Wednesday, 1 November 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०१ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीला भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या सत्ताधारी पक्षांसह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, लोकभारती पक्ष, राष्टीय समाज पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, महाराष्ट्र नवनिर्मान सेना, रिपब्लिकन पक्ष आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली संचारबंदी आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. या काळात शाळा -महाविद्यालयं आणि जिल्ह्यातल्या सर्व आस्थापना पूर्णपणे बंद आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आज भारताच्या साह्यातून तयार झालेल्या तीन विकास प्रकल्पांचं संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत. अखौरा-आगरताळा रेल्वेमार्ग, खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे मार्ग आणि मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या केंद्राचा त्यात समावेश आहे.

****

आर्मी एव्हिएशन कोअर आज ३८वा स्थपना दिवस साजरा करत आहे. भारतीय लष्करातल्या सर्वात तरुण कोअर पैकी एक असलेल्या आर्मी एव्हिएशन कोअरची एक नोव्हेंबर १९८६ रोजी एक स्वतंत्र शाखा म्हणून स्थापना करण्यात आली. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सर्व कोअर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी आर्मी एव्हिएशन कोअरच्या क्षमतेत वाढ होत असून, अत्यंत प्रभावीपणे काम करत असल्याचे गौरवोद्गार कोअरचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए के सुरी यांनी काढले आहेत.

****

चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. चिटफंड कायदा १९८२  मधल्या कलम ७०  नुसार चिटस् सहनिबंधकांनी दिलेल्या लवाद निर्णयाविरुद्ध दोन महिन्यांच्या मुदतीत वित्त मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. सध्या प्रलंबित असलेल्या चिटफंड अपीलांची संख्या पाहता, न्यायदानास होणारा विलंब टाळण्याकरता आणि अपीलकर्त्यांची सोय व्हावी, याकरता राज्य शासनास असलेले अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान करण्यात येतील.

****

No comments: