Sunday, 21 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.06.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  चीनच्या आक्रमक कारवायांना प्रत्यूत्तर देण्याचं संरक्षण दलांना पूर्ण स्वातंत्र्य
Ø  श्रीनगरमधे तीन दहशतवाद्यांचा खात्मा
Ø  औरंगाबादमधे कोरोना विषाणूचे नवे १५५ रुग्ण
 आणि
Ø  सुरक्षित अंतराचं भान राखत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
****

 डाखमधे भारत-चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिं यांनी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी आज चर्चा केली. लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल आर. के. एस. भदोरिया आणि नौदल प्रमुख डमिरल करमबीर सिंग हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चीनबद्दलच्या भविष्यातल्या धोरणांविषयी बैठकीत चर्चा झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सैन्याने आक्रमक कारवाया केल्यास प्रतिकार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना यावेळी देण्यात आलं आहे. चीन बरोबरच्या हवाई, जमीनीवरच्या आणि सागरी हद्दीत कडक पहारा ठेवावा, असंही यावेळी सैन्यप्रमुखांना सांगण्यात आलं आहे.
****

 सुरक्षा दलांनी आज श्रीनगरमधे एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी शहरातील झूनीमर भागामधे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली असता दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबारामुळे ही चकमक उडाली होती. सकाळी सुरू झालेल्या या चकमकीनंतर दुपारच्या सुमारासही या भागात दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटायची आहे. खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. लोकांच्या हालचालीवर प्रतिबंध घालण्यात आले असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.     
****

 औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोना विषाणूचे नवे १५५ रुग्ण आढळले आहेत. आज सकाळच्या सत्रात १३७ रुग्ण आढळल्यानंतर दुपारी अठरा नवे रुग्ण आढळे असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता तीन हजार ५१५ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमधे १०८ पुरुष आणि ४७ महिला रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ८५७ रुग्ण या संसर्गातून मुक्त होऊन घरी गेले आहेत. उपचारांदरम्यान १८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एक हजार ४७१ रुग्णांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येत असल्यानं नगरपरिषदेनं उद्यापासून तीन दिवस जनता संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सिल्लोड व्यापारी महासंघानं पाठिंबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल यांनी दिली आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठानं या काळात बंद राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात आज दहा कोरोना विषाणूचे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २१९ झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात ७१रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****

 राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची टक्केवारी दररोज वाढत आहे. मुंबईत मात्र याच्या प्रसारानं आपला मार्ग आता बदलला आहे. धारावी, दादर आणि माहिम इथं मोठ्या प्रादूर्भावानंतर कोरोना विषाणू आता उत्तर भागातील उपनगरांमधे पसरत आहे. प्रशासन यावर प्रतिबंधासाठी आवश्यक ते उपाय योजत असून या ठिकाणी तत्काळ मदत मिळणाऱी योजना राबवली जाणं अपेक्षित आहे.
****

सातारा इथं कोरोना विषाणूचे १४ नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी ही माहिती दिली आहे.
****

 वाशिम जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे सहा नवे रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील सहा रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. जिल्ह्याती कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे.
****

 पोलिसांनी राज्यामधे टाळेबंदी सुरू झाल्यापासून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ९९ हजार २८० परवाने वितरित केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात ६ लाख १९ हजार व्यक्तींचं विलगीकरण करण्यात आलं असल्याचंही त्यांनी नमुद केलं आहे. राज्यात विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ३२ लाख २३ हजार ७११ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित असल्याचं त्यांनी या संदर्भातील संदेशात म्हटलं आहे. सामाजिक अंतर पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावं, सं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे.
*****

 आज जागतिक संगीत दिन आहे. संगीत जीवनात महत्वाची भूमिका बजावतं, यामुळे मनाला आनंद प्राप्त होतो, असं यानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय पितृदिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. पिता आणि अपत्या दरम्यानचं नातं हे सर्वात नैसर्गिक आणि हळूवार असल्याचं जावडेकर यांनी नमुद केलं आहे.
****

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज राजभवनामधील मोकळ्या जागेमधे योगाभ्यास केला. त्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनीही यानिमित्त आयोजित उपक्रमात विविध योगासनं केल्याची माहिती राज्यपालांच्या कार्यालयानं दिली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक तसंच लातूर, वाशीम आदी ठिकाणीही कोरोना विषाणू संसर्ग टाळण्याचे उपाय योजत योग दिनाचे उपक्रम झाले.
****

 सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय योग संस्थान औरंगाबाद शाखेच्या वतीनं दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात २०५ साधकांनी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला.
****

 बीड जिल्ह्यात पतंजली योग समितीतर्फे कोरोना विषाणू संसर्गामुळे सामाजिक संपर्क माध्यमातून योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित उपक्रमाला शहर आणि ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं समिती जिल्हाध्यक्ष हेमा विभुते यांनी सांगितलं. 
****

 कोरोना विषाणू सारख्या आव्हानात्मक काळात योगाभ्यासाची जीवनशैली प्रत्येकाच्या अंगी रुजल्यास आपल्याला अधिक सुरक्षित होता येईल, असा विश्वास नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी शासनाच्या निर्देशाचं पालन करत जिल्हाधिकारी प्रशासनातील निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन योग अंगीकारण्याचा संदेश दिला. त्यावेळी डॉ. इटनकर बोलत होते.
****

 अभ्यासात कायम सातत्य असलं की कितीही अवघड अभ्यासक्रम सोपा वाटतो, असं राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत नुकतेच तहसीलदार म्हणून निवड झालेल्या बीडच्या डॉ. प्रियंका भास्कर सानप यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागातील मुलींनी प्रशासकीय सेवेकडे एक आव्हान म्हणून पाहावं असं मत त्यांनी नोंदवलं आहे. डॉ. सानप या सध्या सहायक कक्ष आधिकारीपदी कार्यरत आहेत.
****

 भाविकांनी आज खंडग्रास सुर्यग्रहणावेळी पैठणमधील गोदावरी नदीच्या जलपात्रात, कृष्णकमल, मोक्ष आणि नागाघाटावर जप आणि नामस्मरण केलं. ग्रहणकाळात गोदावरी जलपाञात जप तथा नामस्मरण केल्यानं पुण्य लाभतं, अशी लोकभावना आहे. सुर्यग्रहण असो की चंद्रग्रहण पैठण इथं मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यल्प भाविकांनी गोदावरी पात्रात स्नान केलं.
*****

No comments: