Sunday, 23 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23 AUGUST 2020 TIME – 11.00 AM

 

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशात कोरोना विषाणुचे नवे ६९ हजार २३९ रुग्ण आढळल्यानं रुग्ण संख्या ३० लाख ४४ हजार ९४० झाली आहे. देशात या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्युंचं प्रमाण घटलं असून हा दर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे.

****

देशात कोरोना विषाणुचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७४ पूर्णांक ९० शतांश टक्के असून २२ लाख ८० हजार ५६६ रुग्ण आतापर्यंत उपचार घेऊन बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.  

****

देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ५६ हजार ७०६ झाली आहे.

**** 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुचे १५७ नवे रुग्ण आज आढळले असून  यात महापालिका हद्दीतल्या ९३ तर ग्रामीण भागातल्या ६४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातली या रुग्णांची संख्या आता २० हजार ५९६  झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ४ हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात १५ हजार तीनशे त्रेसष्ठ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून ६२९ रुग़्णांचा मृत्यू झाला आहे. 

****

जळगाव जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोना विषाणुचे ६१६ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातली कोरोना विषाणु बाधीत रुग्णांची संख्या २१ हजार ७१३ झाली असून  यापैकी १४ हजार ९४५ रूग्ण बरे झाले आहेत.

****

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणुवर उपचार घेत असलेल्या ५ रुग्णांचा काल मृत्यु झाल्यानं या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ७१८ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ५० रूग्ण या संसर्गावर उपचार घेत आहेत.

****

सांगली जिल्ह्यातले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक जयराम कुष्टे यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं. ते १०४ वर्षाचे होते, त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोन वर्ष नऊ महिने आणि १६ दिवसांचा तुरुंगवास भोगला होता.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...