Tuesday, 20 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 20.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० जून २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका आणि इजिप्तच्या पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. भारत- अमेरिका यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये संबंध दृढ व्हायला मदत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विट संदेशातून व्यक्त केला आहे. अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात सहभागी होणार असून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची देखील भेट घेणार आहेत.

****

ओडिशामधल्या जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून नागरीकांना रथ यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.

****

भारतीय खादी ग्रामोद्योग आयोगानं एक लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा व्यावसायिक टप्पा पार केल्याचं, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी म्हटलं आहे. मागील नऊ वर्षात खादीच्या विक्रीत ३३२ टक्के वाढ झाल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद शहर पोलिस स्थानकातला हवालदार महादेव शिंदे याला १२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहात पकडलं. गुटखा आणि तंबाखूचा व्यवसाय करणार्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथं बनावट खताचा मोठा साठा जप्त करण्यात आला. तीर्थपुरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट खत विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे इथल्या मुख्य राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकानं ही कारवाई केली.

****

सोलापूर जिल्ह्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई महामार्गाच्या मोबदल्यासाठी रयत क्रांती संघटनेनं सोलापूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे इथं, काल रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीला चालू बाजारभावाच्या चारपट मोबदला देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...