आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ ऑगस्ट
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी कथित अनुद्गार काढल्याबद्दल केंद्रीय
मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून
राणे यांच्यावर कारवाईसाठी नाशिक पोलिसांचं एक पथक कोकणात रवाना झालं आहे. राणे यांनी
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान अपशब्द वापरल्याबद्दल शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर
बडगुजर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, औरंगाबाद इथंही राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी
आमदार अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्ते क्रांती चौक पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
करत आहेत.
****
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर शहरातल्या आलुची बाग परिसरात झालेल्या चकमकीत
लष्कर ए तय्यबाचा कमांडर आणि दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात दहशतवादी असल्याची
माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा बलाच्या जवानांनी ही कारवाई केली.
****
भारतीय लष्करातल्या पाच महिला अधिकाऱ्यांनी २६ वर्ष मानाची सेवा पूर्ण
केल्यानंतर, त्यांना कर्नल पदावर बढती देण्याचा निर्णय, लष्करानं घेतला आहे. सिग्नल,
इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियंता या तुकड्यांमध्ये कार्यरत महिला अधिकाऱ्यांना,
कर्नल श्रेणी मंजूर होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी फक्त वैद्यकीय सेवा, न्यायाधीश,
महाधिवक्ता आणि लष्कराची शिक्षणविषयक तुकड्यांमध्ये सेवा बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनाच
कर्नल, पदावर बढती दिली जात असे.
****
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२१ निमित्त,
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे चित्ररथातून ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यासाठी,
काल परभणीत चित्ररथाचं आगमन झालं. आमदार राहुल पाटील यांनी या चित्ररथाचं उद्घाटन केलं.
यावेळी अधिकारी पोळ यांनी भूजल साक्षरतेच्या संबंधी आपल्या विभागामार्फत राबविण्यात
येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यातल्या अनेक भागांत काल पाऊस झाला. धारुर तालुक्यात काल दुपारी
मुसळधार पाऊस पडला. जहागीरमोहा इथं वीज पडल्यानं दोन जनावरं दगावली. तर अंबेवडगाव परिसरात
जोरदार पावसामुळे ज्चारी, बाजरीची पिकं आडवी झाली.
****
No comments:
Post a Comment