आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात काही भागातल्या प्राथमिक शाळा आजपासून सुरु झाल्या.
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसंच खाजगी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या.
शाळेत विद्यार्थांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. शाळांमध्ये कोविड-19 संबंधी
नियम पाळण्यात येत असून, शिक्षण विभागाच्या वतीनं यावर देखरेख ठेवण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातही प्राथमिक शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांचं तापमान
मोजून शाळेत प्रवेश देण्यात आला.
मुंबई महानगरपालिका क्षेत्र, ठाणे जिल्हा, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका
क्षेत्रात, १५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर
महापालिकेनंही १० डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचं ठरवलं आहे. तर नांदेड जिल्ह्यात
१३ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत.
****
जागतिक एड्स विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. एचआयव्ही एड्स ग्रस्त लोकांना
मदत करणं आणि एड्सशी संबंधित गैरसमज दूर करून लोकांना शिक्षित करणं, हा या दिनाचा उद्देश
आहे. ‘विषमता नष्ट करा, एड्सला रोखा, साथरोगांना आळा घाला’, हे यंदाच्या एड्स दिनाचं
घोषवाक्य आहे.
****
केंद्रीय गृह मंत्रालयानं आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जारी करण्यात
आलेली कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वे ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहेत. एक आदेश जारी करून
गृह मंत्रालयानं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची
कठोर तपासणी आणि चाचणी करण्यास सांगितलं आहे.
****
राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य
आधारित शिक्षण मिळावं, आणि अशा तांत्रिक शिक्षणाचा त्यांना रोजगारासाठी उपयोग व्हावा,
म्हणून उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली.
****
नाशिक शहरात आज सकाळ पाऊस ढगाळ वातावरण असून, अनेक भागात हलका पाऊस होत
आहे. आज सकाळी नाशिक मध्ये किमान तापमान १९ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवले गेलं.
मुंबई, पालघर, सातारा, ठाणे जिल्ह्यातही आज पाऊस सुरु आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात
ढगाळ वातावरण आहे.
****
No comments:
Post a Comment