Sunday, 20 August 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक: २० ऑगस्ट २०२३ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 20 August 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी रशियाडून सोडण्यात आलेला लँडर तांत्रि कारणांमुळं शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करू शकलं नाही, अशी माहिती रशियन अंतराळ संस्था रोसकॉस्मोसनं दिली आहे. रशियाचं अंतराळयान उद्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणं अपेक्षित होतं, मात्र हे अभियान अद्याप सुरू आहे अथवा नाही याबाबत कोणताही खुलासा रोसकॉस्मोसनं केला नाही पण यासंबंधी  अधिक विश्लेषण केलं जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

                                 ****

भारतीय नौदलाच्या सेवेत जानेवारी रूजू झालेली आयएनएस वागीर ही पाणबुडी आज ऑस्ट्रेलियातल्या फ्रीमँटल इथं दाखल झाली आहे. ही पाणबुडी ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही युनिट्स बरोबर विविध प्रकारच्या सरावांमध्ये सहभागी होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर, भारतीय नौदलाची जहाजं आणि विमानं मलबार - २३ आणि ऑसिंडेक्स - २३ च्या सरावात सहभागी झाले आहेत. या मोहिमेमुळं भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल यांच्यातील सहकार्य आणि समन्वय आणखी वाढणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.  
                                **** 

केंद्र सरकार सायबर फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उद्योग, नागरीक, माध्यमांसह सर्व भागधारकांच्या सूचनांचं स्वागत करेल असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. बंगळुरूमध्ये काल डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विषयावर जी- ट्वेंटी देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.   

****

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू कश्मीरमधल्या अनंतनाग आणि बालटाल इथून आज पहाटे यात्रेकरुंचा एक गट रवाना झाला आहे. अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत रवाना झालेला हा ऐक्केचाळीसावा गट असून यात तीनशेहून जास्त यात्रेकरुंचा समावेश आहे. एक जुलैपासून सुरु झालेल्या या यात्रेत आतापर्यंत चार लाख ३२ हजार ६७३ भाविकांनी अमरनाथ इथल्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे.

****

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, आणि प्रियंका गांधी यांनी राजीव गांधी यांच्या वीरभूमी या समाधीस्थळ जावून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

केरळमध्ये दहा दिवस साजरा होणाऱ्या ओणम या प्रमुख सणाला आज अथमने सुरुवात होत आहे. राजा महाबलीच्या प्रतिकात्मक स्वागतासाठी नागरिकांनी सर्वत्र फुलांच्या रांगोळ्या काढल्या आहेत. एर्नाकुलमच्या तिरुपुनीतुरा शहरात आज प्रसिद्ध अथचमयम यात्रा काढण्यात येणार असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

****

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतल्या पिराणी पाडा परिसरात शनिवारीमध्यरात्रीनंतर एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमुळं बाजूला असलेल्या तीन मजली इमारतीही वेढल्या गेल्या. दरम्यान, या इमारतीतल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कुठल्याही जीवीत हानीचे वृत्त नाही.

****

भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं भंडारा तालुक्यातल्या गुंजेपार इथं अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं. यामुळं मिरची पिकांना फटका बसला आहे.  लाखांदूर तालुक्यातही पावसामुळं अनेक मार्ग बंद झाले असून अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. चुलबंद नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
रम्यान, मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्यानं भंडारा जिल्ह्यात  वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी  गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून चार हजार १२९ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  
                                **
** 

गोंदिया जिल्ह्यातही काल दिवसभरात दमदार पाऊस झाला, तिरोडा तालुक्यातील चुरडी इथं नाल्यावरून पाणी वाहत असताना पाय घसरुन शालिकराम प्रजापती हे ज्येष्ठ नागरीक वाहून गेले आहेत. नदी नाल्यांवर पाणी वाहत असताना नागरीकांनी सतर्क राहावे असा इशारा गोंदिया जिल्हा प्रशासनानं दिला आहे.

****

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यापासून दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून चांगला पाऊस पडत आहे. आजही सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळं  शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

                                   **** 
भारत आणि आयर्लंडदरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-ट्वेंटी सामना आज खेळवला जाणार आहे. डबलिन इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. परवा शुक्रवारी झालेला पहिला सामना जिंकत भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शुन्य अशी आघाडी घेतली आहे.

//************//

No comments: