Wednesday, 24 November 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.11.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून दोन दिवसांच्या कानपूर दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातील दिवंगत शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी खासदार चौधरी हरमोहन सिंह यादव यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती आज सहभागी होतील. उद्या ते हरकोर्ट बटलर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जम्मूमध्ये २५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करणार आहे. या रस्त्यांमुळे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यान वर्षभर कोणत्याही वातावरणात दळणवळण सुरु ठेवता येणार आहे.

****

देशात काल कोविडचे नऊ हजार २८३ नवे रूग्ण आढळले तर एकूण दहा हजार ९३९ रूग्ण या संसर्गातून बरे झाले. सध्या देशात एक लाख ११ हजार ४८१ उपचाराधीन आहेत. दरम्यान, आतपर्यंत देशात ११८ कोटी ४८ लाख कोविड प्रतिबंधक लसीकरण झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

इंडोनेशियाच्या बाली इथं होणाऱ्या इंडोनेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी.व्ही.सिंधु, किदाम्बी श्रीकांत आणि इतर भारतीय खेळाडू आज पहिल्या फेरीचे सामने खेळतील. पी.व्ही सिंधु महिला एकेरीत जपानच्या खेळाडूशी तर पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतचा सामना भारताच्याच एच. एस. प्रणयशी तर साई प्रणीतचा सामना फ्रांसच्या खेळाडूशी होणार आहे.

****

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेनं नुकतीच रद्द केलेली नांदेड - रोटेगाव डेमू विशेष गाडी पूर्ववत केली असून तिचा विस्तार मनमाड पर्यंत केला आहे. ही गाडी परवा २६ तारखेपासून नांदेड इथून सुटणार आहे.

****

तुळजाभवानीच्या मंदिरात आजपासून कोरोनाचे नियम पाळून गोंधळ तसंच जावळ काढण्याच्या विधींना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पुजारी वर्गातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.

****

जालना इथल्या सफल सीड्सच्या वतीनं आयोजित सफल कृषी प्रदर्शनाचं उदघाटन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्या हस्ते काल झालं. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात फळं आणि भाजीपाल्याचे विविध प्रकार पहायला मिळणार आहेत.

****

No comments: