आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ ऑक्टोबर
२०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशासाठी हुतात्मा झालेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
प्रमुख उपस्थितीत मुंबईतल्या नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केलं, त्यानंतर पोलिस स्मृतिदिन
संचलन समारंभ झाला. गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृह राज्यमंत्री
शंभूराज देसाई यावेळी उपस्थित होते.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या
पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २० नोव्हेंबरपासून या परीक्षांना सुरुवात
होणार असून, दहावीच्या परीक्षा ५ डिसेंबर पर्यंत तर बारावीच्या सर्वसाधारण विषयांच्या
७ डिसेंबरपर्यंत आणि व्यावसायिक विषयांच्या परीक्षा १० डिसेंबर पर्यंत चालणार आहेत.
तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.
****
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांसाठी प्रचार खर्चाची
मर्यादा १० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही मर्यादा ७० लाख रुपयांवरून
७७ लाख रुपये झाली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात
घेऊन प्रचारासाठी अधिक खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या इंद्रावती नदीत नाव
उलटल्याने २ महिला बुडाल्या आहेत. काल संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नावेतल्या १५ जणांपैकी ६ जण सुखरुप बाहेर पडले, उर्वरित ७ जणांना बाहेर काढण्यात आलं
तर २ महिला अद्यापही बेपत्ता आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ८४५
झाली आहे. यापैकी ३४ हजारांवर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत
एक हजार ४२ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, सध्या जिल्ह्यात एक हजार ८०२ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे ८१ नवे रुग्ण आढळले तर ५८ रुग्ण
या आजारातून बरे झाले. बुलडाण्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे ८ हजार ६२० रुग्ण आढळले
८ हजार ७ रुग्णांनी यावर मात केली आहे.
****
No comments:
Post a Comment