आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१८ डिसेंबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी
आज होत आहे. गुजरात मधल्या एकूण १८२ जागांपैकी शेवटचं वृत्त आलं
तेव्हा भारतीय जनता पक्ष १०७ जागांवर, काँग्रेस ७३ जागांवर तर दोन जागेवर
इतर पक्ष आघाडीवर आहेत. तर हिमचाल प्रदेशातल्या एकूण ६८ जागांपैकी भाजप ४२ तर काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर आहे. दुपारपर्यंत
निकाल हाती येण्याची शक्यता असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात पालघर, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात
सहा नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू इथं ६८ तर जव्हार तालुक्यात ७९ टक्के मतदान झालं होतं. वाडा तालुक्यातल्या नगरपंचायतींसाठीही
आज मतमोजणी होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार इथं ७० तर नवापूर इथं ६६ टक्के मतदान झालं. तळोदा आणि धुळे जिल्ह्यात शिंदखेडा
नगरपंचायतीसाठी ७२ टक्के मतदान झालं होतं.
****
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत चालू वर्षाच्या रब्बी हंगामातला पीक विम्याचा
हफ्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. शेतकरऱ्यांना आता एक जानेवारी २०१८ पर्यंत विम्याचा हफ्ता भरता येणार आहे.
लातूर जिल्ह्यात गहू, ज्वारी, हरभरा, करडई आणि सुर्यफूल या पिकांकरता हा
विमा भरता येणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
पीकविमा भरण्याचं आवाहन कृषी आधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे.
****
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर
आज निर्णय होणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम़ एस़ आजमी यांच्यासमोर
भुजबळांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजपासून सुरु होणाऱ्यां दुसऱ्यां आठवड्यातही बोंड अळीमुळे झालेलं नुकसान,
कायदा आणि सुव्यवस्था, विदर्भाचे प्रश्न, तसंच विविध घोटाळ्यांचे विषय हे मुद्दे लाऊन
धरणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं. ते काल
नागपूर इथं बोलत होते.
*****
No comments:
Post a Comment