आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज १०२
कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यात आता कोरोनाविषाणू बाधितांची
एकूण संख्या ३ हजार ६३२ झाली आहे. यापैकी १ हजार ९६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
सध्या १ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरू असून १९१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
आहे.
****
जालना जिल्ह्यात
आज १७ कोरोनाविषाणू
बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७८ झाली आहे. आतापर्यंत
११ जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये टेंभूर्णी इथल्या
९ रुग्णांचा समावेश आहे.
****
देशात कोरोना विषाणूची लागण
झालेल्यांची संख्या ४ लाख २५ हजार २८२ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमधे १४ हजार ८२१
रुग्णांची वाढ झाली. गेल्या चोवीस तासांत ४४५ जणांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला, देशात
मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १३ हजार ६९९ झाली आहे. आतापर्यंत २ लाख ३७ हजार
१९५ रुग्ण बरे झाले आहेत.
****
सातारा जिल्ह्यात
कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर लागू नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ३१ जणांविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा बंदीचा आदेश डावलून पुणे तसंच मुंबईतून विनापरवानगी आलेल्या ११ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात
खिंडवाडी इथं हॉटेल सातारा पॅलेसमध्ये एका डॉक्टरच्या मुलाचा वाढदिवस साजरा केल्या
प्रकरणी हॉटेल मालकासह २० जणांविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड नगरपरिषदेनं आजपासून तीन दिवस जनता संचारबंदीचा निर्णय
घेतला आहे. या निर्णयाला सिल्लोड व्यापारी महासंघानं पाठिंबा
दिला असल्याचं महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल यांनी सांगितलं.
वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठानं या काळात बंद राहणार
आहेत.
****
पेट्रोलच्या
दरामधे प्रतिलीटर ३३ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ५८ पैसे वाढ झाली आहे. या दरांमधे
वाढ होण्याचा आजचा सलग सोळावा दिवस आहे.
****
No comments:
Post a Comment