Tuesday, 23 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीर पोलिसांनी आज काश्मीर घाटीतून लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली. सुहेल अहमद मलिक असं या दहशतवाद्याचं नाव असून, बडगाम जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रेनेड हल्ल्यासंदर्भात त्याला पकडण्यात आलं. या दहशतवाद्याकडून दारुगोळा जप्त करण्यात आला.   

****

केंद्र सरकारची वेगवेगळी मंत्रालयं, विभाग तसंच सरकारी एजन्सीस द्वारे देण्यात येणारे सर्व पुरस्कार एकाच छत्राखाली आणण्यासाठी एका राष्ट्रीय पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. पुरस्कार वितरणात पारदर्शकता आणि जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारचे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टल द्वारे पुरस्कारासाठी, व्यक्ती वा संस्थाचं थेट नामांकन करता येईल, असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. त्यानुसार पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत तर संरक्षण पदकांसाठी ३० सप्टेंबर पर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अवॉर्ड्स जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर शिफारशी पाठवता येणार आहेत.

****

मियामीमधे आयोजित एफ टी एक्स क्रिप्टो चषक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदनं जगतजेत्या मॅग्नस कार्लसनला शेवटच्या खेळीत पराभूत केलं. मात्र, कार्लसनच्या आधीच्या सामन्यांमधल्या उच्च गुणांमुळे, या विजयानंतरही प्रज्ञानंदला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दोघांचेही गुण २-२, असे समान झाल्यामुळे ब्लिट्झ टायब्रेकरमधे प्रज्ञानंदनं त्याचा वर मात केली.

****

टोकियो इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी महिला दुहेरी गटात मालदीवच्या खेळाडूंचा पराभव करत विजय मिळवला. तर आणखी एका महिला दुहेरी सामन्यात भारताच्या पूजा दंदू आणि संजना संतोषाने पेरू देशाच्या खेळाडू जोडीचा पराभव करत आघाडी घेतली.

****

मराठवाड्यात काल २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १२, लातूर सहा, औरंगाबाद तीन, तर नांदेड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

****

No comments: