आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
न्यायमूर्ती रंजन गोगोई आज देशाचे ४६ वे सरन्यायाधीश
म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद
त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश तसंच पंजाब
आणि हरियाणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलेले गोगोई २३ एप्रिल
२०१२ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहत आहेत. १७ नोव्हेंबर २०१९
पर्यंत ते सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील.
****
भौतिकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार
तीन जणांना विभागून जाहीर झाला आहे. अमेरिकेचे आर्थर अशकिन यांना पाच लाख अमेरिकी डॉलरचा
तर फ्रान्सच्या गेरार्ड मौराऊ आणि कॅनडाच्या डोना स्टिकलॅण्ड यांना प्रत्येकी अडीच-अडीच
लाखाचा पुरस्कार मिळणार आहे. लेसर तंत्रज्ञानातल्या
संशोधनाबद्दल या तिघांना हा पुरस्कार मिळाला आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांना संयुक्त राष्ट्र संघाचा
‘चँपिअन्स ऑफ द अर्थ’ हा
पर्यावरणविषयक सर्वोच्च पुरस्कार आज प्रदान केला जाणार आहे. शाश्वत
विकास आणि हवामान बदलासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना गेल्या आठवड्यात
हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आज दिल्लीत प्रवासी भारतीय केंद्रात संयुक्त राष्ट्रांचे
सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या हस्ते दोन्ही नेत्यांना हा पुरस्कार
दिला जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
****
शिर्डी इथं श्री साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप,
येत्या १९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पालकमंत्री
राम शिंदे यांनी काल या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांच्या
हस्ते घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल वाटपही करण्यात येणार आहे. हा सोहळा
यशस्वी करण्यासाठी प्रत्येकानं आपल्याकडे असलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, अशा
सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिली.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं शतकोत्तर सुवर्ण
महोत्सवी जयंती वर्ष, विविध उपक्रमांद्वारे साजरं केलं जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून,
क्षणिक रागाच्या भरात गुन्हा घडलेले किंवा परिस्थितीमुळे गुन्हा करण्यास प्रवृत्त झालेल्या
कैद्यांपैकी सुमारे १०० कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment