आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
३१
मे २०२४ सकाळी
११.०० वाजता
****
लोकसभा
निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी इथल्या स्वामी
विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देत, ध्यान मंडपात मौन आणि ध्यानधारणेला कालपासून
सुरूवात केली. उद्या एक जूनपर्यंत ते इथं ध्यान करणार आहेत.
****
सुरक्षा
दलांनी छत्तीसगढमधल्या बिजापूर जिल्ह्यात विविध ठिकाणाहून १६ नक्षलवाद्यांना अटक केली.
यापैकी ११ जणांना गोरना पडियारपारा परिसरातून, तर पाच जणांना भुसापूर परिसरातून अटक
करण्यात आली. सुरक्षा दलांची हालचाल रोखण्यासाठी अडथळा आणणं, स्फोट घडवून आणणं, असा
घटनांमध्ये या नक्षलवाद्यांचा समावेश होता.
****
भारतीय
रिझर्व्ह बँकेनं २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के दरानं
वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेनं काल चालू आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध
केला. एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था
गतिमान आणि अधिक मजबूत झाल्याचं या अहवालात नमूद आहे.
****
स्वातंत्र्यवीर
सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना
१९ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. पुण्याच्या स्थानिक न्यायालयाच्या
न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी कलम २०४ अन्वये हे आदेश दिले. मार्च २०२३ मध्ये लंडन
इथल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल निराधार विधानं केल्याचा आरोप
सावरकर कुटुंबियांनी केला होता.
****
भारतीय
लष्कराच्या मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर
पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. शांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या
संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं.
****
राज्यात
दुष्काळसदृश परिस्थिती आहे, गुन्हेगारी अपघात, अंमलपदार्थांचा विळखा वाढतो आहे, मात्र
अशावेळी काही मंत्री परदेशवारीवर गेले आहेत, अशी टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली. पुणे अपघात आणि अंमली पदार्थांच्या व्यापाराबद्दल
येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचंही ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment