Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
*****
ओखी चक्रीवादळाचा जोर मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात वाढत असून, मुंबईत
मुसळधार पाऊस सुरु आहे. या वादळामुळे निर्माण होणार्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मदतकार्यासाठी
सर्वतोपरी मदत केली जाईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, ओखी
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबई अणि लगतच्या जिल्ह्यातल्या शाळा
आणि महविद्यालयांना आज सुटी जाहीर केली आहे. राज्याचे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं आज मोठी भरती असल्यामुळे समुद्रकिना-यावर न जाण्याच्या सूचना
दिल्या आहेत.
****
टू जी स्पेक्ट्रम
घोटाळ्याचा निर्णय येत्या २१ डिसेंबरला सुनावणार असल्याचं दिल्लीच्या एका विशेष
न्यायालयानं सांगितलं आहे. माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा, राज्यसभेत
डीएमके पक्षाच्या खासदार कनिमोझी या प्रकरणात आरोपी आहेत. २६ एप्रिलला
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. ए राजा यांनी दूरसंचार कंपन्यांना टू जी मोबाईलच्या परवाना
वाटपात पक्षपात केल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं
केला आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या
कुलगाम जिल्ह्यात काजीगुंड परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये
झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले, मात्र यात एक भारतीय जवान शहीद झाला. मध्यरात्री
ही चकमक झाली. दहशतवाद्यांनी
श्रीनगरला जाणार्या लष्कराच्या तुकडीवर हल्ला केल्यानंतर ही चकमक झाल्याचं
सूत्रांनी सांगितलं.
****
जागतिक मृदा दिवस आज
पाळण्यात येत आहे. अन्न सुरक्षा, उत्तम पर्यावरण आणि आरोग्यासाठी मातीच्या गुणवत्तेवर भर
देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. 'पृथ्वीच्या संरक्षणाची सुरुवात जमीनीपासून' हा यंदाचा
मृदा दिनाचा विषय आहे.संयुक्त राष्ट्र मुख्यालयातल्या अन्न आणि कृषी संघटनेच्या
वतीनं मृदा दिनाचं आयोजन केलं जातं.
****
अखिल भारतीय अण्णा द्रविड
मुनेत्र कळघम - एआयएडीएमके
पक्षाच्या नेत्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांची आज पहिली
पुण्यतिथी. यानिमित्त
पक्षाच्या वतीनं चेन्नईतल्या मरीना इथं जयललिता यांच्या समाधीस्थळाजवळ रॅलीचं
आयोजन केलं आहे. तामिळनाडूचे
मुख्यमंत्री ई पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या
समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
****
नऊ हजार कोटी रुपयांचा कर्जबुडवेप्रकरणी आणि काळया पैशाप्रकरणी उद्योगपती विजय
मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची सुनावणी काल लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी
न्यायालयात सुरु झाली. मद्य उद्योजक मल्ल्याला घोटाळ्याप्रकरणी उत्तर द्यावं लागेल
असं सरकारी वकिलांनी सांगितलं. पुराव्यांच्या आधारे मल्ल्याविरुध्द प्रथमदर्शनी फसवणुकीचा
गुन्हा ठरु शकतो यावर सरकारी पक्षानं भर दिला.
****
संयुक्त जनता दलाचे
बंडखोर नेते शरद यादव आणि अली अन्वर यांना राज्यसभेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. या दोघांचं
सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या
नायडू यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या दोन
वरिष्ठ नेत्यांनी विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून पक्षाच्या
निर्देशांचा भंग करुन स्वेच्छेनं सदस्यत्व सोडल्याचा संयुक्त जनता दलाचा दावा
राज्यसभा सभापतींनी मान्य केला.
****
गुजरातमध्ये सर्व राजकीय
पक्षांना, उमेदवारांना
आणि तत्सम संघटनांना येत्या शुक्रवार आणि शनिवारी वर्तमानपत्रात किंवा इतर छापील
माध्यमात पूर्व परवानगीशिवाय जाहिराती देता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं
सांगितलं आहे. येत्या
शनिवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या
पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर निवडणूक आयोगानं नेमलेल्या माध्यम
प्रमाणन आणि देखरेख समितीकडून सर्व जाहिराती तपासून घ्याव्या लागतील. मतदारांवर
प्रभाव टाकणाऱ्या जाहिराती प्रचाराची मुदत संपल्यानंतर वर्तमानपत्रात प्रसिद्ध
होतात असं पूर्वी आढळून आल्यानं हा निर्णय आयोगानं घेतला आहे.
****
ओडिशातल्या भुवनेश्वर इथं
सुरु असलेल्या जागतिक हॉकी लीगच्या अंतिम स्पर्धेत पूल बी मध्ये भारताला काल
जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेतला हा भारताचा सलग दुसरा पराभव आहे. जर्मनीच्या
संघानं भारतावर शून्य - दोन अशी मात केली. उपांत्यफेरीत उद्या भारताचा सामना पूल ए मधल्या सर्वाधिक
गुण असलेल्या संघाशी होणार आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान
दिल्ली इथं सुरु असलेल्या तिसर्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात दोन बाद ८५ धावा झाल्या
होत्या. चेतेश्वर
पुजारा ३८ आणि शिखर धवन २५ धावांवर खेळत आहे. भारत २४८ धावांनी आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment