Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 October
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग-राज्यभरात
अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल
· महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार
यादी जाहीर
· गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन
आघाडीत प्रवेश
· अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला
घड्याळ चिन्ह वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
आणि
· न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय
महिला संघाचा ५९ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
राज्य
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जवळपास सर्वच
प्रमुख पक्षांच्या अनेक दिग्गज उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.
बीड
जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय
मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे
यावेळी उपस्थित होत्या.
हिंगोली
विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी, वसमत मधून जनसुराज्य शक्ती
पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, तर कळमनुरी मतदारसंघात विद्यमान
आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला.
परभणी
जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर
यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला.
जालना
विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे
आमदार कैलास गोरंट्याल तसंच त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल, तर भाजपा जालना विधानसभा
प्रमुख भास्कर दानवे यांनी अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे यांनी, बदनापूर मधून भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बबलू चौधरी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, कन्नड मधून महाविकास आघाडीकडून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदयसिंह राजपुत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे, फुलंब्री मधून बसपाचे अमोल
पवार, औरंगाबाद
मध्य मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे
विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पूर्वमधून बसपाकडून तीन अर्ज तर तीन अपक्ष, औरंगाबाद पश्चिम मधून बहुजन
समाज पार्टीचे कुणाल दांडगे यांनी, पैठण मतदार संघातून महायुतीकडून शिवसेनेचे विलास भुमरे, तर गंगापूर मधून महायुतीकडून
भाजपचे प्रशांत बंब, यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी काल उमेदवारी काल अर्ज दाखल केले.
लातूर
जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीण मधून धीरज
देशमुख, अहमदपूर
मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा इथून भाजपचे संभाजी
पाटील निलंगेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लिंगनअप्पा रेशमे, तर औसा मतदारसंघातून शिवसेना
ठाकरे गटाकडून संतोष सोमवंशी यांनी काल अर्ज दाखल केले.
धाराशिव
जिल्ह्यात भूम - परंडा - वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत
यांनी अर्ज दाखल केला. उस्मानाबाद मतदारसंघात बसपाचे सुभाष गायकवाड, तुळजापूर मधून भाजपचे आमदार
राणाजगजितसिंह पाटील तसंच माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांच्यासह बहुजन समाज पक्षाच्या वतीनं दोन तर एका
अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. उमरगा मतदारसंघात दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
नांदेड
लोकसभा मतदारसंघात काल काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज
दाखल झाला असून, लोकसभेसाठी आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले
आहेत. आठ विधानसभा मतदारसंघासाठी १६ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
अहिल्यानगर
जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, पारनेर मधून खासदार निलेश
लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी, राहुरी मधून भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी, अकोले इथून राष्ट्रवादी
काँग्रेसचे डॉक्टर किरण लहामटे यांनी, तर अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज
दाखल केला.
****
येवल्यामधून
राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी
काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
हर्षवर्धन पाटील, मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर, ठाणे विधानसभा मतदार संघातून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे तसंच मनसेचे अविनाश जाधव, महाविकास आघाडीकडून कळवा-मुंब्रा
विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मधून आदित्य ठाकरे, यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून
भाजपचे अशोक उईके, दक्षिण सोलापूर मधून भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख, तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेस
पक्षानं ४८ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये कराड पश्चिम मतदार संघातून
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साकोली-नाना पटोले, ब्रह्मपुरी-विजय वडेट्टीवार, तेओसा-यशोमती ठाकूर, संगमनेर -विजय बाळासाहेब
थोरात तर पलूस इथून विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांना उमेदवारी
देण्यात आली आहे, लातूर ग्रामीण धीरज देशमुख, हदगाव माधवराव पाटील, भोकर - तिरुपती कोंडेकर, नायगाव - मिनल पाटील खतगावकर, पाथ्री - सुरेश वरपुडकर, तर फुलंब्री मतदारसंघातून - विलास औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल ४५ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये
बारामती मतदार संघातून युगेंद्र पवार, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, मुंब्रा-जितेंद्र आव्हाड, तासगाव मधून रोहित आर पाटील
तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाड्यात घनसावंगी मतदार
संघातून माजी मंत्री राजेश टोपे यांना, वसमत-जयप्रकाश दांडेगावकर, अहमदपूर-विनायक पाटील, उदगीर -सुधाकर भालेराव, भोकरदन-चंद्रकांत दानवे, किनवट-प्रदीप नाईक, जिंतूर-विजय भांबळे, केज-पृथ्वीराज साठे, बदनापूर-रुपकुमार उर्फ बबलू
चौधरी, आष्टी मतदार संघातून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदार
संघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी
न मिळाल्याने त्यांनी काल प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये
प्रवेश केला.म्हाविकास आघाडीनं या मतदार संघात शिवसेनेचे
विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर दिली आहे.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, नाशिक जिल्ह्यात नांदगाव
विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, नाशिक शहरातल्या चारही मतदारसंघात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त
केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल नाशिकमधल्या काँग्रेस भवनला कुलूप लावून आपला
संताप व्यक्त केला.
****
श्रोते
हो, विधानसभा
निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी
७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर
जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
विधानसभा
निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ हे चिन्ह वापरण्याची
सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेला अर्ज फेटाळण्यात आला. अजित पवार गटाने घड्याळ
हे चिन्ह वापरताना, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख प्रत्येक वेळी
करावा, असे
आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्यात
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात
येत आहेत. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं
आहे...
Byte…
छत्रपती
संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात काल मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद
या कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन
केलं.
****
नांदेड
विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वीपकक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या
संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्राम विकास विभागाचे
प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.
****
महिला
क्रिकेटमध्ये, न्यूझीलंडविरुद्धच्या
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ५९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय
महिला ४५व्या षटकात २२७ धावांवर सर्वबाद झाल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा
संघ १६८ धावाच करु शकला. या मालिकेतला दुसरा सामना परवा रविवारी अहमदाबाद इथं होणार
आहे.
****
भारत
आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या
दुसऱ्या सामन्यात काल पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने
सात गडी बाद केले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी गमावत १६
धावा झाल्या होत्या.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया निर्भय तसंच निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी
सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हा नियोजन
सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं काल एका
व्यक्तीकडून बेहिशेबी साडे सात लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली.
****
बंगालच्या
उपसागरात निर्माण झालेलं दाना चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीवर
धडकलं. परिणामी ओडिशाच्या केंद्रपाडा आणि भद्रक जिल्ह्यात सुमारे १२० किलोमीटर प्रतितास
वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे
सरकलं आहे.
****
No comments:
Post a Comment