Tuesday, 17 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 17.12.2019 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी सोळा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी साडेसातशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. विधीमंडळानं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव काल संमत केला.

****

देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती झाली आहे. सध्या ते लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. लष्करप्रमुख बिपिन रावत या महिन्याच्या

एकतीस तारखेला निवृत्त होत असून, त्यांच्या जागी नरवणे यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. नरवणे मूळचे पुण्याचे असून आकाशवाणीच्या माजी वृत्तनिवेदक सुधा नरवणे यांचे ते पुत्र आहेत.

****

सागंली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी चौतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी नोव्हेंबर अखेरी पर्यंत मिळाला होता यातील पुढचा पंचाहत्तर कोटी चौतीस लाखाचा दुसरा हप्ताही आता प्राप्त झाला आहे.  जिल्हा प्रशासनानं भरपाईसाठी ११६ कोटी ८० लाखाची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यापैकी १०९ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठवडाभरात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

****

औरंगाबाद, जालना आणि लातुर जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सर्वत्र धुकं पसरलं असून गारवा वाढला आहे.

****

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष क्रांतीत मोलाचं योगदानं देणारे माजी कृषी अधिकारी प्रभाकर शंकर ठाकूर यांचं काल पुण्यात निधन झालं. ते नव्व्याण्णव वर्षांचे होते. राज्य सरकारनं कृषी भूषण हा शेती क्षेत्रातील पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं होतं.

****

महिलांच्या १७ वर्षाखालच्या फुटबॉल स्पर्धेत आज मुंबईत भारत आणि थायलंड यांच्यात लढत होणार आहे. अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.

****


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...