Friday, 29 December 2017

AIR News Bulletin, Aurangabad 29.12.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.12.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत अग्निकांड झालेल्या कमला मिल्स परिसराची पाहणी करून, परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शहरातली अशाप्रकारची अनधिकृत बांधकामं शोधून कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, ही आग लागल्याची घटना म्हणजे मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महापालिकेच्या भ्रष्टाचाराची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. संबंधित हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झालं होतं, तसंच या ठिकाणी आग विझवण्याची सक्षम यंत्रणा नव्हती, असं ते म्हणाले. या अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली. काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अग्निकांडात १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण होरपळल्याचं वृत्त आहे.

****

दिवाळखोरी संहिता दुरुस्ती विधेयक २०१७ आज लोकसभेत संमत करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज हे विधेयक सादर केलं होतं. हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्यांना टप्प्याटप्प्यानं कर्ज परतफेड करण्याच्या योजनेत समाविष्ट न करण्याची, तसंच कर्ज असलेली संपत्ती विकण्यास मनाई करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. या विधेयकाच्या चर्चेला उत्तर देताना जेटली यांनी, रालोआ सरकारच्या काळात बँकांच्या अनुत्पादीत मालमत्तेत वाढ झाल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला. सरकारनं अनुत्पादीत मालमत्तेचा खरा आकडा सांगितल्याचं ते म्हणाले. दिवाळखोरीच्या मुद्यांचं निराकरण करण्यासाठी अध्यादेश काढणं आवश्यक असल्याचं जेटली यांनी नमूद केलं.

दरम्यान, देशात काळा पैसा किती आहे याची अधिकृत आकडेवारी नसल्याचं जेटली यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशाबाहेर असलेला काळा पैसा हस्तगत करण्यासाठी तसंच काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचं ते म्हणाले.

****

लोकसभेत काल संमत झालेलं तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत सहज संमत व्हावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केलं आहे. ते आज संसद भवनाच्या बाहेर वार्ताहरांशी बोलत होते. या संदर्भात सरकार सर्व राजकीय पक्षांच्या संपर्कात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशात अनेक वर्षांपासून सुरू असलेली तिहेरी तलाकची परंपरा संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येकानं सरकारला सहकार्य केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

****

नागरिकांनी आभासी चलनाचा वापर करु नये, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. आभासी चलन हे कायदेशीर चलन नाही, तसंच ते सुरक्षित नसल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. बीटकॉईन किंवा अन्य आभासी चलनामुळे आर्थिक नुकसानाचा धोका संभवतो, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

नीति आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. नीति आयोगानं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणं हा या योजनेचा उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजवणं आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत.

****

औरंगाबाद इथल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी च्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आज दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर अशी या दोघा अधिकाऱ्यांची नावं असून, त्यांनी एका कर्मचाऱ्याला सेवेत कायम करून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी लाच मागितली होती. संबंधिताच्या तक्रारीवरून आज वाल्मी इथं संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

****

जालना इथल्या फकिरा सेवाभावी संस्थेच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा ‘वेणुताई भाले राज्यस्तरीय मुद्रा साहित्य पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातल्या दौंड इथल्या कवयित्री कल्पना दुधाळ यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचं हे सहावं वर्ष असून, येत्या एक जानेवारीला जालना इथं ज्येष्ठ समीक्षक डॉ.मनोज तायडे यांच्या हस्ते या पुरस्कारचं वितरण होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे कैलास भाले यांनी आज वातार्हर परिषदेत दिली.

****

मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला असून परभणी इथं आज सकाळी नऊ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद इथं साडे नऊ तर नांदेड इथं १० अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवलं गेलं.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.12.2017_13.00.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २९  डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तहसिल क्षेत्रात कर्करोग केंद्र स्थापन करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशातल्या आदीवासी भागात कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर योग्य उपचार देण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांबाबतचा प्रश्न शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला होता. ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची संख्या आणि इतर सोयी सुविधा कमी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. यावर उत्तर देताना नड्डा यांनी, डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ केली असल्याचं सांगितलं. गेल्या एक वर्षात पाच हजार जागा वाढवल्याचं ते म्हणाले. ग्रामीण भागात डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले असून, त्या डॉक्टरांचं वेतन केंद्राकडून देणार असल्याचंही नड्डा यांनी सांगितलं.

****

मुंबईतल्या लोअर परेल भागातल्या कमला मिल्स परिसरातल्या एका इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासह या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याबाबत तीव्र दु:ख व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. या इमारतीत असलेल्या हॉटेल्सना मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, त्यांची चौकशी करा अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. मिल्सच्या कमी जागेत ५० हॉटेल्सना परवानगी कशी दिली, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या आगीत १४ जणांचा मृत्यू, तर १९ जण जखमी झाले.

****

भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनं रियाथ इथं झालेल्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आनंदनं अंतिम फेरीत रशियाच्या व्लादिमीर फडोसिवचा पराभव केला. २००३ नंतर आनंदनं रॅपिड स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजयाबद्दल राष्ट्रपती रामानथ कोविंद आणि क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आनंदचं अभिनंदन केलं आहे. विश्वनाथन आनंदची उत्कृष्ट कामगिरी एक प्रेरणा स्रोत असल्याचं राष्ट्रपतींनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी संसदेच्या सर्व सदस्यांनी एक झालं पाहिजे, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं भारतीय संसदीय गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०१८ च्या ‘लोकसभा दिनदर्शिकेचं’ प्रकाशन केल्यानंतर बोलत होते. आपल्या कामगिरीचा आढावा घेण्याची, तसंच नव्या वर्षासाठी नवे संकल्प, नवी उद्दीष्टं, नव्या योजना ठरवण्याची संधी या बैठकीमुळे मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी गरीबांसाठी आणखी पाच लाख ४५ हजार परवडणारी घरं बांधण्यास केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. ३१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड मध्ये घरं बांधली जाणार आहेत. या प्रस्तावित घरांमुळे पंतप्रधान आवास योजनेतल्या घरांची एकूण संख्या ३६ लाख आठशे एकोणावीस होणार आहे.

****

पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं त्याच्या व्यवस्थापनाच्या एका विभागीय योजनेला मंजुरी दिली आहे. नवीन वातावरण बदलविषयक राष्ट्रीय संचालन समितिच्या बैठकीत मंजूर केलेल्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे एक अब्ज रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वातावरण बदलाच्या परिणामांना तोंड देण्याबरोबरच पिकांचे अवशेष जाळल्यामुळे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम रोखणं हा या योजनेचा उद्देश आहे. पिकांच्या अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी सध्याच्या यंत्रणेचा प्रभावी वापर करतानाच अनेक तांत्रिक उपायही केले जातील, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.  

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्य सरकार राज्यातल्या एक हजार ३१४ शाळा बंद करत असल्याच्या मुद्यावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला जी नोटीस पाठवली आहे, याबाबत आयोगासमोर स्पष्टपणे आणि सविस्तरपणे आपली बाजू मांडणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.  बहूजन समाजाच्या मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, यादृष्टीने घेतलेला हा निर्णय असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दिलेल्या नोटीसीला चार आठवड्यात उत्तर देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

*****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.12.2017_11.00AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.12.2017 11.00AM


 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८   डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****



मुंबईच्या लोअर परेल भागातल्या कमला मिल्स परिसरातल्या एका इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सेनापती बापट मार्गावरील काही हॉटेल आणि व्यापारी संस्था असलेल्या या चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री ही आग लागली होती. यात १५ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी मोजोस बिस्ट्रो पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीनंतर या परिसरात असलेल्या काही वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावरही परिणाम झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

****

जम्मू काश्मिरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर ए तय्यबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली असून, त्यांच्याजवळ शस्त्रास्त्र तसंच स्फोटकं सापडली आहेत. कुंझार भागात ते तिघे प्रवास करत असलेलं वाहन थांबवलं असता त्यात ए.के.४७ रायफल्स, ग्रेनेड्स तसंच इतर अन्य स्फोटकं सापडली असल्याचं लष्करी सूत्रांनी सांगितलं.

****

राज्य शासनाचा क्रीडा आणि युवक कल्याण विभाग, राज्य कबड्डी असोसिएशन, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथं काल प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी १६ संघांचे साडेतीनशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. राज्याचे जलसंधारण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.

****

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्याचा क्रमांक अग्रस्थानी येण्यासाठी येत्या एक जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या आढावा बैठकीत ते काल मंत्रालयात बोलत होते. राज्यातल्या शहरांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आणि स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम प्राप्त करणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका यांना त्यांच्या विविध वर्गीकरणानुसार पहिल्या तीन वॉर्डांना बक्षिस दिलं जाणार आहे. 

*****




Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 29 December 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  29؍دسمبر  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 مسلم خواتین کے تحفظ اورحقوق سے متعلق بل کل لوک سبھا میںاکثریت ِ رائے سے منظورکرلیاگیا۔اس بل میںمسلم خواتین کوایک نشست میں تین طلاق دئیے جانے کے مذہبی اختیارکوفوجداری جرم قراردیاگیاہے۔اوراس جر م کے مرتکب ہونے والے شوہرکوقیدکی سزاتجویزرکھی گئی ہے۔اس بل کے تحت زبانی،تحریری،بذریعہ خط، ای میل،اورواٹس ایپ جیسے ای رابطے کے ذریعے دی گئی طلاق کوغیرقانونی قراردیاگیاہے اور اس طرح طلاق دینے والے شخص کوتین برس قید کی سزادی جاسکتی ہے۔علاوہ ازیں طلاق یافتہ خاتون کواپنے اوراپنے بچوں کے لئے شوہرسے نان ونفقہ حاصل کرنے کی بھی گنجائش رکھی گئی ہے۔اب یہ بل منظوری کے لئے راجیہ سبھا میںپیش ہوگا۔اورراجیہ سبھا میںمنظوری کے بعد یہ قانون کی حیثیت اختیارکرجائے گا۔
****************************
 وزیرخارجہ سشماسوراج نے کہاہے کہ جاسوسی کے الزام میںپاکستان میںقیدہندوستانی بحریہ کے سابق افسرکلبھوشن جادھو سے ان کی والدہ اور اہلیہ کی ملاقات کے دوران پاکستان کی جانب سے خواتین کے ساتھ توہین آمیزرویہ اختیارکیاگیا۔کل اس سلسلے میںراجیہ سبھا میںبیان دیتے ہوئے انہوں نے پاکستان کے رویے پرسخت ناراضگی کااظہارکیا۔انہوںنے کہاکہ کلبھوشن جادھو سے ان کے اہل خانہ کی ملاقات کے لئے طئے شدہ شرائط کی پاکستان نے خلاف ورزی کی اور انسانی بنیادوں اوربھائی چارگی کامظاہرہ نہیں کیا۔ سشماسوراج نے اس سلسلے میںلوک سبھا میںبھی بیان دیا۔
****************************
 کل لوک سبھا کے کام کاج کی ابتداء میںہی مملکتی وزیراننت کمارنے اسپیکرسمترامہاجن کی ہدایت کے مطابق اپنے متنازعہ بیان کے لئے معافی مانگی۔انہوںنے کہا کہ ملک کے آئین اوربھارت رتن ڈاکٹر باباصاحب امبیڈکرکے تئیں وہ پوری طرح وفادارہیں۔پرسوں اس موضوع پرپارلیمنٹ کے دونوں ایوانوں کی کاروائی کئی بارملتوی کی گئی تھی۔
****************************
 ممبئی کے لوورپریل علاقے میںکملاملزاحاطے میںواقع ایک عمارت میںآتشزدگی کے باعث 15؍ افرادہلاک اوردیگر12؍ افرادزخمی ہوگئے۔ سیناپتی باپٹ روڈپرواقع اس عمارت کی تیسری منزل پریہ آگ بھڑکی۔عمارت میںہوٹل اورچندتجارتی دفاترتھے۔ممبئی عظمیٰ میونسپل کارپوریشن کے شعبہ ہنگامی خدمات کی جانب سے یہ اطلاع دی گئی ۔ زخمیوں کوقریبی اسپتال میںداخل کردیاگیاہے۔ابتدائی اطلاعات میںآتشزدگی کے کسی واضح سبب کاعلم نہیں ہوسکا۔آگ بجھانے کے لئے دستہ آتش فروکی گاڑیاں اورپانی کے ٹینکروں کی مدد لی گئی۔
****************************
 وَزیراعلیٰ دیویندرپھڑنویس نے کہاہے کہ مرکزی حکومت کی صفائی سروے مہم میں ریاست کوبہترمقام دلانے کے لئے آئندہ یکم جنوری تا18؍ فروری کے دوران صاف وارڈمقابلے کااہتمام کیاجارہاہے۔مرکزی حکومت کی جانب سے کئے جارہے شہروں کے صفائی سروے کے جائزاتی اجلاس سے وہ خطاب کررہے تھے۔انہوںنے بتایا کہ ریاست کے شہروں میںہونے والے صاف وارڈ مقابلوں میںپہلے تین وارڈوں کو5؍ تا50؍ لاکھ روپئے انعام دیاجائے گا۔اس کے علاوہ ترغیبی انعامات بھی دئیے جائیںگے۔وزیراعلیٰ نے ترغیب دی کہ اپنے شہرکوصاف رکھنے کے لئے عوامی بیداری میںعوامی نمائندے اورمقامی قائدین موثرکرداراداکریں۔
****************************
 اورنگ آبادضلع کے سلوڑکے ایس ڈی ایم انیل ماچے واڑاوران کے اسٹینوگرافررتناکرساکھرے کودفترمیںہی 10؍ہزارروپئے رشوت لیتے ہوئے رنگے ہاتھوں گرفتارکرلیاگیا۔زمین کاقبضہ حاصل کرنے کے ایک معاملے میںماچے واڑنے تحصیلدارکے جاری کردہ احکامات پرحکم التواء کے لئے ساکھرے کی معرفت 50؍ ہزارروپئے رشوت مانگی تھی۔معاملے کی شکایت کے بعد انسدادرشوت ستانی محکمے نے جال بچھاکرملزمین کورنگے ہاتھوں گرفتار کرلیا۔ اس خصوص میں سلوڑ پولس اسٹیشن میںمقدمہ درج کیاگیا۔
****************************
 جالنہ ضلع راشن دوکانداروں اورکیروسین ڈیلروں کی تنظیم نے ریاستی حکومت سے مطالبہ کیاہے کہ تاملناڈو کی طرزپرریاست میںبھی فوڈ کارپوریشن قائم کی جائے۔اس سلسلے میںتنظیم کے سربراہ گووندرائوپنڈت کی زیرقیادت تنظیم کے نمائندگان کاریاستی سطح کااجلاس کل منعقدہوا۔
****************************
 جالنہ کے سیولی دیہات کے 4؍ہزار215؍ کسانوں کو2014؍ کی ربیع کی فصل کے بیمے کے 66؍ لاکھ تین ہزارروپئے بیمے میں کی رقم ادا کی جائے گی۔بیمہ کمپنی کی غلطی سے سیولی گائوں کانام شیتالی لکھ دئیے جانے سے کسانوں کوبیمے کی رقم نہیں مل سکی تھی۔اس خصوص میںرکن پارلیمنٹ رائو صاحب دانوے نے مرکزی وزارت زراعت کی معرفت بیمہ کمپنی سے تفصیلات طلب کی تھی۔ جس کے بعد بیمہ کمپنی نے گائوں کانام درست کرکے بیمے کی رقم منظورکی۔
****************************

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...