आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ सप्टेंबर २०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशात कोविड - 19 च्या संक्रमणात
घट झाली असून हा दर आठ पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
संख्या ३७ लाख ६९ हजार ५२३ झाली आहे. आतापर्यंत २९ लाख रूग्ण या संक्रमणातून बरे झाले
असून बरे होण्याचा दर आता ७६ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. आतापर्यंत या आजारानं
६६ हजार ३३३ जण मरण पावले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील कोविड
बाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ६९४ झाली आहे. यापैकी १८ हजार ५९६ कोरोनाबाधित
रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आतापर्यंत ७०७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात
४ हजार ३९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मध्य रेल्वेनंही आजपासून
राज्यातर्गंत प्रवासासाठी रेल्वे तिकीट नोंदणी सुरू केली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेनं
एक पत्रक जारी केलं आहे. आरक्षण पद्धतीने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असून,
सध्या ज्या लांब पल्ल्याच्या २०० रेल्वे सुरु आहेत, त्याचं रेल्वेचं तिकीट आरक्षित
करता येईल, असं या पत्रकात म्हटलं आहे.
****
कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ
नेते, औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचं सकाळी साडे सहा वाजता निधन
झालं. ते 91 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या पाटील यांच्यावर
वैजापूर इथल्या रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी चार
वाजता वैजापूर तालुक्यातल्या दहेगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
नांदेडचे नामांकित प्रकाशक
आणि लेखक निर्मलकुमार सूर्यवंशी यांना ‘प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार’ प्रसाद वैद्यकीय
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि वाङमय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश
सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रुपये 5 हजार, सन्मानपत्र, आणि सन्मानचिन्ह
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा
करणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९४ पूर्णांक ५० शतांश टक्के झाला आहे. धरणात सध्या
१८ हजार ६११ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणात ९५ पूर्णांक ९९ शतांश
टक्क्यांपर्यंत पाणी साठवण्याची परवानगी आहे. त्यानंतरही आवक सुरू राहिल्यास, प्रशासनाच्या
वतीनं धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.
****
No comments:
Post a Comment