आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज नव्या
५१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यानं जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या
१ हजार ७३ झाली असल्याचं जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये बायजीपुरा ७, किराडपुरा, सादात नगर, गल्ली नं. ६
इथं ४, सातारा गाव, आदर्श कॉलनी, गारखेडा ३
तर रोहिदास नगर, शिवशंकर कॉलनी, जटवाडा रोड, हिमायत बाग, पुंडलिक नगर, मुकुंदवाडी,
नारेगाव, जयभीम नगर, संजय नगर, रहीम नगर, कैलास नगर, गादल नगर, शिवनेरी कॉलनी, विद्या
नगर, सेव्हन हिल, गल्ली नं. 25, दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर, मकसूद कॉलनी, जाधववाडी,
गल्ली नं. 23 गारखेडा परिसर, मित्र नगर, मिल कॉर्नर, शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी, मुकुंद
नगर, प्रत्येकी १ तर अन्य ४ जणांचा आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा या भागातल्या
३ जणांचा समावेश आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये १७ महिला आणि ३४ पुरुषांचा समावेश
असल्याचंही जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
परभणी शहरातील साखला प्लॉट
भागात आज पहाटे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळं साखला प्लॉट आणि लगतच्या परीसर
आज सकाळी ७ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करीत असल्याचे
आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात आज एक कोरोनाविषाणू
बाधीत रुग्ण आढळून आला आहे. एकूण २४ संशयितांचे तपासणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाले.
त्यापैकी २३ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यात
आजपर्यंत ९८ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांपैकी ३० रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती उपजिल्हाधिकारी
प्रशांत शेळके यांनी दिली. पाच रुग्ण मृत्यू पावले आहेत तर दोन रुग्ण अद्याप फरार आहेत.
****
सोलापूरहून झारखंड इथं मजुरांना
घेऊन जाणाऱ्या एसटी बसला यवतमाळ जिल्ह्यात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात होउन
बस चालकासह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ महिला आणि एका पुरुषाचा समावेश
आहे. या अपघातात २२ मजूर जखमी झाले आहेत. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे
काम करणारा डंपर रस्त्यावर उभा होता, त्याला ही बस मागून धडकल्यामुळे हा अपघात झाला.
****
No comments:
Post a Comment