनरेखा ठरेल, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी महामार्गाच्या उद्घाटनानंतर हरदोई इथं घेतलेल्या सभेत केलं. या द्रुतगती महामार्गामुळे राज्यातील संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल. तसंच औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स, शेतीमालाची विक्री आणि प्रादेशिक समतोल विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आज सकाळी पंतप्रधानांनी वाराणसी इथं रोड शो केला. त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात विधीवत पूजा केली.

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींपैकी एक असलेल्या शरद कळस्करला मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि आर. आर. भोसले यांच्या पीठानं हा आदेश दिला. ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात नरेंद्र दाभोळकर, यांची सकाळी गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलिसांनी केला होता, त्यानंतर २०१४ मध्ये हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलं. सीबीआयनं २०१६ ते २०१९ दरम्यान आरोपींना अटक केली आणि त्यांच्यावर खून, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा आणि शस्त्र कायदा यांसारख्या कलमांखाली आरोप ठेवले.

****

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १४ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये ६, गडचिरोली आणि रत्नागिरी इथं प्रत्येकी ४, तर अहिल्यानगरमध्ये ३ रुग्णांची नोंद झाली. रायगड, पुणे, पालघर, जालना, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि धुळे इथं प्रत्येकी २, तर अमरावती, भंडारा, जळगाव, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट असून अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे. संपूर्ण विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि लातूर इथली दयानंद शिक्षण संस्था यांच्यामध्ये आज शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशानं शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धतीची देवाण-घेवाण होणार आहे. या कराराद्वारे अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर नजिक आज एका अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. मुंबई नागपूर महामार्गावरील पुरणगाव रस्त्यावर स्टीलची वाहतूक करणारा आयशर ट्रक आणि दुधाची वाहतूक करणारा एक टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक परिसरातील तिरुपती एंटरप्राइजेस या प्लास्टिक कंपनीच्या गोडाऊनला आज भीषण आग लागली. या आगीत प्लास्टिक निर्मितीसाठी कच्चा माल खाक झाला आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०२६ दुपारी १.०० वा.

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे ४० टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातल्या सात जिल्ह्यांमधल्या १४२ मतदारसंघांचा यात समावेश असून, एक हजार ४४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

****

देशात विजेच्या सर्वोच्च मागणीचा उच्चांक गाठला जाऊन, ती मागणी पूर्ण करण्यातही भारताला यश आलं आहे. चार दिवसांपूर्वी म्हणजे, २५ एप्रिलच्या दुपारी २५६ गिगावॅटपेक्षा अधिक विजेचा पुरवठा करून ही विक्रमी मागणी पूर्ण केली असून, त्याचवेळी शेजारी देशांना होत असलेली वीज-निर्यातही सुरळीत सुरु ठेवली. देशात पारंपरिक वीज उत्पादनाच्या प्रकारांबरोबरच जलविद्युत, अणुऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प अश्या अनेक माध्यमातून हे विजेचं सर्वोच्च उत्पादन यशस्वीपणे करण्यात आल्याचं वीज मंत्रालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च मागणी पुरवताना नवीकरणीय ऊर्जेनं -विशेषतः सौर ऊर्जेनं मोलाचं योगदान दिल्याचंही मंत्रालयाने अधोरेखित केलं.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग – एनसीबीच्या विभागीय संचालकांची या वर्षाची पहिली त्रैमासिक परिषद नवी दिल्ली इथं पार पडली. या परिषदेत एनसीबीच्या सर्व क्षेत्रीय विभागांनी, पुढील तीन वर्षांत देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापराचा प्रभावीपणे मुकाबला करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. या दोन दिवसीय परिषदेत प्रभावी खटला चालवणं, संयुक्त समन्वय समिती आणि नार्को समन्वय केंद्र यंत्रणेचा वापर करणं, फरार आरोपींना न्याय मिळवून देणं, एनसीबी विभागीय कार्यालयांच्या अंमलबजावणी आणि समन्वय कार्यांचा सविस्तर आढावा घेणं यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं.

****

केंद्र सरकारने 'केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९' मध्ये प्रस्तावित सुधारणांची रूपरेषा स्पष्ट करणारी एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, इथेनॉल आणि जैवइंधन मिश्रणाचं वाढीव उद्दिष्ट लक्षात घेऊन, नियमांमध्ये काही बदल सुचवण्यात आले आहेत. हायड्रोजन इंधनाचं वर्गीकरण 'Hydrogen + CN' वरून 'Hydrogen + CNG' असं करणं, ठराविक श्रेणीतल्या वाहनांसाठी वजनाची मर्यादा वाढवणं, 'E20' इंधनाच्या अंमलबजावणीशी सुसंगत बदल करणं, बायोडिझेलमध्ये श्रेणी सुधारणा करणं, उत्सर्जन चाचणीच्या निकषात बदल करणं, आदी सुधारणा या अधिसूचनेत प्रस्तावित आहेत.

****

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज अधिकृत नावाची घोषणा करण्यात येईल आणि उद्या उमेदवारी अर्ज भरला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राष्ट्रवादीच्या गाभा समितीची बैठक झाली, त्यानंतर तटकरे यांनी ही माहिती दिली. संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे एकच जागा असून योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी परभणी जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया येणाऱ्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. परभणी जिल्ह्यातल्या सेलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांमधून जालना-नांदेड महामार्ग जात आहे. आतापर्यंत सेलू तालुक्यातल्या ६५ पूर्णांक ३८ टक्के हेक्टर क्षेत्राचं, तर जिंतूर तालुक्यातल्या ९० टक्के क्षेत्राचं भूसंपादन झालं आहे.

****

राज्यात लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धतीसह संपूर्ण कार्यान्वयासाठी समन्वय संस्था म्हणून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कार्य करणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.

****

जलसंवर्धनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेली ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल यात्रा काल धुळे इथं पोहोचली. या यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प साकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर इथून गोदावरी नदीचं पवित्र जल घेण्यात आलं असून, चौंडी इथून पवित्र माती आणण्यात आली आहे. राज्यातल्या १३१ नद्यांचं पाणी एकत्र करून ते नर्मदा नदीत अर्पण करण्यासाठी नेलं जात आहे.

****

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं उद्या तीस तारखेला लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतल्या लाभार्थ्यांसाठी कर्जवाटप आणि स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड शहरातल्या शंकरराव चव्हाण सभागृहात हा मेळावा होणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे.

****

राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट असून, अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाली आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत १८ पूर्णांक ३९ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातल्या सात जिल्ह्यांमधल्या १४२ मतदारसंघांचा यात समावेश असून, तीन कोटी २० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या टप्प्यात एक हजार ४४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, यात २२० महिलांचा समावेश आहे.

****

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणं ही राष्ट्रीय चळवळ असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. लखनौमधल्या एका खासगी शाळेनं शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी निवड होऊनही एका विद्यार्थीनीला प्रवेश नाकारला होता, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने, राज्य सरकारच्या निर्देशांनुसार खासगी अनुदानित शाळांसह परिसरातल्या सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देणं कायद्याने बंधनकारक असल्याचं नमूद केलं. समाजातल्या दुर्बल आणि वंचित वर्गातल्या मुलांना प्रवेश नाकारणं म्हणजे घटनेतल्या कलम २१ अ मधल्या शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

देशातल्या नागरिकांना आणि करदात्यांना सुलभ व्हावं, त्यांची सोय व्हावी यासाठी नवीन आयकर कायदा अंमलात आला असल्याची माहिती आयकर विभागाचे मुख्य आयुक्त विक्रम सहाय यांनी दिली. मुंबईत काल नवीन आयकर कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयकर कायदे आणि आयकर यंत्रणा यात सुधारणा कारणासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं आश्वासन त्यांनी दिलं. नवीन आणि जुन्या आयकर कायद्यांविषयी त्यांनी उपस्थित व्यापारी, करदाते, कर सल्लागार यांच्या शंकांचं निरसन केलं.

****

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात ‘जीव -द क्रियेचर’ आणि ‘एप्रिल मे ९९’ या दोन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी काल याबाबतची घोषणा केली. येत्या १२ ते २२ मे या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये कान चित्रपट महोत्सव होणार आहे.

****

हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनानं डिजिटल नोंदणीचा उपक्रम सुरू केला आहे. या नोंदणीसाठी 'हर घर दस्तक' ही विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेत महाराष्ट्राच्या हस्तलिखित दस्तऐवजांची ऑनलाईन नोंद करून त्यातून राज्याचा सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. देशभरातल्या हस्तलिखित दस्तऐवजांचं जतन आणि डिजिटायझेशन करणं, हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असून, यासाठी ज्ञानभारती ॲप विकसित करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्रातल्या कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आज जागतिक उत्पादन बनली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी, प्राडा हा जागतिक ब्रॅन्ड आणि लिडकॉम म्हणजेच संत रोहिदास चर्मउद्योग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या करारानुसार कारागिरांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याकरता प्राडा पुढील तीन वर्षांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी इथं प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. पारंपरिक कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे.

****

नाशिक शहरातल्या वृक्षतोडीच्या मुद्यावर हरित लवादानं यापूर्वी दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. नाशिक मध्ये कुंभमेळ्याच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड प्रस्तावित आहे. त्याप्रकरणी मनीष बाविस्कर यांनी नाशिक महापालिकेविरुद्ध याचिका दखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीत महापालिकेनं स्थगिती आदेश मागे घेण्याची मागणी केली होती, मात्र हरित लवादानं ती फेटाळून लावत १९ जूनपर्यंत वृक्षतोडीवरील बंदी कायम ठेवली आहे.

****

राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट असून, अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाली आहे. ५५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून, उर्वरित रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

सामोआ इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ गट भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल चार सुवर्णपदकं पटकावली. पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात सुनील सिंग याने २७१ किलो तर अभिनोब गोगोई याने ७१ किलो वजनी गटात एकूण २८४ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरलं. चारू पेसी याने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं तर महिलांच्या ५८ किलो वजनी गटात १८५ किलो वजन उचलून ऐसांगफा गोगोई हिने सुवर्णपदक मिळवलं.

****

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 29 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 April-2026
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۹۲/اپریل ۶۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہیں خاص خبروں کی سرخیاں:
٭ غیر مراٹھی رکشہ اور ٹیکسی ڈرائیوروں کو مراٹھی سکھانے کیلئے یکم مئی سے خصوصی مہم کا ہوگا آغاز۔
٭ قانون ساز کاؤنسل اور ضمنی انتخابات کیلئے بھارتیہ جنتا پارٹی کی جانب سے امیدواروں کے ناموں کا اعلان۔
٭ ریاست کا علیحدہ بیج قانون بنانے کیلئے مرکزی حکومت کو تجویز پیش کی جائیگی: ریاستی وزیرِ زراعت دتاتریہ بھرنے کی اطلاع۔
٭ مزدوروں کو بڑھتے درجہئ حرارت اور گرمی کی لہروں سے بچانے کیلئے مرکزی حکومت نے رہنماء خطوط کیے جاری۔
اور۔۔۔٭ مراٹھواڑہ میں گرمی کی لہر برقرار؛ پربھنی میں درجہئ حرارت 43 ڈگری سے زیادہ۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
غیر مراٹھی رکشہ اور ٹیکسی ڈرائیوروں کو مراٹھی سکھانے کیلئے آئندہ یکم مئی سے 15 اگست کے درمیان ایک خصوصی مہم چلائی جائیگی۔ ریاست کے نقل و حمل کے وزیر پرتاپ سرنائیک نے یہ اطلاع دی۔ وزیرِ موصوف کل ممبئی میں محکمہئ ٹرانسپورٹ کے عہدیداروں کی میٹنگ کے بعد صحافیوں سے بات کررہے تھے۔ انھوں نے بتایا کہ ان کا محکمہ مراٹھی سکھانے کیلئے ایک کمیٹی تشکیل کرے گا جو مراٹھی نہ جاننے والے رکشہ اور ٹیکسی ڈرائیورس کا ریکارڈ رکھے گی۔ سرنائیک نے بتایا کہ مراٹھی سیکھنے والوں کیلئے آر ٹی او آفس میں جگہ فراہم کی جائیگی۔ انھوں نے بتایا کہ ریاستی حکومت نے ان ڈرائیوروں کے خلاف کوئی بھی کارروائی نہ کرنے کا فیصلہ کیا ہے‘ تاہم غیر قانونی نقل و حمل میں ملوث مسافروں کو دھوکہ دینے والے اور قواعد کی خلاف ورزی کرنے والے ڈرائیوروں پر کارروائی کی جائیگی اور اس سلسلے میں ان کے لائسنس بھی منسوخ کیے جاسکتے ہیں۔
***** ***** *****
وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے اس یقین کا اظہار کیا ہے کہ پنڈھرپور کاریڈور کی تکمیل کے بعد شولاپور کی اقتصادی ترقی کو حقیقی معنوں میں فروغ ملے گا۔ وزیرِ اعلیٰ کل شولاپور میں بھارتی جنتا پارٹی کے ایک اجتماع سے خطاب کررہے تھے۔ انھوں نے بتایا کہ مرکزی حکومت نے ناسک-شولاپور- اکل کوٹ قومی شاہراہ کیلئے 20 ہزار کروڑ روپئے مختص کیے ہیں۔
اسی دوران وزیرِ اعلیٰ نے بارشی میں وزیرِ اعظم رہائشی اسکیم اور رمائی رہائشی اسکیم کے استفادہ کنندگان میں مکانات کی چابیاں تقسیم کیں۔
***** ***** *****
بھارتیہ جنتا پارٹی نے کل قانون ساز کاؤنسل اور ضمنی انتخابات کیلئے اپنے امیدواروں کے ناموں کا اعلان کردیا۔ ان میں پرگیا ساتو‘ سنیل کرجتکر، مادھوی نائیک‘ سنجئے بھینڈے‘ ویویک کولہے‘ پرمود جٹھار شامل ہیں۔ کانگریس سے بی جے پی میں شامل ہونے والی پرگیا ساتو کو ان کی خالی نشست پر دوبارہ امیدواری دی گئی ہے۔
***** ***** *****
وزیرِ زراعت دتاتریہ بھرنے نے تمام سفارشات سمیت ریاست کے علیحدہ بیج قانون کی تجویز مرکزی حکومت کو پیش کرنے کی ہدایت دی ہے۔ وزیرِ موصوف کل اس خصوص میں منترالیہ میں منعقدہ ایک اجلاس سے خطاب کررہے تھے۔ اس نئے تجویز کردہ قانون میں بیج تیار کرنے والوں‘ پروسیسنگ مراکز‘ ڈسٹری بیوٹرز‘ تاجروں اور نرسریوں کے رجسٹریشن کو لازمی قرار دینے کا ارادہ ہے۔ یہ قانون کسانوں کو برانڈیڈ ناموں کے بغیر اپنے بیجوں کو ذخیرہ کرنے‘ استعمال کرنے‘ تبادلہ کرنے اور فروخت کرنے کیلئے قانونی تحفظ فراہم کرتا ہے۔
***** ***** *****
خواتین کے خلاف مظالم کی روک تھام کیلئے ریاست کے تمام سرکاری‘ نیم سرکاری اور نجی اداروں میں ایک داخلی کمیٹی کی تشکیل لازمی ہے۔ اگر یہ کمیٹی قائم نہیں کی گئی تو سخت کارروائی کی جائیگی‘ جس میں 50ہزار روپؤں تک کا جرمانہ شامل ہے اور اس کی خلاف ورزی کو دہرائے جانے کی صورت میں جرمانے کی رقم میں اضافہ کیا جاسکتا ہے یا لائسنس منسوخ کیا جاسکتا ہے۔ خواتین اور بچوں کی ترقی کے محکمے کے کمشنر جگدیش منیار نے یہ اطلاع دی۔ اگر کسی دفتر میں خواتین کی اس داخلی کمیٹی سے متعلق معلومات فراہم کرنے والا بورڈ آویزاں نہیں کیا گیا ہے تو خواتین ٹول فری ہیلپ لائن نمبر 181 پر شکایت درج کرائیں۔ کمشنر جگدیش منیار نے یہ اپیل کی ہے۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
مزدوروں کو بڑھتے ہوئے درجہ حرارت اور گرمی کی لہروں سے بچانے کیلئے مرکزی حکومت نے تمام ریاستوں اور مرکز کے زیرِ انتظام علاقوں کیلئے رہنماء خطوط جاری کیے ہیں۔ اس سلسلے میں حکومت نے تمام ریاستوں اور مرکز کے زیرِ انتظام علاقوں کے چیف سیکریٹریوں اور ایڈمنسٹریٹرس کو خط لکھا ہے۔ ایمپلائز اسٹیٹ انشورنس کارپوریشن (ESIC) اور محنت کشوں کی فلاح و بہبود کے حکومتی ادارے کے ڈائریکٹر جنرل کے دائرہئ اختیار میں آنے والے تمام اسپتالوں اور صحت مراکز میں مزدوروں اور کارکنوں کیلئے‘ پینے کے پانی‘ کام اور آرام کیلئے ٹھنڈی جگہوں کا انتظام کرنے اور گرمی کی لُو لگنے پر فوری علاج کی خاطر ہیلپ رومز قائم کرنے کی ہدایت دی گئی ہے اور کہا گیا ہے کہ تمام ادارے اس سلسلے میں کی گئی کارروائی کی رپورٹ 15 دنوں میں پیش کریں۔
***** ***** *****
چھترپتی سمبھاجی نگر میں روزانہ 400 سے زائد مریض‘ سردرد‘ پیٹ درد‘ جلاب‘ گرمی سے تھکاوٹ سمیت مختلف شکایات کے باعث طبّی مراکز پر علاج کیلئے آرہے ہیں۔ ضلع صحت افسر ڈاکٹر ابھئے دھانورکر نے کہا ہے کہ ان میں ہیٹ اسٹروک کا کوئی مریض نہیں ہے۔ دھانورکر نے شہریان سے اپیل کی کہ وہ بڑھتی گرمی سے خود کو بچائیں اور لُو لگنے کی علامات نظر آنے پر فوری طبّی مراکز سے رابطہ کریں۔
***** ***** *****
گذشتہ 24 گھنٹوں کے دوران ودربھ‘ کوکن اور وسطی مہاراشٹر کے چند مقامات پر درجہ حرارت میں نمایاں اضافہ ہوا ہے، جبکہ مراٹھواڑہ میں یہ اضافہ معمولی ہے۔ ریاست میں کل سب سے زیادہ درجہ حرارت امراوتی میں 46.6 ڈگری سیلسیئس ریکارڈ کیا گیا۔ مراٹھواڑہ کے پربھنی میں 43.5 تپش درج کی گئی‘ وہیں چھترپتی سمبھاجی نگر‘ بیڑ اور دھاراشیو میں اوسط درجہ حرارت 42 ڈگری سیلسیئس ریکارڈ کیا گیا۔
محکمہ موسمیات نے آئندہ دو دنوں میں وسطی مہاراشٹر‘ مراٹھواڑہ اور ودربھ میں چند مقامات پر بجلی کی چمک اور بادلوں کی گرج کے ساتھ بارش ہونے کا امکان ظاہر کیا ہے۔
***** ***** *****
ریاست ِ مہاراشٹر کے حقِ خدمات قانون کے مؤثر نفاذ کیلئے بیڑ ضلع کو اوّل مقام دیا گیا ہے۔ گذشتہ برس ضلع میں درج شدہ خدمات کیلئے موصول ہونے والی درخواستوں میں سے 40 فیصد کو مقررہ مدت میں نمٹا دیا گیاتھا۔ حقِ خدمات دن کے موقع پر کل ممبئی میں منعقدہ ایک پروگرام میں ضلع کلکٹر ویویک جانسن کو خصوصی طور پر مبارکباد دی گئی۔
دھاراشیو میں کل حقِ خدمات دن کی مناسبت سے ضلع کلکٹر کیرتی کرن پجار کی موجودگی میں ایک پروگرام کا انعقاد کیا گیا۔ اس موقع پر انھوں نے توقع ظاہر کی کہ مختلف سرکاری محکموں کی جانب سے شہریوں کو فراہم کرنے والی خدمات بروقت‘ شفاف اور مؤثر انداز میں دی جانی چاہیے۔ اس موقع پر دھاراشیو کے سب ڈویژنل افسر اومکار دیشمکھ کو مہاراشٹر رائٹ ٹور سروسیز ایکٹ کے تحت ان کی بہترین کارکردگی کیلئے اعزاز سے نوازا گیا۔
پربھنی ضلع کلکٹر دفتر میں کل ”حقِ خدمت دن“ منایا گیا۔ اس موقع پر ضلع کلکٹر سنجئے سنگھ چوہان نے حاضرین کو خدمت کے عہد کا حلف دلایا اور پیغام دیا کہ عوامی خدمت ہی اصل ذمہ داری ہے۔ اس موقع پر 90 فیصد سے زائد درخواستوں پر کارروائی کرنے والے دس افسران کو مبارکباد دی گئی۔
لاتور ضلع کلکٹر دفتر میں کل حقِ خدمت دن کی مناسبت سے احاطے میں آدرش سیتو کیندر کا افتتاح اضافی ضلع کلکٹر شلپا کرمرکر نے کیا۔ اس سیتو کیندر کی حال ہی میں ازسرِ نو تزئین و آرائش کی گئی ہے۔ اس موقع پر موجود شہریان میں مختلف سرکاری اسناد تقسیم کی گئیں۔
***** ***** *****
دھاراشیو نگر پریشد کا اجلاس ِ عام کل صدرِ بلدیہ نیہا کاکڑے کی زیرِ صدارت منعقد کیا گیا۔ اس موقع پر اہم اُمور کی منظوری دی گئی۔ اس اجلاس میں ابھئے یوجنا کی مدت میں توسیع کرنے کا فیصلہ کیا گیا۔ جسے حکومت نے شہریان کی بحالی کے معاملے میں راحت فراہم کرنے‘ پینے کے صاف پانی کی فراہمی کو یقینی بنانے اور پارکنگ کیلئے جگہ فراہم کرنے کی خاطر شروع کی تھی۔
***** ***** *****
مردم شماری 2027 کے پہلے مرحلے میں گھروں کی فہرست سازی کے عمل کو مکمل طور پر ڈیجیٹل طور پر نافذ کیا جائے گا اور شہریان کو ”خودگنتی“ کی سہولت فراہم کی جائیگی۔ یہ سہولت ویب سائٹ SE.census.gov.in پر یکم تا 15مئی 2026 تک دستیاب رہے گی۔ ضلع کلکٹر کیرتی کرن پجار نے دھاراشیو ضلع کے تمام محکموں سے سخت منصوبہ بندی کے ساتھ ”خود گنتی“ کی مہم کو مؤثر طریقے سے نافذ کرنے کیلئے تیار رہنے کی اپیل کی ہے۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
اور آخر میں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر...
٭ غیر مراٹھی رکشہ اور ٹیکسی ڈرائیوروں کو مراٹھی سکھانے کیلئے یکم مئی سے خصوصی مہم کا ہوگا آغاز۔
٭ قانون ساز کاؤنسل اور ضمنی انتخابات کیلئے بھارتیہ جنتا پارٹی کی جانب سے امیدواروں کے ناموں کا اعلان۔
٭ ریاست کا علیحدہ بیج قانون بنانے کیلئے مرکزی حکومت کو تجویز پیش کی جائیگی: ریاستی وزیرِ زراعت دتاتریہ بھرنے کی اطلاع۔
٭ مزدوروں کو بڑھتے درجہئ حرارت اور گرمی کی لہروں سے بچانے کیلئے مرکزی حکومت نے رہنماء خطوط کیے جاری۔
اور۔۔۔٭ مراٹھواڑہ میں گرمی کی لہر برقرار؛ پربھنی میں درجہئ حرارت 43 ڈگری سے زیادہ۔
***** ***** *****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी एक मे पासून विशेष मोहीम राबवली जाणार

·      विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक आणि पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची घोषणा

·      राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करण्याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

·      वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटांपासून कामगारांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वं जारी

आणि

·      मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम, परभणीचं तापमान ४३ अंशांवर

****

मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, ही घोषणा केली. परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठी प्रशिक्षणासाठी परिवहन विभाग एक समिती स्थापन करेल, ही समिती ज्यांना मराठीत संवाद साधता येत नाही त्यांची नोंद ठेवेल. तसंच ज्यांना मराठी शिकण्याची इच्छा आहे, त्यांना आरटीओ कार्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाईल, असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

दरम्यान, अशा चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या, प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या, तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल, त्यांचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

****

पंढरपूर कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल सोलापूर इथं भारतीय जनता पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक – सोलापूर – अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र शासनानं वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, बार्शी इथं प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं.

****

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक आणि पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे काल उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये प्रज्ञा सातव, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना त्यांच्याच रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

****

राज्याचा सर्व शिफारशींसह  स्वतंत्र बियाणे कायदा करण्याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. नव्या कायद्यात बियाणे उत्पादक, प्रक्रिया केंद्र, वितरक, विक्रेते आणि रोपवाटिका यांची नोंदणी सक्तीची करण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणं, वापरणं, देवाणघेवाण करणं आणि ब्रँडेड नाव न वापरता विक्री करणं, यासाठी कायदेशीर संरक्षण देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे.

****

महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा यासाठी राज्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. समिती स्थापन न केल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड, पुनरावृत्ती झाल्यास दंडाच्या रकमेत वाढ किंवा परवाना रद्द करणं, यासारखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली. एखाद्या कार्यालयामध्ये अंतर्गत समितीबाबत माहिती दर्शवणारा फलक नसल्यास महिलांनी १ ८ १  या टोल-फ्री हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

डिजिटल अटकेच्या प्रकारात सहभागी असलेल्या नऊ हजार ४०० मोबाइल क्रमांकांवर व्हॉट्सॲपनं जानेवारीपासून बंदी घातली आहे. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. रिझर्व्ह बँक, तंत्रज्ञान कंपन्या आणि केंद्रीय अन्वेषण संस्था-सीबीआय यांच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं यासंदर्भात स्वतः खटला दाखल करून घेतला होता.

****

वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटांपासून कामगारांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत. यासंदर्भात सरकारने सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहिलं आहे. कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि काम तसंच विश्रांतीसाठी थंड जागांची व्यवस्था करावी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि कामगार कल्याण महासंचालक यांच्या अखत्यारीतील रुग्णालयं तसंच आरोग्य केंद्रांना उष्माघातावर तत्काळ उपचारासाठी मदत कक्ष स्थापन करावे, तसंच सर्व संस्थांनी याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

**

छत्रपती संभाजीनगर इथं उन्हामुळे डोकेदुखी, पोटदुखी, अतिसार, थकवा यांसह विविध तक्रारींचे दररोज चारशेहून अधिक रुग्ण आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत आहेत. यामध्ये उष्माघाताचे रुग्ण नसल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितलं. नागरिकांनी वाढत्या उन्हापासून बचाव करावा, आणि उष्माघाताची लक्षणं दिसल्यास, तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन धानोरकर यांनी केलं आहे.

**

गेल्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय तर मराठवाड्यात किंचित वाढ झाली आहे. राज्यात काल सर्वाधिक तापमान अमरावती इथं ४६ पूर्णांक ६ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव इथं सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

****

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षात, अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जापैकी ९१ पूर्णांक ४० टक्के अर्जांचा विहित कालावधीत निपटारा केल्याब‌द्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा काल मुंबईत द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला.

**

धाराशिव इथं सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा वेळेत, पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांना यावेळी गौरविण्यात आलं.

**

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन काल साजरा झाला. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपस्थितांना सेवेच्या बांधिलकीची शपथ देत, “लोकसेवा हीच खरी जबाबदारी” असल्याचा संदेश दिला. प्राप्त अर्जांपैकी ९० टक्क्यांहून अधिक अर्जांचा वेळेत निपटारा करणाऱ्या दहा अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

**

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नूतनीकरण करण्यात आलेल्या आदर्श सेतू केंद्राचं अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय दाखले तसंच प्रमाणपत्रांचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आलं.

****

धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा काल नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. वसुली संदर्भात शासनाने खास नागरिकांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेचा कालावधी वाढवणं, पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावं यासाठी उपाययोजना करणं तसंच वाहनतळासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्णय यावेळी घेण्यात आले.

****

जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात घर सूचीकरण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवण्यात येणार असून नागरिकांसाठी स्व-गणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परवा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत se.census.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी काटेकोर नियोजनासह स्व-गणना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूरच्या माजी आमदार शंकुतलादेवी नंदकिशोर शर्मा यांचं काल अल्पशा आजाराने निधन झालं, त्या ७३ वर्षांच्या होत्या. १९८० मध्ये त्यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. कॉंग्रेस पक्षाकडून त्यांनी जालना पालिकेची निवडणूकही लढवली होती.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...