Sunday, 2 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 May 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील ताज्या स्थितीतीनुसार आसाम आणि केरळमध्ये सत्तारुढ पक्षांची सरसी झाली आहे तर पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेस पक्षाला आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे. मात्र तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सत्तारुढ पक्ष पिछाडीवर दिसत आहेत. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस १९४ जागांवर तर भाजपाने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. तामिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं ११३ जागांवर, सत्तारुढ ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम ७५ जागांवर, काँग्रेस १२, पी.एम.के. ९, भाजपा ४ तर सीपीआय आणि सीएमपी प्रत्येकी २ जागांवर  आघाडीवर आहे.

आसाममध्ये सत्तारुढ भाजपा ५६ जागांवर, काँग्रेस २९, असम गण परिषद १०, एआययुडीएफ ११ आणि यूपीपी ७ तर बोलोलँड पिपल्स फ्रंटने ३ जागांवर आघाडी घेतली आहे.

केरळमध्ये १४० जागांसाठी झालेल्या मतदानात सत्तारुढ एलडीएफ पक्ष ९० हून अधिक ठिकाणी आघाडीवर असून यु.डी.एफ. ४५ तर एनडीए ३ जागांवर आघाडीवर आहे.

पुद्द्‌चेरी या केंद्रशासित प्रदेशात एन आर काँग्रेस ६ जागांवर आणि भाजपा ३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डी.एम.के.नं प्रत्येकी १ जागेवर आघाडी घेतली आहे.

****

विविध राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरु आहे. राज्यातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूविधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत २२व्या  फेरी अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे हे ३ हजार ९४६ तांनी आघाडीवर आहेत. अवताडे यांना एकूण ६४ हजार ८१० तर त्यांचे प्रतिस्पर्धी भगीरथ भालके यांना ६० हजार ८६४ मते मिळाली आहेत.

गुजरातमधील मोरवा हदफ विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाजा उमेदवार आघाडीवर आहे, झारखंडमधील मधुपुर तर कर्नाटकच्या बाबासाकल्याण जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहे. कर्नाटकमधील मास्की आणि मध्य प्रदेशमधील दमोह विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. मिजोरममधल्या सरचिप मतदारसंघात जोरम पील्स मुव्हमेंट पक्षाचा मेदवार आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राजस्थानमधील तीनपैकी दो जागेवर काँग्रेस तर एका जागेवर भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे. तेलंगानामध्ये नागार्जुनसागर जागेवर तेलंगाना राष्ट्र समितीचा उमेदवार आघाडीवर आहे तर उत्तराखंडमधील सल्ट मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे.

****

देशात गेल्या २४ तासांत १८ लाख २६ हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या ८६ हजार २३ नागरिकांचा आहे. या वयोगटातल्या सर्वाधीक ५१ हजार युवकांचं लसीकरण गुजरात राज्यात करण्यात आलं.

राज्यातही अनेक ठिकाणी १८ वर्षावरील तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करून लसीकरण करून घेतलं. राज्यात काल या वयोगटातील नागरिकांसह इतर एकूण ९५ हजार ५३५ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. मराठवाड्यात काल २४ हजार ५३० नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन हजार ४५६ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातल्या तीन हजार ३५ जणांनी तर शहरात ४२१ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४२ हजार ३३९ जणांनी या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रा घेतल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ महेश लड्डा यांनी सांगितलं.

****

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काल एका दिवसात एकूण १८ लाख ४ हजार ९५४ नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  २९ कोटी, १ लाख, ४२ हजार, ३३९ चाचण्या घेण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे.

****

रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप काल हैद्राबाद इथं पोहोचली. पहिल्या खेपेत रशियाकडून स्पुटनिक लसींच्या दीड लाख कुप्या मिळाल्या आहेत.

****

केंद्र सरकारनं राज्य आपत्ती प्रतिसाद निधी - एसडीआरएफ चा पहिला भाग म्हणून आठ हजार ८७३ कोटी ६० लाख रुपये निधी राज्य सरकारांना आगाऊ दिला आहे. या रकमेच्या ५० टक्के रक्कम राज्य सरकारांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वापरता येणार आहे.

****

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल इथला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याला काल अमरावती जिल्ह्यातल्या धारणीच्या न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयायीन कोठडी सुनावली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी रेड्डी याला अटक करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच रेड्डी याला धारणी पोलीसांनी नागपुर इथून अटक केली होती.

//************//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...