आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशात कोरोना विषाणू संसर्गावर
उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५२ लाख ७३ हजार २०१ झाली असून हे प्रमाण
८३ पूर्णांक ५३ शतांश टक्के झालं आहे. सध्या नऊ लाख ४० हजार ७०५ रुग्ण या संसर्गावर
उपचार घेत आहेत.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाचे
नवे ८६ हजार ८२१ रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ६३ लाख १२ हजार ५८४ झाली असल्याची
माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे
देशात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे एक हजार १८१ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या ९८ हजार ६७८ झाली आहे.
****
पाकिस्तानी सैन्यानं काल
रात्री जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक युद्धविरामाचं
उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला तर एक जखमी झाला आहे. सैन्य
दलानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यानं दिली
आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांचा आज वाढदिवस आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी,
गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणू संसर्ग झालेले एकूण ३३ हजार ६४८ रुग्ण आढळले असून सध्या पाच हजार २११ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत. या संसर्गाचे २७ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ९३७ रुग्णांचा
मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
नागपूर शहरात नागरिकांना
कोरोना विषाणू चाचणी सहजतेने उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेतर्फे प्रत्येक विभागामधे
फिरत्या चाचणी केंद्राची सुविधा देण्यात आली आहे. महापालिकेच्या बारा बस गाड्या या
फिरत्या चाचणी केंद्रामधे रुपांतरित करण्यात आल्या आहेत.
****
सांगली जिल्ह्यात वाळवा,
शिराळा, पलूस आणि कडेगांव या चार तालुक्यांसाठी इस्लामपूर इथं स्वतंत्र सहकार न्यायालय
सुरु होणार असून या न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज येत्या आठवडा भरात सुरु होणार आहे.
****
No comments:
Post a Comment