Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४
ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** रक्त
नाते
संबंधातल्या
जात
वैधता
प्रमाणपत्राच्या आधारे
कुटुंबातल्या
इतर
व्यक्तींना
जात
वैधता
प्रमाणपत्र
देण्याचा
राज्य सरकारचा निर्णय
** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रूपयांची घट
** औरंगाबाद शहरातल्या हिमायत बाग एन्काउंटर दरम्यान अटक केलेल्या सिमी संघटनेच्या
दोघा दहशतवाद्यांना दहा वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा
आणि
** मराठवाडा
लेखिका
साहित्य
संमेलनाच्या
अध्यक्षपदी
बीडच्या
केशरकाकू
महाविद्यालयाच्या प्राचार्य
डॉ.
दीपा
क्षीरसागर
यांची
निवड
****
रक्त
नाते
संबंधातल्या
जात
वैधता
प्रमाणपत्राच्या आधारे
कुटुंबातल्या
इतर
व्यक्तींना
जात
वैधता
प्रमाणपत्र
देण्याचा
निर्णय
मंत्रिमंडळानं काल घेतला. वडील, सख्खे चुलते किंवा वडिलांकडील
रक्ताच्या नात्यातल्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असणाऱ्या जात वैधता
प्रमाणपत्राला महत्त्वाचा पुरावा मानून अर्जदारास जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. रक्त नाते संबंधातल्या जात वैधता प्रमाणपत्रासह प्राप्त झालेल्या अर्जावर
१५ दिवसांत आक्षेप मागवण्यात येतील,
त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. या प्रमाणपत्रांची उपलब्धता
सुलभतेनं होण्यासाठी डिजिटल लॉकर सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची
फवारणी
करताना गेल्या काही दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मदत
देण्याचा
निर्णयही
काल घेण्यात आला.
या
प्रकरणाची
गृह
विभागाचे
अतिरिक्त
मुख्य
सचिव
यांच्या
समितीमार्फत
चौकशी
करण्याचा
आणि
अशा
घटना
टाळण्यासाठी
शेतकऱ्यांना मोफत मास्क वाटप करण्यात येणार आहे.
मुंबईत प्रभादेवी
-परळ
पादचारी
पूल
दुर्घटनेसारखे प्रकार भविष्यात घडू
नयेत
यादृष्टीनं
उपाययोजना
करण्यासाठी
मंत्रिमंडळ
उपसमिती
नेमण्याचा
निर्णय
काल मंत्रिमंडळानं घेतला.
****
दरम्यान, मुंबईत रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना
५ लाख तर कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना
दोन लाख रुपये देणं हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, अशी टीका शेतकरी आंदोलन सुकाणू समितीने
केली आहे. मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली २ लाख रुपयांची
मद्त अत्यल्प असून, राज्य सरकारनं १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार
बच्चू कडू यांनी केली आहे. मुंबईत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याच्या दुर्घटनेची
ज्या प्रमाणे तातडीने दखल घेण्यात आली त्या प्रमाणेच शेतकऱ्यांच्या मृत्यूचीही दखल
घेतली जावी असं कडू यांनी म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रूपयांनी घट केली
असून मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचा
अबकारी कर कमी केल्यानं ही कपात करण्यात आली आहे. अमेरिकेत आलेल्या चक्रीवादळामुळे
तिथल्या पेट्रोल शोधक कंपन्या बंद पडल्या कारणानं आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम
पदार्थांच्या किंमती वाढू लागल्या आहेत, या दरवाढीची जनतेला झळ पोहोचू नये म्हणून केंद्र
सरकारनं हा कर कपातीचा निर्णय घेतला आहे.
****
औरंगाबाद इथं २०१२ साली दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं हिमायतबाग भागात झालेल्या
एन्काउंटर दरम्यान अटक केलेल्या स्टुडंट्स
ऑफ इस्लामिक मुव्हमेंट - सिमी या प्रतिबंधित संघटनेशी संबंध
असलेल्या दोघा दहशतवाद्यांना औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयानं दहा वर्ष सक्तमजुरी आणि
प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद अबरार उर्फ मुन्ना उर्फ इस्माईल अब्दुल बाबुखाँ आणि
मोहम्मद शाकेर हुसैन उर्फ खलील अकील खिलजी अशी
या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी ११ सप्टेंबर २०१७ रोजी सुनावणी सुरू होऊन २७ सप्टेंबर
रोजी सुनावणी पूर्ण झाली, त्यानंतर न्यायालयानं या दोघांना दोषी ठरवत, काल ही शिक्षा
सुनावली. मे २०१२ मध्ये औरंगाबाद शहरातल्या हिमायतबाग परिसरात झालेल्या या चकमकीत एक
दहशतवादी ठार तर एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी चार गावठी कट्टे, दोन
रिव्हॉल्वर आणि १७ जिवंत काडतुसं हस्तगत केली होती. या
प्रकरणात एटीएसनं आणखी दोन आरोपींना अटक केली होती, न्यायालयानं त्यांची सबळ पुराव्या
अभावी सुटका केली.
****
सरसकट कर्जमाफी केल्यावर निकषांची गरज काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. ते काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या नियम आणि अटींविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. येत्या पाच नोव्हेंबरला औरंगाबाद इथं आयोजित शेती संबंधित अधिवेशनात आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. जपानची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु केल्याचं सांगत पवार यांनी, देशात महागाई, बेरोजगारी वाढत असल्याकडे लक्ष वेधलं.
****
परिवहन विभागानं काही लांब पल्ल्याच्या एसटी बसेसच्या तिकिटांच्या दरात वाढ
केली आहे. साध्या बसच्या तिकीट दरात १० टक्के, निमआराम बसच्या प्रवासासाठी १५ टक्के
आणि वातानुकुलित बससेवेत २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १४ आक्टोबरपासून ३१ आक्टोबरपर्यंत राहणार आहे अशी माहिती औरंगाबाद विभागाचे नियंत्रक आर.एन.पाटील यांनी दिली. दिवाळीनिमित्त
औरंगाबाद स्थानकावरुन विविध गावांना जाणाऱ्या २९ जादा एस.टी बसेस सोडल्या जाणार असल्याचंही
त्यांनी सांगितलं.
****
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या एकशे चौदाव्या जयंतीदिनानिमित्त काल विधान
भवन
परिसरात
त्यांच्या
प्रतिमेला
पुष्पहार
अर्पण
करुन
अभिवादन
करण्यात
आलं.
विधानसभा
अध्यक्ष
हरिभाऊ
बागडे,
विधिमंडळाचे
प्रधान
सचिव
डॉ.
अनंत
कळसे
यांच्यासह
इतर
वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी
रामानंद तीर्थ यांना यावेळी आदरांजली अर्पण केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या आठव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बीडच्या केशरकाकू महाविद्यालयाच्या
प्राचार्य
डॉ.
दीपा
क्षीरसागर
यांची
निवड
करण्यात
आली
आहे.
मराठवाडा
साहित्य
परिषदेचे
अध्यक्ष
कौतिकराव
ठाले
पाटील
यांनी
औरंगाबाद
इथं
वार्ताहर
परिषदेत
ही
माहिती
दिली.
क्षीरसागर
यांनी
संत
ज्ञानेश्वर
एवं
संत
मीराबाई
की
मधुराभक्ती
या
हिंदी
ग्रंथासह
नऊ
मराठी
पुस्तकं
लिहीली आहेत.
****
येत्या पाच ते १६ ऑक्टोबर दरम्यान
मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात काही
ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
याकाळात शेतकऱ्यांनी
कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठेवावा,
असं आवाहन कृषिमंत्री पांडुरंग
फुंडकर यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती तसंच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहिता आणि निवडणूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिले आहेत. नांदेड इथं निवडणूक आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन मधल्या ३७ मतदान केंद्रांवर मतदान केल्याची पावती देणारं व्ही व्ही पॅट यंत्र राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी प्रथमच वापरण्यात येणार आहे. या यंत्राचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामांना
गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं गावनिहाय नायब तहसिलदारांची नियुक्ती केली आहे. हा
मार्ग राज्यातल्या ११ जिल्ह्यांमधून जात असून अन्य जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाचं काम
वेगानं होत आहे मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात जमिनी ताब्यात घेण्यास विलंब होत असल्यामुळे
या नियुक्ती करण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्यावतीनं राबवण्यात येणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी
अपघात सानुग्रह अनुदान योजनेची परभणी जिल्ह्यातली १३ प्रकरणं जिल्हाधिकारी पी.शिवशंकर
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली.
****
अर्धांगवायुचा झटका आल्यामुळे अपंगत्व आलेल्या वायरमनचा पगार
काढण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड इथल्या महावितरण
कार्यालयातला कनिष्ठ लिपीक भगवान रामकर याला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली.
***
No comments:
Post a Comment