आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
भक्ती आणि उत्साहात दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आज समारोप होत आहे. राज्यभरात विर्सजनांना उत्साहात सुरुवात झाली असून ठिकठिकाणी लहान,
मोठ्या मिरवणुका काढल्या जात आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर विभागातली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि
जिल्हा परिषदेकडच्या पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे
निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल या बाबत
मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारतीय सैन्यदलाने २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तान हद्दीत सर्जिकल स्ट्राइक करून अतिरेक्यांचा तळ उध्वस्त केला होता. याची आठवण म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर इथं तसंच लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये वीरनारी, वीरमाता, वीरपिता, वीर पत्नी तसंच ज्येष्ठ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
****
मध्य महाराष्ट्र, कोकण,
मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा
इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
परिसरामध्ये काल रात्री पावसाच्या सरी कोसळल्या.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय
संघानं १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं असून अर्जुन सिंह चीमा,सरबजोत सिंह आणि शिव नरवाल यांच्या संघानं ही कामगिरी बजावली. वुशू क्रीडा प्रकारामध्ये ६० किलो वजनी गटात नाओरिम रोशीबिना देवी हिनं रौप्यपदक
पटकावलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमातील संदेशाद्वारे
या खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे.
****
पोषण अभियानमधे नव्यानेच मेरी माटी मेरा देशचा समावेश केल्यानं
अहमदनगर जिल्ह्यातल्या कचेश्वरनगर कोकमठान इथं विविध उपक्रम घेण्यात आले. कोपरगाव तालुक्यातल्या संवत्सर गटातल्या सर्व अंगणवाडी गावातली माती कलशामध्ये
एकत्रित करुन कलश मिरवणूक आणि पोषण फेरी काढण्यात आली.
****
No comments:
Post a Comment