Tuesday, 28 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

G20 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या W20 बैठकीचा आज समारोप होणार आहे. आज सकाळी W20 च्या प्रतिनिधींनी शहरातल्या बिबि- का मकबरा आणि औरंगाबाद लेणी या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. इन्टॅकच्या छत्रपती संभाजीनगरच्या महिला वास्तु विषारद प्रतिनिधींनी यावेळी त्यांना या स्थळांची माहिती दिली. तसंच शहराचा दोन हजार वर्षांचा इतहास उलगडून सांगणारे बुक मार्क या पाहुण्यांना भेट देण्यात आले. पुरातत्व खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

***

राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकीलांनी युक्तीवाद केला होता.

***

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळ परिसरात कांद्याला योग्य भाव मिळण्याची मागणी करत आंदोलन केलं. यावेळी काही आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

***

आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होत.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय शास्त्रज्ञ सी वेंकटरम यांनी रमण इफेक्ट या शोधाची घोषणा केली. त्यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं राज्यभरातल्या शाळांमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

***

जगातल्या सर्वांत लांबवरच्या नदी प्रवासाला निघालेलंएमव्ही गंगा विलासहे जहाज आज आसाममध्ये दिब्रुगढ इथं पोहोचणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाकडून या जहाजाचं स्वागत केलं जाणार आहे. गंगा आणि सिंधू नदीसह अनेक उपनद्यांमधून झालेल्या या भारतीय उपखंडातील पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी एक नवं अवकाश खुलं झाल्याचं मत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केलं आहे.

***

तोडलेली वीज जोडणी पूर्ववत करून देण्यासाठी तीन हजार रुपये लाच घेणाऱ्या जालना जिल्ह्यातला महावितरण कंपनीचा तंत्रज्ञ आणि कंत्राटी तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. घनसावंगी तालुक्यात राणी उंचेगाव इथं ही कारवाई करण्यात आली. सुरेश गुंजाळ आणि बालाजी शिंगटे अशी या दोघांची नावं आहेत.

 

//***********//

 

No comments: