आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ एप्रिल २०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशभरातल्या कोरोनाबधितांची संख्या आतापर्यंत ३ हजार
तीनशे ७४ इतकी झाली आहे. तर या संसर्गाने आजवर ७७ जण मरण पावल्याची माहिती केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. यापैकी सर्वाधिक २४ मृत्यू हे महाराष्ट्रात झाले असून,
त्याखालोखाल गुजरातमध्ये १० जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचे सर्वाधिक बाधित ४९०
रुग्ण महाराष्ट्रातले असून, त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये ४८५ आणि दिल्लीमध्ये ४४५ लोक
कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं
वृ्त आहे. हे तिघं दिल्लीच्या मरकजमधल्या धार्मिक संमेलनात सहभागी झाले होते. ते चिखली,
खामगाव आणि देऊळगाव राजा इथले असून, त्यांच्यासह जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या
आता ८ झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात एक आणि लोहारा
तालुक्यात एक असे कोरोनाचे दोन रुग्ण
आतापर्यंत आढळून आले होते.
यात काल रात्री आणखी एका रुग्णाची भर पडली असून, तो उमरगा शहरातील रहिवासी आहे.
यामुळे काल रात्रीपासून उमरगा शहर आणि एक किलोमीटर पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग परिसर
प्रशासनानं सील केला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात भारतीय
कापूस महामंडळानं कापूस खरेदी केंद्रं पुन्हा सुरू
करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलं आहे.
नायगाव इथं काल सीसीआयचे कापूस खरेदी प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी काल नायगाव इथल्या
खरेदी केंद्राला भेट दिली. जिल्ह्यात प्रत्येक गावात अद्यापही
किती कापूस विक्री करायचा शिल्लक राहिला आहे, याची नोंद घेण्याचं
काम तलाठ्यांना देण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
रायगड जिल्ह्यात संचारबंदीच्या
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ८४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ११ जण
हे क्वारंटाईन
असतानाही बाहेर
फिरत होते. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५ झालेली असल्यानं नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.
*****
***
No comments:
Post a Comment