आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
९ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक टपाल दिवस आज साजरा करण्यात येत आहे. १८७४
मध्ये स्वित्झर्लंड मधल्या बर्न इथं जागतिक टपाल संघाच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त
हा दिवस साजरा करण्यात येतो. टपाल विभागाचे संपूर्ण जगभरात सहा लाखांपेक्षा अधिक कार्यालयं
असून, हे जगातलं सर्वात मोठं नेटवर्क असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंटोनियो
गुटेरस यांनी या प्रसंगी म्हटलं आहे. यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमाला
दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा उपस्थित राहणार आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या
संबिधान बचाव-देश बचाव या अभियानांतर्गत आज औरंगाबाद इथं संविधान बचाव मेळाव्याचं आयोजन
करण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून
शहरातल्या जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी साडेअकरा वाजता मेळाव्याला सुरूवात
होणार आहे.
****
होमीओपॅथी विकासासाठी शासन कटीबद्ध असून होमिओपॅथी
डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं राज्याच्या वैद्यकीय
शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राज्यातल्या होमिओपॅथिक
वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करत होते. मुंबईच्या
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या वतीनं होमिओपॅथीच्या प्रचार आणि प्रसारासाठी या
पहिल्या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
दिनदयाल
उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेत नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजने अंतर्गत
राज्य शासनानं नांदेड जिल्हयास विविध प्रशिक्षणासाठी 863 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच
उद्दिष्ट दिलं होतं. त्यापैकी 756 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
****
बीड इथल्या जिल्हा उद्योग केंद्रात बीज भांडवल योजनेच्या
प्रस्तावाला मंजूरी देऊन बँकेला शिफारस करण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्वीकारतांना
उद्योग निरीक्षकास काल बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक
विभागानं रंगेहाथ पकडलं. शरद राठोड असं या उद्योग निरीक्षकाचं नाव आहे.
*****
***
No comments:
Post a Comment