आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Tuesday, 28 November 2017
Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.11.2017 - 17.25
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date-28 November 2017
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
केंद्र शासनाच्या
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत राज्यात वनशेती उपअभियान राबवायचा निर्णय राज्य
सरकारनं घेतला आहे. शेतीतल्या उत्पादनासह वृक्षलागवड वाढवणं हा या योजनेचा उद्देश आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी
कृषी पंपांना दिलेल्या बारा तासांच्या थ्री फेज वीजपुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान
देण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये
राबवलेल्या विविध योजनांची दखल सरकारनं घेतली असून, त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढवण्यासाठी
उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला.
महाराष्ट्र उद्वाहन,
सरकते जिने आणि चलित पथ अधिनियम-२०१७ हे नवीन विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा,
तसंच माहिती-तंत्रज्ञान विषयक खरेदी आता जीईएम पोर्टलमार्फत करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं
घेतला.
****
विमुद्रीकरणानंतर बँक खात्यात मोठ्या प्रमाणावर रोकड जमा करूनही विवरणपत्र दाखल
न केलेल्या एक लाख १६ हजार व्यक्ती आणि कंपन्यांना प्राप्तिकर विभागानं नोटीस पाठवली
आहे. ३० दिवसांच्या आत त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात
आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रमुख सुशील चंद्रा यांनी आज नवी दिल्लीत
ही माहिती दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
हैदराबाद मेट्रो रेल्वे सेवा देशाला समर्पित केली. मियापूर स्थानकावर पंतप्रधानांनी
हिरवा झेंडा दाखवून मेट्रो सेवेचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी मियापूर ते कुकटपल्ली
असा मेट्रोनं प्रवास केला. उद्यापासून मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. तेलंगणाचे
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, राज्यपाल ई एस एल नरसिंहा यावेळी उपस्थित होते.
****
ऊर्जा तज्ज्ञांनी
कोणताही पूर्वग्रह न बाळगता भविष्यातलं व्यापक ऊर्जा धोरण तयार करण्यासाठी योगदान देण्याचं
आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. ते आज
नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. भारतात जागातली एकूण सहा टक्के ऊर्जा वापरली
जाते, हे प्रमाण पुढच्या पधंरा ते वीस वर्षात २५ टक्के होऊ शकतं, असं ते म्हणाले. ऊर्जा
धोरण तयार करण्याची प्रक्रिया गतिमान व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले.
****
पोलिस कारवाईत जप्त
केलेल्या तब्बल १० लाख ३६ हजार रुपये किंमतीच्या गुटखा आणि पानमसाल्याची परस्पर विल्हेवाट
लावल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातल्या चाळीसगाव पोलिस स्थानकातला सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र
शिरसाठ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरीष्ठांना याची माहिती मिळू नये
म्हणून शिरसाठ यानं अन्न आणि औषध विभागाकडून आलेलं पत्र देखील परस्पर घेतलं असल्याचं
उघडकीस आलं आहे.
****
धुळे सोलापूर राष्ट्रीय
महामार्गावर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात एका जीनिंगला आग लागून मोठं नुकसान
झालं. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही आग लागली. अग्निशामक दलाचे सहा बंब,
आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीत कापसाच्या चार हजार गाठी खाक झाल्या असून,
अंदाजे २० कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज़ व्यक्त केला जात आहे. आगीचं
नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
****
सरसकट शेतकरी कर्जमाफी
आणि सातबारा कोरा करण्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं
हिंगोली जिल्ह्यात वसमत तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री
जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर तहसीलदारांना
मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
कृषी उत्पन्न वाढीसाठी
गृह विज्ञान तज्ज्ञांना अधिक वेगानं काम करावं लागेलं, असं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे
उपमहानिदेशक डॉ. व्ही. पी. चहल यांनी म्हटलं आहे. जालना इथल्या खरपुडी कृषी विज्ञान
केंद्रात आयोजित, तीन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन सत्रात
ते बोलत होते. नीति आयोगाद्वारे देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रांचं मूल्यमापन केलं
जात असून, खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचं काम उत्तम असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं.
****
दमणहून जालना इथं
अवैधरीत्या विक्रीसाठी येणारी पाच लाख १६ हजार रुपये किंमतीची बनावट दारू, जालना स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकानं आज जालना-औरंगाबाद मार्गावर जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी
दोन चारचाकी गाड्यांसह दमण आणि गुजरात इथल्या दोघांना ताब्यात घेतलं आहे.
****
महात्मा ज्योतीबा
फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं
महापौर शिला भवरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केलं.
महाराष्ट्र राज्य
ओबीसी जनजागरण समितीच्या वतीनं आज औरंगाबाद इथं परिसंवाद घेण्यात आला. युवकांचे भवितव्य
या विषयावर आयोजित या परिसंवादात अनेक तरुण तरुणींनी आपले विचार मांडले.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2017 13.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं पंधराव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून, माजी प्रशासकीय आधिकारी तसंच माजी खासदार एन. के. सिंग या आयोगाचे अध्यक्ष असतील. एक एप्रिल २०२० पासून पुढच्या पाच वर्षासाठी हा आयोग केंद्रीय महसुलातून राज्यांना हस्तांतरित करण्याच्या निधीबद्दल शिफारशी करेल, असं आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितलं. माजी आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास आणि जॉर्ज टाऊन विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनुप सिंग या आयोगाचे सभासद तर अरविंद मेहता या आयोगाचे सचिव असतील.
****
ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवाकर करापोटी ८३ हजार तीनशे सेहेचाळीस कोटी रुपये महसूल जमा झाला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. ५० लाखांहून अधिक करविवरण पत्रं दाखल करण्यात आली असून, राज्यांकडे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी ८७ हजार कोटी रूपये जमा झाले आहेत. त्याचप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी दहा हजार आठशे कोटी रूपये तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांसाठी १३ हजार सहाशे पंचाण्णव कोटी रुपये भरपाई पोटी सर्व राज्यांना देण्यात आले असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपट परदेशात प्रदर्शित न करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची गाणी तसंच प्रोमोला भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळ - सेन्सॉर बोर्डाची मान्यता मिळवण्यासंदर्भात न्यायालयात खोट्या बाबी सादर केल्या, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. सेन्सॉर बोर्डानं अद्याप चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. याआधी न्यायालयानं चित्रपटातून काही दृश्य वगळण्याची विनंतीही मान्य केली नव्हती.
****
गुजरात केडरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी राकेश अस्थाना यांना केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे विशेष संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेनं ही याचिका दाखल केली होती. एका कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागानं मारलेल्या छाप्यात हस्तगत केलेल्या एका डायरीत अस्थाना यांचं नाव समोर आल्यानं त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. मात्र अस्थाना यांच्या नियुक्तीमध्ये कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचं सांगत, न्यायालयाने अस्थाना यांच्या नियुक्तीचा निर्णय योग्य ठरवला.
****
व्यवसाय - उद्योग जगतातल्या उदयोन्मुख क्षेत्रांना चालना देण्यासाठी २०१८ च्या सुरवातीलाच नवं औद्योगिक धोरण आणणार असल्याची घोषणा वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. एका वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या धोरणासंबंधीचा मसुदा मंत्रालयानं तयार केला असून, १९९१ च्या औद्योगिक धोरणात आमूलाग्र बदल केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
सागरी किनारक्षेत्राच्या व्यवस्थापनाविषयी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आराखडा तयार करुन येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावा असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायधिकरणानं दिले आहेत. हा आराखडा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला सादर करायचा आहे. यात कसूर झाल्यास संबंधित जबाबदार आधिकाऱ्याच्या पगारातून पाच लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात येईल असं न्यायाधिकरणाचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांनी सांगितलं आहे.
****
सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यात दिरंगाई झाल्यास कडक कारवाईचा इशारा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिला आहे. मुंबई इथं अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू होणं आवश्यक असून, वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं बडोले यांनी सांगितलं.
****
रेल्वे विभागानं उत्तर प्रदेशात २४ नोव्हेंबर रोजी वास्को द गामा एक्सप्रेस रेल्वेचे १३ डबे रुळावरुन घसरल्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. माणिकपूर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातात तीन जणांना मृत्यू झाला होतं. रुळाला तडे गेल्यानं हा अपघात झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड पूर्णा दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्ती कामासाठी आजपासून येत्या सहा डिसेंबरपर्यंत दररोज अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजून ५० मिनिटांपासून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल, यामुळे नांदेड औरंगाबाद गाडी येत्या एक डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे, तर काचीगुडा मनमाड एक्सप्रेससह काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ३० नोव्हेंबर आणि चार डिसेंबर रोजी मात्र सर्व गाड्या नियमित धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 28 November 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۸؍ نومبر ۲۰۱۷ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
مرکزی حکو مت نے عدالت عظمیٰ کو آ گاہ کیا ہے کہ مختلف سما جی اسکیموں سے استفا دہ کے لیے آدھار نمبر منسلک کرنے کی مدت میں توسیع کر کے اُسے31؍ مارچ کرنے پر حکو مت غور کر رہی ہے۔ فی الحال یہ مدت 31؍ دسمبر تک ہے۔ اِس کے علا وہ مو بائیل نمبر سے آ دھار نمبر کو منسلک کرنے کی مدت 6؍ فر وری 2018 ہے۔ مفادعا مہ کی ایک عرضداشت میں در خواست گذا ر نے استدعا کی تھی کہ آدھار اسکیم پر عبو ری حکم التواء جاری کیا جائے۔ اِس پر عدالت نے وضا حت کی کہ اِس طرح کا حکم التواء جاری کرنے یا نہ کر نے کا فیصلہ آئینی بینچ ہی کریگی۔
****************************
ریاستی قا نون ساز کونسل کی ایک نشست کے لیے ہونے والے ضمنی انتخاب کے لیے بھارتیہ جنتا پارٹی کی جانب سے پار ٹی کے ریاستی نائب صدر پر ساد لاڈ اور حزب اختلاف کی جانب سے دلیپ مانے نے کل اپنے کا غذات نامزدگی جمع کیے دلیپ مانے شو لا پور سے رکن اسمبلی رہ چکے ہیں۔ سابق وزیر اعلیٰ نارائن را نے کے مستعفی ہو جانے کے بعد خا لی ہونے والی اِس نشست کے لیے آئندہ 7؍ دسمبر کو رائے دہی ہو گی۔
****************************
گوّا کے پنجی میں جاری اِنڈین اِنٹر نیشنل فلم فیسٹیول IFFI آج اختتام پذیر ہورہا ہے۔ اِس فلم فیسٹیول میں آج ہندی فلموں کے مقبول ادا کار امیتابھ بچّن کو اُن کی ہندی فلموں کے لیے گرانقدر خد مات پر لائف ٹائم اچیو منٹ ایوارڈ اور پر سنیلِٹی آف دی ایئر کا ایوارڈ بھی دیا جائے گا۔
****************************
ڈاکٹر با با صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کی سینیٹ اور اکیڈ مِک کونسل کے انتخا بات میں رکن اسمبلی ستیش چو ہان کے وِدیا پیٹھ اُتکرش پینل نے 37؍ میں سے27؍ نشستوں پر کا میابی حاصل کی ہے۔ جبکہ وِدیا پیٹھ وِکاس منچ کے صرف7؍ اُمید وار کا میاب ہو ئے۔ اِن انتخا بات میں 3؍ آزاد امید وار بھی منتخب ہو ئے۔ ووٹوں کی گنتی پر تنا زعات کے با عث 5؍ نشستوں کے نتائج کا اعلان مو خر کر دیا گیا ہے۔
****************************
اورنگ آ باد ضلع امدا با ہمی دودھ اُتپا دک سنگھ نے دودھ کی قیمت خرید میں فی لیٹر ایک روپیہ اضا فے کا فیصلہ کیا ہے۔ ریاستی اسمبلی اسپیکر اور اُتپا دک سنگھ کے چیئر مین ہری بھائو با گڑے نے اخباری نمائندوں کو بتا یا کہ بورڈ آف ڈائریکٹر ز کے اجلاس میں یہ فیصلہ کیا گیا۔ اِس فیصلے کے بعد اب دودھ فروخت کنندگان کو 22؍ روپئے فی لیٹر کا نرخ دیا جائے گا۔ آئندہ یکم دسمبر سے اضا فہ شدہ قیمت سے دودھ خریدا جائے گا۔ اُنھوں نے بتا یا کہ اِس فیصلے کا کوئی بوجھ صا رفین پر نہیں پڑے گا۔
****************************
ناندیڑ سے پور نا کے در میان ریل پٹریوں کی مر مت کے لیے جنوب وسطی ریلوے کی جانب سے آج سے آئندہ6؍ دسمبر تک روز آ نہ ڈھائی گھنٹے کا بلاک لیا جائے گا۔ ریلوے ذرائع نے بتا یا کہ یہ بلاک روز آ نہ صبح گیا رہ بجکر 50؍ منٹ سے دوپہر دو بجکر 20؍ منٹ تک جاری رہے گا۔
****************************
ریاست میں معا شر تی روابط کی بگڑتی صورتحال اور اِس کے با عث ایک دوسرے کو شک کی نظر سے دیکھنے کے رویّے پر بز رگ صحا فی پر وین بردار پور کر نے افسوس کا اِظہار کیا ہے۔ وہ کل بیڑ ضلع کے امبّا جو گائی میں منعقدہ یشونت رائو چو ہان میمو ریل کانفرنس کی اختتا می تقریب سے خطاب کررہے تھے۔ اپنی تقریرمیں اُنھوں نے آنجہا نی یشونت رائو چوہان کی ریاست کے لیے خد مات کا بھی ذکر کیا۔
****************************
حکو مت کی جانب سے ’’یوم آئین‘‘ 26؍ نومبر کی بجائے 27؍نومبر کو منا ئے جانے سے متعلق حکم نا مہ جا ری کیئے جانے کے فیصلے کے خلاف کل ناندیڑ میں کانگریس پارٹی نے مذمتی مظا ہرے کیئے اِس مظا ہرے میں حکو مت کے جاری کر دہ حکم نا مہ کو نذر آتش کر دیا گیا۔
دریں اثناء کل یوم دستور کی منا سبت سے ممبئی کے رابطہ وزیر سُبھاش دیسائی نے منترا لیہ میں آئین کے مقا صد پڑھ کر سنائے ۔ اِسکے علا وہ اورنگ آ باد ،بیڑ اور جالنہ کے ضلع کلکٹر دفا تر میں بھی آئین کے مقا صد پڑھ کر سنائے گئے۔
****************************
راشٹر وادی کانگریس کی جانب سے حکومت کے خلاف کل اورنگ آ باد میں ڈیویژنل کمشنر دفتر پر احتجا جی جلو س نکا لا گیا۔ قا نون ساز کونسل میں حزب اختلاف کے قائد دھننجئے مُنڈے کی زیر قیادت پارٹی نمائندوں نے اپنے مطالبات پر مبنی ایک محضر ڈیویژنل کمشنر پُرشوتّم بھاپکر کو پیش کیا۔ دھننجئے مُنڈے کی قیادت میں جالنہ ضلع کے بھو کر دن میں بھی سب ڈیویژنل دفتر پر ہلاّ بول آندو لن کیا گیا۔ کسا نوں کے قرضہ جات مکمل طور پر معا ف کیئے جانے کے مطالبے پر نکا لے گئے اِس جلوس میں بڑے پیما نے پر کسا نوں نے شر کت کی۔
****************************
جالنہ شہر میں عبا دتگا ہوں کے غیر قا نو نی تجا وزات ہٹا نے کی مہم کا کل آغاز ہوا۔ اِس مہم میں شہر کی 109؍ مختلف عبا دتگا ہوں اور مذہبی مقا مات پر موجود تجاوزات اور غیر قا نو نی تعمیرات ہٹائی جائینگی۔
****************************
بھارت اور سری لنکا کے ما بین جاری سیریز کے دوسرے کر کٹ ٹیسٹ میچ میں بھا رت نے ایک اِننگ اور239؍ رنوں سے فتح حاصل کی۔ ناگپور میں کھیلے گئے اِس ٹیسٹ میچ میں کل سری لنکا کی پوری ٹیم دوسری اِننگ میں 166؍ رن بناکر آئوٹ ہو گئی۔

Subscribe to:
Posts (Atom)
Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...