आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज ५४
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधितांची
संख्या १ हजार १७३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये गरम पाणी, शिवराज कॉलनी, कैलास नगर,
सौदा कॉलनी, हडको एन-१२, हुसेन कॉलनी, गल्ली क्रमांक ९, खडकेश्वर, हर्सुल कारागृह,
आदर्श कॉलनी , काबरा नगर इथं प्रत्येकी १, रेहमानिया कॉलनी, आझम कॉलनी, रोशन गेट, न्याय
नगरमधली १८ वी गल्ली, खिवंसरा पार्क, उल्कानगरी, टाइम्स कॉलनी, कटकट गेट इथं प्रत्येकी
२, उस्मानपुरा ३, हुसेन कॉलनी, चौथी गल्ली आणि पडेगाव इथल्या मीरा नगरात प्रत्येकी
४, मुकुंदवाडी ५, सिटी चौक परिसरात ६, तर जयभीम नगर परिसरात १८ रुग्ण आढळले आहेत. आज
आढळलेल्या या नवीन रुग्णांमध्ये २८ महिला आणि २६ पुरुषांचा समावेश असल्याचं जिल्हा
प्रशासनानं सांगितलं आहे.
****
अकोला जिल्ह्यात आणखी २९
जणांना अहवाल कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूची बाधितांची
एकूण संख्या ३०८ झाली आहे. शहरातील ५३ भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात
आले असून आतापर्यंत एकूण १६७ जणांना तब्येतीत सुधार पडल्यानं घरी सोडण्यात आलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना
विषाणू बाधा झालेले आणखी नऊ रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण चंद्रपुरातल्या विलगीकरण
केंद्रात दाखल होते. या सर्वांचे तपासणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाले. यामुळे आता जिल्ह्यातल्या
रुग्णांची संख्या १२ झाली आहे. यापैकी पहिल्या रुग्णाच्या दोन्ही चाचण्यांचा अहवाल
निगेटिव्ह आला आहे.
****
प्रसिद्ध लोकगीत गायक छगन
चौगुले यांचं आज मुंबईत निधन झालं. मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार
सुरू होते. विविध लोकगीतं गायलेले चौगुलं यांचं 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’
हे गाणं विशेष लोकप्रिय झालं होतं.
****
औरंगाबाद शहरात आजपासून सकाळी
सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं पुन्हा सुरू झाली आहेत. नागरिकांनी
सकाळपासूनच किराणा सामान आणि इतर साहित्य खरेदीसाठी शारीरिक अंतर राखण्याचा नियम पाळत
दुकानांसमोर रांगा लावल्याचं दिसून येत आहे.
****
No comments:
Post a Comment