आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० ऑगस्ट २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
चांद्रयान
-तीनचं लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास सुरुवात करण्यासाठी भारतीय अंतराळ
संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं आवश्यक
कक्षेत पोहचवलं आहे. यासाठी
लँडर मॉड्यूल चंद्राभोवती किमान २५ आणि कमाल १३४ किलोमीटरच्या
कक्षेत ठेवण्यात आलं होतं. याबाबतची दुसरी प्रक्रीया आज पहाटे यशस्वीरित्या पार पडली. लँडर मॉड्यूल
विक्रम सुस्थितीत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे. तसंच रोव्हर वाहून नेणारं लँडर
जेव्हा दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रावर हळुवार उतरेल तेव्हा ही कामगिरी करणारा भारत हा
चौथा देश ठरणार आहे.
****
लडाख इथं काल भारतीय सैन्य दलाचा एक ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या
अपघातात नऊ सैनिक हुतात्मा झाले आहेत. हुतात्मांमध्ये
एक कनिष्ठ अधिकारी आणि आठ सैनिकांचा समावेश आहे. या अपघाताबद्दल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
गुजरातच्या केवडीया मधील स्टेचू ऑफ युनिटी इथं आज अर्थमंत्र्यालयाच्या
दोन दिवसीय चिंतन शिबीराला सुरुवात होणार आहे. अर्थमंत्री निर्मला
सितारामन या शिबीरात उद्या संबोधित करतील. या शिबीरात अर्थमंत्रालयातील
विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासह विविध मुद्द्यांवर या शिबीरात
चर्चा केली जाणार आहे.
****
कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक
ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
****
पॅरीस इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक गटात
अदिती स्वामीनं सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे. वरिष्ठ
गटाच्या या विश्वचषक स्पर्धेत, सर्वात कमी वयाची
सुवर्णपदक विजेती म्हणून अदिती, ही पहिली भारतीय ठरली
आहे.
//*************//
No comments:
Post a Comment