Saturday, 4 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.04.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०४ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार नऊशे दोन झाली असून एकशे त्र्याऐंशी जण या आजारातून बरे झाले आहेत, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. करोनामुळे आतापर्यंत अडुसष्ट जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार उद्या रात्री नऊ वाजता दिवे पेटवणार असलेल्यांनी हातावर सॅनीटायझर नसल्याची खात्री करून घ्यावी, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. अल्कोहोल असलेलं सॅनीटायझर पेट घेऊ शकत असल्यानं ही खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.
****

मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या पनवेलमधे कोरोना रूग्णाची संख्या आता पंधरा झाली आहे. ही संख्या आधी सात होती, आता नव्या आठ जणांना याची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पंधरापैकी तेरा जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान असून ते एकाच परिसरातले रहिवासी आहेत. रायगड जिल्ह्यातले अन्य चौदा तालुके कोरोना मुक्त आहेत.
****

`मुंबईचा राजा’ म्हणून नावलौकिक असलेल्या गणेशगल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाद्वारे कोरोना च्या उच्चाटनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
****

मुंबई इथली विद्युत पुरवठा शाखा `बेस्ट` या उपक्रमाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती बेस्टनं दिली आहे. गेल्या २६ मार्चला या कर्मचाऱ्याला ताप आल्यामुळे रूग्णालयात दाखल केलं होतं. मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा कर्मचारी काम करत असलेल्या विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना परवापासून चौदा दिवस त्यांच्या निवासस्थानी प्रतिबंधित करण्यात आलं आहे. 
****

संचारबंदी असतानाही फेरफटका मारण्यासाठी नांदेड शहरात काल रस्त्यावर आलेल्या दिडशे जणांविरूध्द पौलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या  आहेत.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...