आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह शिवसेना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी किमान समान
कार्यक्रम तयार करत असून हे काम अवघड नसल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं
आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आपण
गेल्या चोवीस तारखेपासून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं नमुद करत आहोत आणि उद्धव
ठाकरे तो करण्यासाठी सक्षम आहेत, असंही राऊत यांनी यावेळी नमुद केलं.
****
औरंगाबाद
सोलापूर महामार्गावर दोदडगाव पाटीजवळ औरंगाबादहून गेवराईच्या सूत गिरणीवर कामासाठी
जात असलेल्या मजुरांचं वाहन उलटून झालेल्या अपघातात बारा जण जखमी झाले आहेत. हे मजूर
मध्यप्रदेशातील आहेत. यातल्या दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी साडे सहा
वाजता हा अपघात झाला. वाहनातून वीस मजूर प्रवास करत होते.
****
भारतानं
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी तीन बाद एकशे बावन्न
धावा केल्या आहेत. इंदूर इथं सुरू या सामन्यात
भारतानं कालच्या एख बाद ८६ धावांवरून पुढं खेळण्यास प्रारंभ केल्यानंतर प्रारंभी दोन
फलंदाज झटपट गमावले. काल नाबाद राहिलेला चेतेश्र्वर पुजारा चोपन्न धावांवर बाद झाल्यानंतर
कर्णधार विराट कोहली शून्यावरच तंबूत परतला आहे. बांगलादेशनं पहिल्या डावात दिडशे धावा
केल्या आहेत.
****
भारतीय
महिला क्रिकेट संघानं वेस्टइंडीजविरुद्ध गयाना इथं झालेल्या तिसऱ्या टीट्वेंटी क्रिकेट सामन्यात सात गडी राखून विजय मिळवत मालिकाही
जिंकली आहे. भारतीय फिरकीपटूंनी वेस्टइंडीजचा डाव नऊ बाद एकोणसाठ धावांवर रोखला होता. रॉड्रीग्जनं केलेल्या नाबाद चाळीस धावांमुळे भारतीय
महिला संघानं हा सामना वीस चेंडू आणि सात गडी राखून जिंकला.
****
2022 मध्ये
होणा-या फीफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता, सामन्यात काल भारतानं अफगाणिस्तान
बरोबर एक- एक अशी बरोबरी साधत सामना अनिर्णित ठेवला. तजाकिस्तानमध्ये झालेल्या या सामन्याच्या
पूर्वार्धात अफगाणिस्ताननं गोल करून आघाडी घेतली होती. भारतानं सामन्याच्या त्र्याण्णवव्या
मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. या सामन्याच्या निर्णयानंतर भारताकडे एकूण चार सामन्यांत
तीन गुण झाले आहेत. भारताचे सलग तीन सामने अनिर्णित राहील आहेत.
****
No comments:
Post a Comment