आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ नोव्हेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
बिहार
विधानसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातला प्रचार काल संपला. यासाठी उद्या मतदन होणार
आहे. या टप्प्यात १७ जिल्ह्यातल्या ९४ मतदारसंघात मतदान होणार आहे. या १७ जिल्ह्यांमध्ये
पाटणा, वैशाली, सीतामढी, दरभंगा, मधुबानी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
मध्य
प्रदेश विधानसभेच्या २८ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा प्रचारही काल संपला असून,
यासाठी उद्या मतदान होणार आहे. उद्या सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.
****
छत्तीसगढमधल्या
दंतेवाडा जिल्ह्यात २७ नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. नक्षलवाद्यांना परत आणून
त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी पोलिसांनी सुरु केलेल्या अभियानात आतापर्यंत १७० नक्षलवाद्यांनी
आत्मसमर्पण केलं आहे.
****
मुंबईत
आजपासून ७५३ जादा उपनगरीय रेल्वे धावणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल ट्विटरच्या
माध्यमातून ही माहिती दिली. यामुळे मुंबईत आता एकूण दोन हजार ७७३ उपनगरीय रेल्वे धावणार
आहेत.
****
राज्यात
आतापर्यंत १५ लाख १४ हजार ७९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले आहेत. राज्यात
सध्या एक लाख २५ हजार १०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत
४४ हजार २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
मुंबईतली
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या कमी होत असून, गेल्या २४ तासांत ९०८ नवीन रुग्णांची
नोंद झाली, तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. काल एक हजार ७१६ रुग्ण बरे झाले असून, मुंबईत
सध्या १८ हजार २६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
दरम्यान,
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये आजपासून कोरोना निदान चाचणी मोफत उपलब्ध
करून देण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात कोविड-19 चा प्रसार अधिक प्रभावीपणे
रोखण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
****
अबुधाबी
इथं सुरु असलेल्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात
कोलकाता नाईट रायडर्स संघानं राजस्थान रॉयल्स संघाचा ६० धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या
एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं किंग्ज इलेवन पंजाब संघाचा नऊ गडी राखून पराभव
केला. या स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघादरम्यान सामना
होणार आहे.
****
No comments:
Post a Comment