आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ फेब्रुवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आज विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलाच्या ताफ्याची पाहणी करत आहेत. भारतीय
नौदलाच्या ताफ्यात ६० जहाजं, पाणबुड्या आणि ५५ विमानं आहेत. हा ताफ्याचा बारावा पाहणी
दौरा ठरणार आहे. लष्कर, वायुदल आणि नौदलाचे प्रमुख यावेळी उपस्थित आहेत.
****
आझादी
का अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा
दिन आज साजरा करण्यात येत आहे. यावर्षी चा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन “बहुभाषिक शिक्षणासाठी
तंत्रज्ञानाचा वापर: आव्हाने आणि संधी” या संकल्पनेवर आधारीत असणार आहे.
उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मातृभाषा
आपल्याला अनेक प्रकारे सक्षम बनवते, आपल्या मातृभाषेत मोठ्या प्रमाणावर संवाद साधून
आपल्या भाषेचं जतन आणि संवर्धन करावं, असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे.
****
केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आगामी आर्थिक
वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर होणाऱ्या मंथनाचा भाग म्हणून त्या, आज
आणि उद्या आर्थिक समूह, उद्योग, वाणिज्य, व्यापार आणि काही प्रमुख क्षेत्रातील करदाते
तसंच मान्यवरांशी चर्चा करणार आहेत.
****
चारा
घोटाळ्यातल्या दोरांडा कोषागार प्रकरणी रांची इथलं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं
विशेष न्यायालय आज राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावणार
आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना दोषी
ठरवलं होतं.
****
सांगली
जिल्ह्यातल्या शिगाव इथले हुतात्मा सैनिक रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर आज शिगाव
इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधल्या शोपियां जिल्ह्यातल्या
झेनपुरा इथं दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आलं.
****
जालना
जिल्ह्यातल्या परतूर-सेलू मार्गावर मापेगाव फाट्यावर चार वाहनांच्या अपघातात दुचाकीवरील
एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. काल दुपारी झालेल्या या अपघातामुळे या मार्गावरची
वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
****
No comments:
Post a Comment