Sunday, 20 February 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० फेब्रुवारी २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

अमली पदार्थ विभागाचे माजी संचालक समिर वानखेडे यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी विविध कलमांखाली प्राथमिक चौकशी अहवाल दाखल केली आहे. अबकारी विभागातून त्यांच्या विरोधात फसवणूकीच्या तक्रारी आल्यामुळे ठाणे पोलिसांनी चौकशी अहवाल दाखल केला आहे.

****

उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात आणि पंजाब विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. उत्तर प्रदेशातल्या सोळा जिल्ह्यातल्या ५९ मतदारसंघात हे मतदान होत असून, पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी हे मतदान होत आहे.

****

जम्मू काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काल दोन जवानांना विरमरण आलं. हुतात्मा जवानांमधे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातल्या शिगावचे सुपूत्र रोमित तानाजी चव्हाण यांचा समावेश आहे. दरम्यान, शोपियान जिल्हयातली चकमक रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

****

मराठवाड्यात काल ९६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४१ रुग्ण आढळले. लातूर १७, नांदेड ११, उस्मानाबाद १०, बीड ६, हिंगोली ६, परभणी तीन, तर जालना जिल्ह्यात २ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

पुणे शहरातल्या मेट्रो प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचं उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या रविवारी, २७ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८६ वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर किंवा माय गव्ह वर नोंदवता येतील.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...