आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ एप्रिल २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या आणि वाढता मृत्यू दर पाहता केंद्र सरकारनं महाराष्ट्र,
छत्तीसगढ आणि पंजाबमध्ये जन स्वास्थ्य दल पाठवले आहेत. महाराष्ट्रातल्या ३०, छत्तीसगढमधल्या
११ आणि पंजाबमधल्या नऊ जिल्ह्यांमध्ये हे दल पाठवण्यात आले आहेत. कोविडचा प्रसार रोखणं,
प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात हे दल राज्य सरकारला सहकार्य करणार आहेत. दोन
सदस्यांच्या या उच्चस्तरीय दलात एक उपचार किंवा महामारी विशेषज्ञ आणि एक आरोग्य विशेषज्ञ
असेल.
****
केंद्रीय
आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन आज ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
यावेळी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.
****
तामिळनाडू,
केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी, तसंच आसाम आणि पश्चिम
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज सकाळी सुरु झालं. आसाममध्ये
४० जागांसाठी, पश्चिम बंगालमध्ये ३१ जागांसाठी, तामिळनाडू २३४, केरळ १४०, तर पुदुच्चेरीमध्ये
३० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे.
****
मराठवाड्यात
काल नव्या पाच हजार ४८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८१ रुग्णांचा
या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, नांदेड जिल्ह्यातल्या
२५, जालना अकरा, परभणी आठ, लातूर पाच, बीड तीन, उस्मानाबाद दोन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल एक हजार ४४० रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९०६, लातूर ८०४, बीड ५७५,
परभणी ५५३, जालना ५२४, उस्मानाबाद ४२३, तर हिंगोली जिल्ह्यात २६१ नवे रुग्ण आढळून आले.
****
मार्च
अखेरमुळे नाशिक जिल्ह्यातल्या बंद असलेल्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्या काल
सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी कांद्याचे भाव सुमारे शंभर ते दोनशे रुपयांनी घसरले, त्यामुळे
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला
कमीत कमी ५००, जास्तीत जास्त ९४० आणि सरासरी ७५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
उन्हाळ कांद्याच्या दरातही पन्नास ते शंभर रुपयांनी घसरण झाली. नांदगाव बाजार समितीत
लाल कांद्याला सरासरी ६२५ उन्हाळ कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला
आहे.
****
No comments:
Post a Comment