Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
देशभरात
आतापर्यंत ७ लाख ८२ हजारावर रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात
या आजारातून मुक्त होणाऱ्यांचं प्रमाण ६३ पूर्णांक १८ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या
चोवीस तासात देशात कोविडबाधा झालेले नवे ४५ हजार ७२० रुग्ण आढळले, त्यामुळे देशातल्या
कोविड-19 च्या रुग्णांची एकूण संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ वर पोहाचली आहे. सध्या देशातल्या
विविध राज्यांमधल्या रुग्णालयांमध्ये ४ लाख २६ हजारावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या २४ तासात २९ हजार ५५७ रुग्ण बरे झाले, एका दिवसांत रुग्ण बरे होण्याचा हा आतापर्यंतचा
उच्चांक आहे. देशभरातला मृत्यू दरही दोन पूर्णांक ४१शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात
एक हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या २९ हजार ८६१ झाली असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय आयुर्विज्ञान
संशोधन संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या एक हजार २८४ प्रयोगशाळांच्या माध्यमातून
कोविड संसर्ग चाचण्या केल्या जात आहेत. यापैकी ८९५ सरकारी प्रयोगशाळा असून, ३८९ खासगी
प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमधून आतापर्यंत एक कोटी ५० लाख ७५ हजारावर नमुन्यांची
चाचणी करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी १०१ रुग्णांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित असल्याचे आले आहेत. महापालिका
क्षेत्रातल्या ८०, ग्रामीण भागातल्या १७ तर शहरात येणाऱ्या रस्त्यांवरच्या नाक्यांवर
केलेल्या तपासणीत आढळलेल्या ४ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोविडग्रस्तांची
एकूण संख्या १२ हजार १२६ झाले आहेत. त्यापैकी ६ हजार ६९० रुग्ण बरे झाले आहेत, तर ४१७
रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. सध्या जिल्ह्यात ५ हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
परभणी इथे
आज एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची महिती जिल्हा प्रशासनाने दिली. या महिलेस
काल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं
****
पुणे शहर
पोलिस दलापाठोपाठ आता ग्रामीण पोलीस दलातही कोरोना विषाणू संसर्ग होत आहे. जिल्हा ग्रामीण
पोलीस दलातील १७ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सरु असल्याची
माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पुणे पोलिस विभागात
३०० पोलिस कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी
घेतली जात असल्याचं ट्विट पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी केलं आहे. १८५ पोलिस कोरोनामुक्त
झाले असुन, १११ पोलिस उपचार घेत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
****
सांगली इथं
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला
कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेल्या या नियंत्रण कक्षातून
जिल्ह्यातल्या कोविड प्रादुर्भावाच्या प्रतिबंध नियंत्रण केलं जातं.
****
उस्मानाबाद
इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसरात इथं लोकसहभागातून
उभारण्यात आलेल्या कोविड १९ विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज होत आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हे उद्घाटन
होणार आहे
****
राष्ट्रीय
प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९४७ साली या दिवशी
नवी दिल्लीतल्या आकाशवाणीच्या स्टुडिओतून जनतेला संबोधित केलं होतं. आजच्या प्रसारण
दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनतेला शुभेच्छा
दिल्या आहेत.
****
लोकमान्य
बाळ गंगाधर टिळक आणि थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्तानं आज त्यांना
अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे या दोन्ही
स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला एक दिशा दिली,
लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध
हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा केल्याचं मोदी यांनी या संदेशात म्हटलं आहे.
माहिती आणि
प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही स्वातंत्र्यलढ्यातल्या या दोन्ही नेत्यांना
अभिवादन केलं आहे.
****
ग्रामीण
भागात सामायिक सेवा केंद्र - वायफाय चावडीच्या माध्यमातून एक लाख ब्रॉडबॅण्ड जोडण्या
उपलब्ध करून दिल्या असल्याचं, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी सांगितलं आहे. ही सुविधा गेल्या दहा जूनपासून २१ राज्यांमध्ये सुरू करण्यात आली
आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत या जोडण्यांची संख्या पाच लाखावर नेण्याचं उद्दीष्ट
असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment