आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं यश संपादन केलं आहे.
औरंगाबाद
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा
विजयी झाले. या निवडणुकीत एकूण २ लाख ४१ हजार ९०८ इतकं मतदान झालं होतं, त्यापैकी २३
हजार ९२ मतं अवैध ठरली. वैध ठरलेल्या २ लाख १८ हजार ८१६ मतांपैकी सतीश चव्हाण यांना
१ लाख १६ हजार ६३८ मतं मिळाली. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतं
मिळाली.
पुणे
पदवीधर मतदार संघातही महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले. लाड यांना एक लाख २२ हजार
१४५ मतं मिळाली, तर भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मतं मिळाली.
नागपूर
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अभिजित वंजारी आघाडीवर आहेत.
****
कोविड
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्वपक्षीय नेत्यांशी दूरदृश्य
संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा करत आहेत. या बैठकीला संसदेच्या दोन्ही संदनांच्या
सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. कोविड महामारी, लस वितरण, कोविड नंतरची देशातली
स्थिती यासह विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा होईल.
****
नौदल
दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसैनिक आणि त्यांच्या
कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या किनारपट्टीनं संरक्षण करण्याबरोबरच भारतीय
नौदल गरज भासल्यास नागरिकांच्या संरक्षणासाठीही तत्पर असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या
शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बहादुर नौसैनिकांचा देशाला अभिमान असल्याचं केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय
शाश्वत शेती अभियान अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि चाचणी कार्यालयाच्या
वतीनं भूम तालुक्यात जयवंत नगर इथं शेतकरी प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षण कार्यक्रमात
शेतकऱ्यांना शेत जमीन नमुना परिक्षणासाठी घेवून मृदाआरोग्य पत्रिकांचं वाचन करणं, खतांचं
नियोजन करणं, या विषयी कृषी तज्ञांनी मार्गदर्शन केलं.
****
No comments:
Post a Comment