Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 11 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११
डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
नागपूर
ते शिर्डीपर्यंतच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई
समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते झालं. सध्या या महामार्गाचं लोकार्पण तसंच नागपूरमधील
विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणीचा समारंभ नागपूरमध्ये सुरु आहे. पंतप्रधान
नरेंद्र ममोदी यांचं भाषण सुरु आहे. यावेळी बोलतांना मोदी यांनी राज्यातील शिंदे - फडवणीस सरकारच्या कार्याची प्रशंसा केली.
२०१७ मध्ये डबल इंजिनचं सरकार सुरु झाल्यानंतर या महामार्गाच्या विकासाचा पाया रचला गेला आणि आज ते पूर्णत्वास गेलं आहे.
या समृद्धी महामार्गामुळे मुंबई- नागपूरमधील अंतर
तर कमी होईलच, शिवाय राज्याचे २४ जिल्हे एकमेकांना जोडले जातील.
त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेती, तीर्थस्थळाचा
विकास, उद्योगांना चालना, रोजगाराच्या संधी
उपलब्ध होणार आहेत, असं ते म्हणाले. देशाच्या विकासात
पायाभूत विकासला चालना देण्यावर आपला भर असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. देशभरात वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा
आणण्यावर आपला भर असून, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय सुरु करणार असल्याचं
पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
तत्पूर्वी
समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्याच्या झिरो मैल पॉईंट पासून १० किलोमीटर अंतराचा प्रवास पंतप्रधानांनी केला. राज्यपाल भगत
सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे, आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर
बावनकुळे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी फ्रीडम पार्क ते खापरी
मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केला आणि स्थानकावरील प्रदर्शनाची पाहणी केली.
मेट्रोमध्ये त्यांनी एम्स नागपूरच्या विद्यार्थ्यांशीही
संवाद साधला आणि नागपूर इथं मेट्रो २ मार्गिकांचं भूमीपुजन केलं.
स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत या रेल्वेगाडीला ही पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा
झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची
उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहर जोडली
जाणार आहेत.
समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासाची जीवन वाहिनी ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या महामार्गाच्या लगत नवनगरं बनतील उद्योग
आणि कृषी क्षेत्रात भरभराट येईल आणि हा महामार्ग राज्याची भाग्यरेखा बनेल असं मुख्यमंत्री
शिंदे म्हणाले. या महामार्गावर १३ लाख झाडं
लावण्यात आली असून आणखीन ३५ लाख झाडं लावण्याचं
नियोजन आहे. हा रस्ता पूर्णपणे पर्यावरण पूरक
असून वन्य प्राण्यांसाठी अवागमनाची सोय सुद्धा यामध्ये आहे, असं ते म्हणाले.
यावेळी
बोलतांना केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात आणखी
सहा राष्ट्रीय महामार्ग रस्ते
परिवहन मंत्रालय बांधणार आहे. ७५ हजार कोटी रुपयांच्या या हरित महामार्गांचं काम सुरु
झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
यात
औरंगाबाद ते पुण्यापर्यंत महामार्ग तयार करण्याच्या कामाचा लवकरच प्रारंभ
होईल, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी कोणत्याही
याचिके शिवाय केवळ ९ महिन्यात ७०० किलोमीटर
भूमीचं अधिग्रहण आपल्या सरकारच्या काळात करण्यात आलं. मात्र मागील
महाविकास आघाडीच्या सरकारनं या अधिग्रहण प्रक्रीयेत अडथळे आणल्याचा
आरोप त्यांनी यावेळी केला.
या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील १४ जिल्हे थेट जवाहरलाल
नेहरू बंदरासोबत जोडले गेले आहेत. या महामार्गामुळे गडचिरोली आणि गोंदिया सारखे जिल्हे देखील
मुंबईशी जोडले जातील असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नागपूरच्या मिहान परिसरात उभारण्यात आलेली अखिल भारतीय आयुर्विज्ञान
संस्था- एम्स पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला
समर्पित केली. एम्स नागपूर ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असून
तिची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी जुलै २०१७ मध्ये केली होती, ही केंद्रीय क्षेत्रातील योजना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत
स्थापन करण्यात आली आहे.
एम्स नागपूर हे १ हजार ५७५ कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलं जाणारं, बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, निदान सेवा, शस्त्रक्रिया विभाग आणि वैद्यक शास्त्रातील सर्व प्रमुख विशेष आणि सुपर स्पेशालिटी विषयांचा
समावेश असलेलं ३८ विभागांचं अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय आहे.
***
प्रतिष्ठेच्या
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता
पक्ष - शिवसेना बाळासाहेबांची गटानं विजय
मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या दूध संघाच्या या निवडणुकीत
एकूण २० पैकी १६ जागांवर
भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
//**********//
No comments:
Post a Comment