Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १९ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्यानं त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी आज, महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. किल्ल्यावर साजऱ्या होत असलेल्या शिवजन्माच्या ”पाळणा” सोहळ्याला
उपस्थित राहून ठाकरे यांनी महाराजांना अभिवादन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या
विकासकामांचा आढावाही घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते
अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांना
अभिवादन केलं आहे.
स्वराज्याची
राजधानी असलेल्या रायगडावर आज ३९० वा शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
राज्यभरातून शिवगीते आणि पोवाडे गात रायगडावर येणाऱ्या, शिवकालीन वेष परिधान
केलेल्या मावळ्यांमुळे गडावर
शिवकाल अवतीर्ण झाल्याचा भास होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज पहाटे
गडावर शिवरायांना अभिषेक करण्यात आला, त्यानंतर राजदरबार ते जगदीश्वर मंदिरापर्यंत
पालखी काढण्यात आली. त्याअगोदर शिवरायांच्या समाधीस्थळाजवळ पोलिसांनी सलामी दिली.
औरंगाबादच्या
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांच्या हस्ते छत्रपतींच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच, क्रांती चौकात, जिल्हा शिवजयंती
उत्सव समितीच्या वतीनं शिवजयंती उत्सव साजरा करताना महाराजांच्या पुतळ्यावर हेलोकॉप्टरमधून
पुष्पवृष्टी करण्यात आली. याठिकाणी सकाळपासून शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. शहरातून
घोषणांसह मिरवणुकाही सुरू आहेत.
नांदेड
इथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात आणि शहरातही शिवजयंती उत्सवानिमित्त
शालेय विद्यार्थी सायकलवर भगवे झेंडे लावून फेऱ्या काढत आहेत.
लातूर
इथं युवा शिवस्पंदन समूहाने यंदा प्रथमच महिलांची पारंपारिक वेशभूषेत तीन किलोमीटर
अंतराची चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. तीन विविध वयोगटात झालेल्या या स्पर्धेत शालेय
विद्यार्थिनींसह सुमारे दीडशे महिलांनी सहभाग घेतला.
सोलापूर इथं हजारो महिलांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा
पाळणा सोहळामध्यरात्री साजरा झाला. पारंपरिक वेशभूषेसह बाल शिवाजीच्या रूपात आलेली
बालकं यावेळी लक्ष वेधून घेत होती
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन
प्रसारित होणाऱ्या “मन की
बात” या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रम मालिकेचा हा ६२ वा भाग असेल.
****
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं भव्य आणि संस्मरणीय स्वागत करण्यासाठी भारत सिद्ध झाला आहे, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या
या भेटीनं भारत आणि अमेरिकेचे मैत्रीसंबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी
व्यक्त केला आहे. तर, भारत भेटीसाठी आपण उत्सुक आहोत,
असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पुढच्या सोमवारी २४ तारखेला
ट्रम्प भारत भेटीवर येत आहेत
****
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाशी
झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. यापैकी एकजण हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा
स्वयंघोषित कमांडर तर एकजण जैश ए महंमद या अतिरेकी संघटनेचा सदस्य होता. या अतिरेक्यांकडचा
शस्त्रं आणि दारूगोळ्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
****
फत्तेशिकस्त हा मराठी चित्रपट भारतीय लष्कराच्या संग्रहालयात
ठेवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ही माहिती दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार शायिस्तेखान यांच्यात पुणे इथे झालेल्या लढाईवर
बेतलेला हा चित्रपट, लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या प्रत्येक जवानाला दाखवण्यात
येणार असल्याची माहिती लांजेकर यांनी दिली आहे.
****
यावर्षी अनियमित आणि अवकाळी वादळी पाऊस आणि महापुरासारखी
संकटं येऊनही देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादन अपेक्षित आहे. एकोणतीस कोटी एकोणीस लाख
पन्नास हजार कोटी टन अन्नधान्याचं उत्पादन यावर्षी होईल, असा अंदाज कृषी विभागानं काल
जाहीर केला आहे.
****
जगभरात साखरेच्या उत्पादनात ८० ते ९० लाख टनाची घट आल्यानं,
वाढलेली साखरेची मागणी लक्षात घेता केंद्र सरकारनं चालू वर्षात ६० लाख टन साखर निर्यात
करायला परवानगी दिल्याचं साखर उत्पादक संघानं म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment