Thursday, 8 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०८ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

गुजरात तसंच हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. उत्तरप्रदेशात मैनपुरी लोकसभा मतदार संघ तसंच पाच राज्यांतल्या सहा विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणीही आज केली जात आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार गुजरातमध्ये १८२ जागांपैकी १४९ जागांवर भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे, काँग्रेस १९ जागांवर, तर आम आदमी पक्ष ९ ठिकाणी आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये ६८ पैकी ३२ जागांवर भाजप आघाडीवर आहे, काँग्रेस ३२ जागांवर तर ४ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमधल्या २ पैकी एका जागेवर समाजवादी पक्ष तर एका जागेवर राष्ट्रीय लोक दल आघाडीवर आहे. राजस्थानमधल्या एका जागेसाठी ही निवडणूक होत असून, काँग्रेस याठिकाणी आघाडीवर आहे.

ओडिशामधल्याही एका जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीत बिजू जनता दल आघाडीवर आहे.

छत्तीसगढमधल्या ही एकाच जागेसाठीच्या या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सध्या आघाडीवर आहे.  तर बिहारच्या एका जागे साठीच्या या निवडणुकीत, जनता दल युनायटेड आघाडीवर आहे.

***

शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून 'ट्रान्स हार्बर' सारख्या प्रकल्पांमुळे तिसरी मुंबई वेगानं साकारली जात आहे. यापुढील काळात 'इज ऑफ लिव्हिंग' महत्त्वाचं ठरणार असल्यानं योग्यवेळी विकेंद्रीकरणावर भर देऊन आता तालुकास्तरीय गावांचा विकास करण्यावर भर देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबईत काल ते बोलत होते. लोककल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक वाढवण्याची आवश्यकता असून या तंत्रज्ञानाचा उपयोग शहरं अधिक विकसित करण्यासाठी केला पाहिजे. असं ते म्हणाले.

***

मुंबईत थर्ड आय आशियाई महोत्सवाचं येत्या १२ ते १९ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. एशिअन फिल्म फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाला प्रभात  चित्र मंडळाचं विशेष सहकार्य लाभलं आहे.

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...