Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29
September 2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात या कार्यक्रम
मालिकेचा ११४वा भाग सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित झाला. या कार्यक्रमाला दहा
वर्षापूर्वी विजयदशमीच्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरुवात झाली होती. या
कार्यक्रमात अनेक प्रसंग असे आले त्यास कधीही विसरू शकत नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी
सांगितलं.
पुढं ते म्हणाले, मागील काही आठवड्यांपासून देशभर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं
संवर्धन करणे आवश्यक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जलसंरक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या
उपक्रमांमुळे पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यास मदत होणार आहे. मध्यप्रदेशातील झाशी, रयपुरा, खोंप गावातील अभिनव उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
तसंच येत्या २ ऑक्टोबरला ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीला
१० वर्षे पूर्ण होत आहेत. या अभियानाला लोकचळवळीचे रूप मिळालं आहे. महात्मा गांधीजींनी
त्यांचं संपूर्ण जीवन या उद्देशासाठी समर्पित
केलं होतं. त्या गांधीजींना देखील ही खरी श्रद्धांजली असल्यांचही मोदी यांनी सांगितलं.
नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला
सुमारे ३०० प्राचीन कलाकृती परत केल्या अहेत. त्यात काही कलाकृती चार हजार वर्षापेक्षा
जुन्या आहेत. जेव्हा आपणाला आपल्या वारशाचा अभिमान असतो तेव्हा जगही त्याचा आदर करतं
याची खात्री पटली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगातले अनेक देश आपल्याकडून गेलेल्या
कलाकृती आपल्याला परत करत असल्यांचं मोदी यांनी सांगितलं.
पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानानं देशाच्या कानाकोपऱ्यात चमत्कार घडवून आणला आहे.
उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान आणि तेलंगाणा राज्यांनी ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा
अधिक संख्येनं वृक्षारोपन करून नवा विक्रम केला. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन
मोदी यांनी यावेळी केलं.
‘मेक इन इंडिया’ या अभियानालाही दहा वर्ष पूर्ण झाली. या अभियानाच्या यशात देशातल्या
मोठ्या उद्योगांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत सर्वांचं योगदान मिळालं. भंडारा जिल्ह्यात
वस्त्रउद्योगाची भंडारा टसर सिल्क हॅण्डलूम ही एक जुनी परंपरा आहे. टसर रेशमाची नक्षी, संरचना, रंग आणि मजबूती ही त्याची ओळख आहे. भंडाऱ्याच्या काही भागांतले
५० पेक्षा अधिक स्वयंसहायता गट याच्या जपणुकीचं काम करत आहेत. यामध्ये महिलांचा मोठा
सहभाग आहे. हे रेशीम जलद गतीनं लोकप्रिय होत आहे. त्यामुळं आगामी सणासुदीच्या दिवसात
खरेदी करताना, काही भेटवस्तू देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन
की बातमधून केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या
विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन झालं. थोड्याच वेळेपूर्वी यासंदर्भातील कार्यक्रमास प्रारंभ झाला असून, याला मोदी संबोधीत करीत आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे
पंतप्रधान मोदी यात सहभागी झाले. पुण्यात आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल सी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासह इतर उपस्थित आहेत.
छत्रपती संभाजीनगर नजीक बिडकीन औद्योगिक प्रकल्प तसंच
पुण्याच्या शिवाजीनगर-स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, यासह पुण्याच्याच स्वारगेट-कात्रज या भुयारी मार्गाचं
आणि पुण्याच्या भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन-सोलापूर
विमानतळाचं उद्घाटनही यांचा यात समावेश आहे. एकंदर ११ हजार २४० कोटी रुपये खर्चाची
यासाठी तरतुद करण्यात आली. या विकासकामांचा आढावा घेणारी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे
प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली.
****
शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत
प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या अनुषंगानं, ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईच्या कुर्ला इंथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी
आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विशेष उपस्थिती
असणार आहे.
****
येत्या ३६ तासांत मराठवाड्यासह विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गोव्यासह शेजारच्या
राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
हिंगोली इथं जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये
तडजोडी आधारे प्रलंबित आणि दाखलपूर्व अशी तब्बल सव्वाशेहून जास्त प्रकरणं निकाली काढण्यात
आली.
****
धाराशिव जिल्ह्यात माकणीचा निम्न तेरणा धरण प्रकल्प शंभर
टक्के भरल्यानं काल इथं जलपूजन झालं.
महेश महाराज माकणीकर, शामचैतन्य महाराज यांच्यासह आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत
हा कार्यक्रम संपन्न झाला.
****
भारत- बांगलादेश दरम्यान कानपूर इथं सुरू कसोटी क्रिकेट
सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी पावसामुळं मैदान ओलं असल्यानं पहिलं सत्रात खेळ होऊ शकला
नाही. काल दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळं होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी भारतानं नाणेफेक
जिंकून बांग्लादेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं अणि बांगलादेशनं दिवसअखेर तीन बाद
१०७ धावा केल्या होत्या. भारताच्या आकाश दिपनं दोन तर आर.अश्विननं एक बळी टीपला आहे.
दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत एक शून्यनं पुढे आहे.
****
No comments:
Post a Comment