आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ एप्रिल २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
सिनेअभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या मुंबईतल्या क्रुझ ड्रग्ज
पार्टी प्रकरणातले नार्कोटीक्स क्ंट्रोल ब्युरो- एनसीबीचे पंच प्रभाकर सैल यांचा
मृत्यु संशयास्पद असून याची चौकशी केली जाईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी
म्हटलं आहे. पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
परवा शुक्रवारी, ३६ वर्षीय पंच प्रभाकर सैल यांचा हृदयविकाराच्या
झटक्यामुळे मृत्यु झाला.
****
अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील
रंधा धबधबा इथं काचेचा पूल तयार करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा
निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार किरण लहामटे यांनी दिली आहे.
निसर्ग पर्यटन असलेल्या भंडारदरा रंधा फॉल इथं होणारा काचेचा पूल हा महाराष्टातील
पहिला पूल असून देशातील ६ वा पूल असल्याचं लहामटे म्हणाले.
****
नवी मुंबईतल्या उलवे इथं जगविख्यात तिरुपती तिरुमला
देवस्थान यांना मंदिरासाठी भूखंड वाटप करण्याचा प्रस्ताव काल राज्य शासनाच्या
मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातल्या भक्तांना श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घेणं सुलभ व्हावं यासाठी तिरुपती
तिरुमला देवस्थानला मंदिर उभारण्याकरता या भूखंडाचं वाटप करण्यात येणार आहे
****
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर
तालुक्यातल्या शेंदुरजना आढाव इथंल्या वनविभागाच्या शेकडो हेक्टर जंगलाला काल आग लागली
, वन्यप्राण्यांच्या जीवाला या आगीमुळे धोका निर्माण झाला . या आगीमुळे शेकडो हेक्टरवरील
जैवविविधता नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment