आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८
नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीर मधल्या शोपिया जिल्ह्यात आज सकाळी
सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत दोन स्थानिक दहशतवादी मारले गेले. रेबेन
परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चकमकीच्या ठिकाणाहून
हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मध्य रेल्वे मार्गावरच्या कल्याण इथला ब्रिटिशकालीन
पत्रीपूल आज पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द
तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड एक्स्प्रेस,
जालना - दादर - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.
****
मराठा आरक्षण म्हणजे मागील दोन वर्षात मराठा समाजानं
राज्यभरात काढलेले शिस्तबद्ध मोर्चे आणि त्यासाठी युवकांनी दिलेल्या बलिदानाचं प्रतिनिधित्व
असल्याचं गुजरातच्या पाटीदार आंदोलनाचे प्रणेते हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.
जालना इथं काल आयोजित मराठा आरक्षण आणि दुष्काळ परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर केला, परंतू कुठल्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत, असं ते म्हणाले. विमा कंपन्या पीक विमा योजनेच्या माध्यमातून करोड रुपये गोळा करून शेतकऱ्यांना हक्काची विमा रक्कम देत नाही, असं सांगून पटेल यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

रस्ते सुरक्षेसाठी राज्य शासनानं आज राज्यभरात महावॉकेथॉन
रॅलीचं आयोजन केलं आहे. यानिमित्त लातूर इथं आज सकाळी साडे सात तर नांदेड इथं सकाळी आठ वाजता रॅली काढण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर, मुखेड आणि उमरी या तालुक्यात दुष्काळ सदृश्य
परिस्थिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर विविध
उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद इथं रामकृष्ण आश्रमात
उभारण्यात आलेल्या श्री रामकृष्ण मंदिराचा लोकार्पण सोहळा काल पार पडला. जगभरातून अनेक
मठाधिपती आणि संन्यासी या सोहळ्यास उपस्थित होते.
*****
***
No comments:
Post a Comment