आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ जुलै
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारतीय महिला हॉकी संघानं दक्षिण आफ्रिकेचा
चार - तीन असा पराभव केला.
थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत कौर हिने ६४ मीटर थाळीफेक करत अंतिम
फेरीसाठी पात्र ठरली आहे. थाळीफेक मध्येच सीमा पुनिया तिच्या गटात सहाव्या क्रमांकावर
राहीली. या गटात कोणत्याही स्पर्धकाला पात्रतेसाठी आवश्यक असलेला ६४ मीटरचा टप्पा ओलांडता
न आल्यानं अंतिम १२ मध्ये स्थान मिळवण्याच्या सीमाच्या आशा कायम आहेत.
मुष्टीयुद्ध प्रकारात पुरुषांच्या ४८ ते ५२ किलो वजनी गटात अमित पंघालचा
कोलंबियाच्या युबेरजन मार्टीनेज कडून चार - एक असा पराभव झाला.
****
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये
झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. दाचीगाम वनक्षेत्रात दहशतवादी असल्याची माहिती
मिळाल्यानंतर सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक झाली.
****
आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान वाहतूकीवर असलेली स्थगिती ३१ ऑगस्टपर्यंत
वाढवण्याचा निर्णय विमान वाहतूक महासंचालकांनी घेतला आहे. त्याबाबतचं पत्रक काल जारी
करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय मालवाहतुक आणि विशेष परवानगी असलेल्या विमान उड्डाणांवर
मात्र बंधन नसेल, असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
जालना पंचायत समितीतला अभियंता आणि त्याच्या साथीदाराला काल लाच देताना
अटक करण्यात आली. जालना तालुक्यातल्या काकडा इथं खासदार निधीतून झालेल्या कामांचा चार
लाख ७३ हजार रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाला होता. हा धनादेश संबंधित
कंत्राटदारास देण्याकरता कनिष्ठ अभियंता देविदास पाटील आणि त्याच्या साथीदारानं संबंधित
सरपंचाला १५ हजार रुपये लाच देऊ केली होती, मात्र सरपंचांना ही लाच घ्यायची नसल्यानं
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प भरण्यासाठी अद्याप
जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे,
धरणात चार हजार १९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. धरणाची पाणी पातळी
सध्या ३७ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाली आहे.
****
No comments:
Post a Comment