आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
भारतात
गुंतवणूक करण्यासाठी जगभरातल्या गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिलं असून गेल्या आर्थिक
वर्षात भारतामध्ये त्र्याऐंशी अब्जांहून अधिक अमेरिकी डॉलरची; थेट परदेशी गुंतवणूक
झाली आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी
परदेशी गुंतवणूक आहे.
****
केंद्रीय
आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्यमंत्री मुंजापारा महेन्द्र आणि सिक्किमचे मुख्यमंत्री
पी एस तमांग यांनी आ़ज सिक्किमच्या गंगटोक इथल्या बौध्द विहारात योग उत्सवाचं नेतृत्व
केलं. आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून २०२२ च्या तयारीच्या संदर्भात हा उत्सव घेण्यात
आला.
****
महाराष्ट्र
राज्य लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत कोकण विभागात या वर्षी ऑनलाईन पध्दतीनं एक
लाख ७९ हजार ५९१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी एक लाख एक्केचाळीस हजार २८५ अर्ज
निकाली काढण्यात आले आहेत. कोकण विभागात अव्वल कामगिरी झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र
राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली.
****
बिहार
राज्यात अवकाळी वादळ - वारा आणि वीज पडून झालेल्या नुकसानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात
आपण सहभागी असल्याचं तसंच राज्यातल्या परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष असल्याचं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे.
****
बँकॉक
इथं सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं
उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्य पूर्व सामन्यात सिंधूनं जपानच्या
अकाने यामागुची चा २१ - १५, २० - २२, २१ - १३ असा पराभव केला.
****
राज्यात
मराठवाडा तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून येत्या २४ तारखे दरम्यान
काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, अन्यत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं
वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment