आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१० डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
आज
मानवाधिकार दिवस. १९५० पासून मानवाधिकार दिवस साजरा केला जात असून या दिवसाचा यावर्षीचा
विषय सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय असा आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी
जनतेला सार्वभौमिक मानवाधिकार घोषणा पत्रातील विचार आणि सिद्धातांना प्रोत्साहन देण्याचं
आवाहन केलं आहे.
***
४२ वं मराठवाडा साहित्य संमेलन
आज जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं होत आहे. संत रामदास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातल्या
महादंबा साहित्यनगरीत संमेलनाध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली
होत असलेल्या या दोन दिवसीय साहित्य संमेलनात कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन, प्रकट
मुलाखत, बाल मेळावा आदी कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचं उद्धाटन शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून ठाकरे यांचं औरंगाबाद विमानतळावर आज सकाळी आगमन
झालं. उद्या संमेलनाचा समारोप होणार आहे.
***
औरंगाबाद ते अंकाई दरम्यान
रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाला लवकरच मंजुरी मिळेल, असं दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक
अरुणकुमार जैन यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद
रेल्वेस्थानकावर पीटलाइनच्या कामासाठी मालधक्का दौलताबादला हलवण्यासंदर्भात रेल्वे
मंडळाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याला पुढील आर्थिक वर्षात मान्यता मिळण्याची शक्यता
आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असं जैन यांनी सांगितलं.
***
अहमदनगर इथले ज्येष्ठ पत्रकार
महेंद्र कुलकर्णी यांचं काल सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते
५४ वर्षांचे होते. गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असलेले कुलकर्णी यांचा
जिल्ह्याचा राजकीय आणि पाणी प्रश्नाचा विशेष अभ्यास होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात,
आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयात अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
//*********//
No comments:
Post a Comment